स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
Reg No. MH-36-0010493
वणी:- संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक ७ सप्टेंबर पासून घरोघरी तसेच गावागावात श्री गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात करण्यात आले. सोबतच महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण पूरक श्री गणेश उत्सव साजरा करण्या संदर्भातल्या सूचना सुद्धा निर्गमित करण्यात आल्या याच मार्गदर्शक सूचना सर्वसामान्या पर्यंत तसेच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी वणी नगर परिषद अधिनस्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक शाळा क्र ८ मध्ये नवोपक्रमांतर्गत शाळेचे मुख्याध्यापक किशोर चौधरी यांनी विद्यार्थ्यांना स्वनिर्मित श्री गणरायाचे शिल्प तयार करण्या करीता प्रोत्साहित केले. तसेच मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांना घरच्या घरी गणरायाची मूर्ती बनवण्यास आवाहन दिले.
सदर आव्हान विद्यार्थ्यांनी सक्षमतेने पूर्ण केले व पहिल्या वर्गापासून ते सातव्या वर्गापर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांनी अप्रतिम व सुंदर श्री गणरायाचे शिल्प तयार करून शाळेमध्ये दिनांक ९ सप्टेंबर रोजी सादर केले. विद्यार्थ्यांच्या या कार्याचे विशेष कौतुक म्हणून सदर बाब ही कार्यानुभव विषयातील प्रात्यक्षिकामध्ये गृहीत धरून त्याचे गुणांकन विद्यार्थ्यांना करण्याबाबत मुख्याध्यापकांनी सर्व वर्ग शिक्षकांना सुचित केले तसेच याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील वर्गशिक्षक कु. नीलिमा राऊत, कु. किरण जगताप, कु. सुनीता जकाते, देवेंद्र खरवडे, अविनाश तुंबडे तसेच शिक्षक स्वयंसेविका कु. बोरवार यांनी आपापल्या वर्गातील विद्यार्थ्यांना शाळेचा नित्य उपक्रम म्हणून स्मायली देण्यात आले व सर्वांचे कौतुक करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना भविष्यात पर्यावरण पूरक विशेष करून मातीच्या मुर्त्यांचा वापर करण्या संदर्भात सूचना देऊन पर्यावरण संरक्षण करण्याचे महत्त्व याद्वारे पटवून देण्यात आले. विद्यार्थ्यांनी सुद्धा प्रत्येक सण समारंभात पर्यावरणाचा निश्चितच विचार करून पर्यावरण पूरक सन समारंभ साजरे करनार असा निश्चय केला.
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
*सामाजिक राजकीय विषयावर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे विचार मंथन* *तेली समाजाच्या राजकीय अस्तित्वाची लढाई लढणार* ✍️दिनेश...
वणी :- भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांनी वणी विधानसभा क्षेत्रात...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...
वणी:- वणी ते घुग्गुस चंद्रपूर हा राज्य मार्ग वर्दळीचा आहे.या रस्त्यावर वर्धा नदी लगत बेलोरा चेक पोस्टयेथे वेकोलीची...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...
वणी :- भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांनी वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी ते घुग्गुस चंद्रपूर हा राज्य मार्ग वर्दळीचा आहे.या रस्त्यावर वर्धा नदी लगत बेलोरा चेक पोस्टयेथे वेकोलीची...
वणी:- सुशगंगा पब्लिक स्कूलमध्ये नवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी शाळेत सोलो डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात...