Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / विशालगड वरील अतिक्रमणाच्या...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

विशालगड वरील अतिक्रमणाच्या नावाखाली गजापूर येथे दंगल घडवून दुकानाची तोडफोड करणाऱ्या वर कारवाई करा, मुस्लिम बांधवांची मागणी.

विशालगड वरील अतिक्रमणाच्या नावाखाली गजापूर येथे दंगल घडवून दुकानाची तोडफोड करणाऱ्या वर कारवाई करा, मुस्लिम बांधवांची मागणी.

वणी:- कोल्हापूर येथील विशाल गडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली गजापूर येथे दंगल व घरांची, वाहनाची, दुकानाची तोडफोड करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी याकरिता वणी शहरातील मुस्लिम बांधवांनी उपविभागीय अधिकारी वणी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारतांना रयतेला पुरोगामी विचार दिला. या पुरोगामी विचारांची जपणूक करत राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे सामाजिक न्यायाचा पाया रचला सामाजिक न्यायाचे जनक अशी राजर्षी शाहू महाराजांची ओळख आहे, असे असतांना सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड येथे अतिक्रमण हटविण्याचा मुद्दा उपस्थित करून केलेली तोडफोड,  हिंसाचार पुरोगामी महाराष्ट्राला निंदनीय करणारी घटना घडविण्यात आली. सध्या

पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे घरांचे अतिक्रमण काढण्यात येऊ नये असे न्यायालयाचे आदेश असताना प्रशासन व पोलीस यंत्रणेच्या समोर विशालगडा वरील अतिक्रमणांच्या नावाखाली  १४ तारखेला विशालगड पासून चार किलोमीटर दूर असलेल्या गजापूर गावातील मुस्लिम समाजाच्या लोकांच्या घरावर हल्ले करून जाळपोळ तसेच मस्जिद, दर्गाह, धार्मिक स्थळांचे नुकसान करण्यात आले. आणि लोकांना मारहाण केली. ही निंदनीय घटना  माणुसकीला काळीमा फासणारी व जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करणारी आहे.

विशालगडा वरील अतिक्रमण व गजापूर गावातील गुंड प्रवृत्तींच्या समाजकंटकाने केलेली तोडफोड, जाळपोळ, व घरावरील हल्ले हे वेगळे दोन विषय आहेत.

अशा राष्ट्रद्रोही कृत्य करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या समाजकंटकांचा वणीकर मुस्लिम बांधवाकडून जाहीर निषेध करण्यात येत आहे. आणि सरकारने अशा हिंसाचार, जाती-धर्माचे तेढ निर्माण करणाऱ्या व मूकबधिर पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनावर कठोर कारवाई करण्यात यावी. उपरोक्त संबंधित सरकारने तातडीची मदत करून मुस्लिम समाजाला न्याय मिळवून द्यावा. तसेच या निवेदनात प्रमुख चार मागण्या करण्यात आल्या.त्यात

घटनास्थळी उपस्थित असलेले जिल्हा पोलीस प्रमुख जिल्हा शासनाचे अधिकारी यांचे वर गुन्हा नोंदवून निलंबित करण्यात यावे. मस्जिद, दर्गाह, घरे, वाहने, दुकानासंबंधी तक्रारी नुकसान भरपाई देण्यात यावी. कायदा हातात घेऊन घरांची, दुकानांची, वाहनाची, धार्मिक स्थळांची, व मारहाण करणाऱ्या समाजकंटकांवर  विविध कलम अंतर्गत कारवाई करण्यात यावी. मुस्लिम अल्पसंख्यांक सुरक्षा व संरक्षण कायदा करून अंमलबजावणी करण्यात यावी. नेहमी होणारे मुस्लिम समाजावर होत असलेले हल्ले यासंबंधी उपाययोजना करून कायमस्वरूपी बंद करण्यात यावे. अशा मागण्याची निवेदन देण्यात आले

यावेळी नईम अजिज, मोहम्मद कामील उस्मान खान पठाण शाहीर समशेर खान सुलेमान खान, सलिम खाॅ, रफिक भाई,जुनेद शेख, साजिद शेख, यासह शेकडो मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*सुरजागड कंपनीच्या विरोधात नारेबाजी केल्याबद्दल माकपचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांना जिवे मारण्याची धमकी*    *धमकी देण्याविरोधात कारवाई करा . मारकवार यांची मागणी* 13 January, 2025

*सुरजागड कंपनीच्या विरोधात नारेबाजी केल्याबद्दल माकपचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांना जिवे मारण्याची धमकी* *धमकी देण्याविरोधात कारवाई करा . मारकवार यांची मागणी*

*सुरजागड कंपनीच्या विरोधात नारेबाजी केल्याबद्दल माकपचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांना जिवे मारण्याची धमकी* *धमकी...

नगर वाचनालय द्वारा हेमंत व्याख्यानमाला. 13 January, 2025

नगर वाचनालय द्वारा हेमंत व्याख्यानमाला.

वणी:- दरवर्षी प्रमाणे या वर्षी नगर वाचनालयाची प्रतिष्ठित, सुश्राव्य व्याख्यानमाला दि. 15 व 16 जानेवारी रोजी आयोजित...

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला* 12 January, 2025

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला*

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला* आता जिजाऊ होणे शक्य जरी नसले तरी आपण जिजाऊच्या कार्याचे...

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला* 12 January, 2025

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला*

*मॉ. जिजाऊ यांनी भारताला रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज दिला* आता जिजाऊ होणे शक्य जरी नसले तरी आपण जिजाऊच्या कार्याचे...

कोरपणा तालुक्यात खाजगी शाळा कडून पालकांची वारेमाप लूट 12 January, 2025

कोरपणा तालुक्यात खाजगी शाळा कडून पालकांची वारेमाप लूट

कोरपणा तालुक्यात खाजगी शाळा कडून पालकांची वारेमाप लूट ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना :- चंद्रपूर...

*वाघाच्या बछड्याने गुरवळा रोड.मार्निग वॉकसाठी वनविभागाची बंदी* 12 January, 2025

*वाघाच्या बछड्याने गुरवळा रोड.मार्निग वॉकसाठी वनविभागाची बंदी*

*वाघाच्या बछड्याने गुरवळा रोड.मार्निग वॉकसाठी वनविभागाची बंदी* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली...

वणीतील बातम्या

नगर वाचनालय द्वारा हेमंत व्याख्यानमाला.

वणी:- दरवर्षी प्रमाणे या वर्षी नगर वाचनालयाची प्रतिष्ठित, सुश्राव्य व्याख्यानमाला दि. 15 व 16 जानेवारी रोजी आयोजित...

दुर्गामाता मंदिराचा प्राणप्रतिष्ठा दीन सोहळा उत्साहात, मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते वाघाच्या मुर्तींचे लोकार्पण.

वणी : शहरातील आंबेडकर चौक परिसरात असलेल्या श्री दुर्गा माता मंदिरात प्राणप्रतिष्ठा दीन सोहळा १० जानेवारी रोजी मोठ्या...

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...