Home / चंद्रपूर - जिल्हा / गोंडपिपरी / *आ. सुभाष धोटेंनी घेतला...

चंद्रपूर - जिल्हा    |    गोंडपिपरी

*आ. सुभाष धोटेंनी घेतला ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामाचा आढावा*

*आ. सुभाष धोटेंनी घेतला ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामाचा आढावा*

*आ. सुभाष धोटेंनी घेतला ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामाचा आढावा*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा  :-- महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे राजुरा विधानसभा मतदारसंघातील गोंडपिंपरी तालुका मुख्यालयाचे ठिकाणी ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय इमारतीचे बांधकाम तातडीने करण्यात यावे अशी मागणी राज्य सरकारकडे केली होती. यावर सभागृहात उत्तर देताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी लवकरच संबंधित विभागाची बैठक आयोजित करून गोंडपिपरी येथे ग्रामीण रुग्णालय इमारतीचे बांधकाम तातडीने सुरू करण्याची ग्वाही दिली होती. त्यामुळे आमदार सुभाष धोटे यांनी आज गोंडपिपरी येथे प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या कामाचा आढावा घेतला, पाहणी केली. तसेच उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक कारवाई तातडीने पुर्ण करण्याच्या सूचना दिल्या.गोंडपिपरी येथे ग्रामीण रुग्णालय इमारतीचे जूने बांधकाम सन १९८२ मध्ये करण्यात आले होते परंतु सदर इमारत सध्यास्थितीत पूर्णतः जीर्ण झालेली असून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर यांच्या दिनांक २१ मार्च २०२३ रोजीच्या संरचनात्मक लेखापरीक्षण अहवालानुसार ही इमारत वापरण्यायोग्य नसल्याचे निष्पन्न झाले असताना सुद्धा या गंभीर बाबीकडे आरोग्य विभाग व महसूल विभाग गांभीर्याने लक्ष न देता परिसरातील गोरगरीब रुग्णांच्या जीविताशी खेळ खेळण्याचा प्रकार सुरू असल्याने भविष्यात कधीही रुग्णांच्या जीविकास धोका होऊ शकतो. मोठी जिवीत हाणी होऊ शकते. सदर गंभीर बाब लक्षात घेऊन आ. सुभाष धोटे यांनी सभागृहाच्या माध्यमातून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना इमारत बांधकाम करण्यास जागा कमी पडत असल्यास बाजूला असलेली जलसंपदा विभागाची वापरात नसलेली ९८ आर जागा तात्काळ आरोग्य विभागस करून घेण्याची कारवाई करण्याची आणि रुग्णालयासाठी नवीन इमारत बांधकाम तातडीने पुर्ण करण्याची मागणी केली होती हे विशेष.यावेळी बैठकीला महसुल विभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अपूर्वा बासुर (भा. प्र. से.), जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार अगडे, जेष्ठ नागरिक सुरेश चौधरी, वासुदेव पाटील सातपुते, उपअभियंता किशोर येडे, भुमी अभिलेख राजेश धोंगडे, शहर अध्यक्ष राजू झाडे यासह स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही. 07 October, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

*सामाजिक राजकीय विषयावर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे विचार मंथन*    *तेली समाजाच्या राजकीय अस्तित्वाची लढाई लढणार* 07 October, 2024

*सामाजिक राजकीय विषयावर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे विचार मंथन* *तेली समाजाच्या राजकीय अस्तित्वाची लढाई लढणार*

*सामाजिक राजकीय विषयावर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे विचार मंथन* *तेली समाजाच्या राजकीय अस्तित्वाची लढाई लढणार* ✍️दिनेश...

दिव्यांग व्यक्तीला विजय चोरडिया यांचेकडून तीन चाकी सायकल भेट. 06 October, 2024

दिव्यांग व्यक्तीला विजय चोरडिया यांचेकडून तीन चाकी सायकल भेट.

वणी :- भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांनी वणी विधानसभा क्षेत्रात...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश. 06 October, 2024

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...

बेलोरा चेक पोस्ट राज्यमार्गा वरील वेकोलीची अवैध पार्किंग हटवा, विजय पिदुरकर यांची मागणी. 06 October, 2024

बेलोरा चेक पोस्ट राज्यमार्गा वरील वेकोलीची अवैध पार्किंग हटवा, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी ते घुग्गुस चंद्रपूर हा राज्य मार्ग वर्दळीचा आहे.या रस्त्यावर वर्धा नदी लगत बेलोरा चेक पोस्टयेथे वेकोलीची...

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी*  06 October, 2024

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी*

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...

गोंडपिपरीतील बातम्या

*आ. सुभाष धोटेंनी केले मृतक राजेश झाडे च्या कुटुंबीयांचे सांत्वन*

*आ. सुभाष धोटेंनी केले मृतक राजेश झाडे च्या कुटुंबीयांचे सांत्वन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी गोंडपिपरी...

*नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा 28-02-2024*

*नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा 28-02-2024* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी गोंडपिपरी:-नमो चषक-२०२४ अतंर्गत...