*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
Reg No. MH-36-0010493
वणी :- माजी आमदार तथा शिवसेनेचे (उबाठा) गटाचे जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांनी आज दिनांक ७ ऑगष्ट रोजी दुपारी वणी येथील प्रसाद लॉज येथे आयोजित पत्रपरिषदेत वणी विधानसभा मतदार संघामध्ये तूर्तास चालू असलेल्या पक्षांतर्गत भामटेगिरीवर जोरदार टीकास्त्र सोडले. यात त्यांनी देरकर यांच्यावर विविध खळबळजनक आरोप केले आहे. यामुळे पक्षातील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे.
वणी विधानसभा मतदार संघामध्ये "भगवा सप्ताह" हा कार्यक्रम सुरू आहे. परंतु संघामध्ये जिल्हा संपर्क प्रमुख गायकवाड यांना देरकर यांनी हातासी धरून पुर्णतः गटबाजी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काल दिनांक 06/08/2024 रोज मंगळवार ला वणी शहरातील टागौर चौक मध्ये देरकर यांनी शाखा फलकाचे अनावरण केले. त्यामध्ये दोन्ही उपजिल्हा प्रमुखांचे नाव नाहीत. तसेच शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, यांच्या नेमणुका करण्याच्या अधिकार फक्त तालुका प्रमुख शहर प्रमुख व जिल्हाप्रमुख यांनाच आहे. तो अधिकार देरकरांना नाही. असा प्रश्न वणी विधानसभा संपर्क प्रमुख विजयानंद पेडणेकर यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत त्यांनी केला आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं की, जे पदाधिकारी अकार्यक्षम होते त्यांना त्यांच्या संमतीने आधीच पदावरून दुर सारले आहे. यात महिला आघाडीच्या संघटीका व त्यांचे पती हे सुद्धा आहे. मात्र,अजुनही काही लोकं हे आपल्या नावासमोर देरकर व जिल्हा संपर्क प्रमुखांच्या म्हणण्यानुसार पद लावतात. अशाप्रकारे भामटेगीरी सुरू आहे, असेही ते म्हणाले.
गेल्या तीस वर्षांपासून आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत, मात्र देरकर ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षात सक्रिय झाले. ते विद्यमान पदाधिकारी यांना विश्वासात न घेता शाखा असतानाही नवीन शाखा दाखवत आहे. हे पक्षहीतावह नाही. व त्यांना मान्यता सुध्दा देता येणार नाही. दिसते ते बोललं पाहिजेत,मी स्पष्ट बोलणारा आहे. पक्ष म्हणजे परिवार आहे आणि परिवारास उध्वस्त करण्याचं काम कोणी करित असेल तर अश्या पध्दतीच्या लोकांना शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी ओळखुन आहे. त्यामुळे त्यांचे मनसुबे धुळीस मिळविल्याशिवाय राहणार नाही.असे पत्रपरिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना विश्वास नांदेकर म्हणाले आहे.
यावेळी पत्रपरिषदेत वणी विधासभा संपर्क प्रमुख विजयानंद पेडणेकर, जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर, महिला जिल्हा संघटिका योगिता मोहोड, उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे, तालुका प्रमुख शरद ठाकरे, चंद्रकांत घूग्गुल, संजय आवारी, सीमा विशाल आवारी, सुरेखा भोयर, वनिता काळे, सुधीर थेरे, संजय बीजगुणवार, अभय चौधरी, भाग्यश्री वैद्य, महेश चौधरी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*आ. सुभाष धोटेंनी घेतला ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामाचा आढावा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...
*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...
वणी:- वणी ते नांदेपेरा रस्त्यावरील स्वर्णलीला शाळेसमोरील धोकादायक विद्युत वाहिनी पोल तात्काळ सरळ करून लोंबकळलेल्या...
वणी:- संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक ७ सप्टेंबर पासून घरोघरी तसेच गावागावात श्री गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात करण्यात...
वणी : यवतमाळ जिल्ह्यात वणी हे गाव महत्वपूर्ण शहर असून, वणी शहर हे वेकोलीच्या खदानी मुळे येथील बाजारपेठ ही मोठ्या प्रमाणात...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...
मारेगाव:महावितरण विभागाने देखभाल दुरुस्तीची कामे येत्या २ दिवसात पूर्णत्वास न्यावी व वारंवार होत असलेला विद्युत...