Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *घरकुलाचे पैसे उपलब्ध...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*घरकुलाचे पैसे उपलब्ध करून द्या- नितीन गोहने*

*घरकुलाचे पैसे उपलब्ध करून द्या- नितीन गोहने*

*घरकुलाचे पैसे उपलब्ध करून द्या- नितीन गोहने*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली :- सावली तालुक्यामध्ये मोदी आवास योजना,यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना,रमाई आवास योजना इत्यादी योजने अंतर्गत ग्रामीण भागात घरकुलांचे कामे सुरु आहेत.मात्र शासनाने निधी उपलब्ध करून नं दिल्यामुळे ग्रामीण भागातील घरकुलांचे रखडलेली आहे.शासन निधी केव्हा देणार या विवंचनेत जनता असून शासनाच्या कारभाराला कंटालेली दिसुन येत आहे.मागील वर्षांपासून सामान्य गरीब माणसांना घरकुले मंजूर झालीत आपल्या जवळील पैसे खर्च करून लोकांनी घरे बांधली,जवळील सर्व पैसा खर्च केला.दुकानदारांचे देणे बाकी आहे,त्यामुळे दुकानदार सुद्धा साहित्य टाकण्यास टाळाटाळ करीत आहे.सुंदर घरांचे स्वप्न मृगजळ ठरत आहे.या पावसात लोकांना राहावे लागते,त्यामुळे जनतेत सरकार विषयी प्रचंड नाराजी आहे.ग्रामीण भागातील लोकांना घरकुल बांधकामासाठी दीड लाख रुपये मिळतात आज रेती, लोहा, सिमेंट, मजुरी यांचे भाव आकाशाला भिडलेले आहेत.एवढ्या थोड्या पैशात घरकुलाचे बांधकाम करून शक्य नाही,त्यातही अनेक वर्षांपासून घरकुलाच्या रक्कमेत वाढ करण्यात आलेली नाही. तटपुंज्या पैशात घरकुल बांधायचे कसे असा प्रश्न घरकुल धारकांना पडलेला आहे.वाढती महागाई व तटपुंजी शासनाची मदत याच्या संयुक्त मेळ जुडवितांना सामान्य नागरिकांना मोठे कष्ट करावे लागत आहे.सावली तालुक्यातील बहुतांश घरकुलाचे काम अर्धवट आहे.शासनाने पैसे न दिल्यामुळे गरीब जनतेचि मोठी नुकसान होत आहे. शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केली यावर करोडो रुपये खर्च करण्यास मान्यता दिली.मात्र घरकुल धारक लाभार्थीवर अन्याय का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.दरम्यान सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र देऊन घरकुल धारकांचे पैसे त्वरित देण्याची विनंती पत्राद्वारे केली आहे.शासन सदर पत्राकडे लवकरात लवकर लक्ष्य देईल का ? याकडे सामान्य नागरिकांचे लक्ष्य लागलेले आहे.

ताज्या बातम्या

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे  भूमिपूजन संपन्न*    *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने* 12 September, 2024

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*आ. सुभाष धोटेंनी घेतला ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामाचा आढावा* 12 September, 2024

*आ. सुभाष धोटेंनी घेतला ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामाचा आढावा*

*आ. सुभाष धोटेंनी घेतला ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामाचा आढावा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* 12 September, 2024

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

विद्युत पोल तात्काळ सरळ करण्याची शिवसेना (उ.बा.ठा.) चे उपतालुकाप्रमुख मनोज ढेंगळे यांची मागणी. 12 September, 2024

विद्युत पोल तात्काळ सरळ करण्याची शिवसेना (उ.बा.ठा.) चे उपतालुकाप्रमुख मनोज ढेंगळे यांची मागणी.

वणी:- वणी ते नांदेपेरा रस्त्यावरील स्वर्णलीला शाळेसमोरील धोकादायक विद्युत वाहिनी पोल तात्काळ सरळ करून लोंबकळलेल्या...

नगर परिषद  शाळा क्र ८ वणी मध्ये विद्यार्थ्यांनी साकारले पर्यावरण पूरक श्री गणरायाचे हस्तशिल्प 11 September, 2024

नगर परिषद शाळा क्र ८ वणी मध्ये विद्यार्थ्यांनी साकारले पर्यावरण पूरक श्री गणरायाचे हस्तशिल्प

वणी:- संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक ७ सप्टेंबर पासून घरोघरी तसेच गावागावात श्री गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात करण्यात...

वणी आगाराला नविन बसेस त्वरीत द्या - मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन. 11 September, 2024

वणी आगाराला नविन बसेस त्वरीत द्या - मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.

वणी : यवतमाळ जिल्ह्यात वणी हे गाव महत्वपूर्ण शहर असून, वणी शहर हे वेकोलीच्या खदानी मुळे येथील बाजारपेठ ही मोठ्या प्रमाणात...

सावलीतील बातम्या

*मी सामान्य कुटुंबातला म्हणूनच सामन्यांच्या वेदना जाणतो - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार* *सावली तालुक्यातील २३६५ घरकुल लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण*

*मी सामान्य कुटुंबातला म्हणूनच सामन्यांच्या वेदना जाणतो - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार* *सावली तालुक्यातील २३६५...

*नवनिर्वाचित खासदार महोदयांचा सत्कार व मार्गदर्शन सोहळा ,व्याहाड खुर्द येथे संपन्न.*

*नवनिर्वाचित खासदार महोदयांचा सत्कार व मार्गदर्शन सोहळा ,व्याहाड खुर्द येथे संपन्न.* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

*विविध विकास कामांसंदर्भात पंचायत समिती,सावली येथे आढावा बैठक* *विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती*

*विविध विकास कामांसंदर्भात पंचायत समिती,सावली येथे आढावा बैठक* *विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती* ✍️दिनेश...