झरी :परभणी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाची तोडफोड केली . ही घटना अत्यंत लाजिरवानी व निषेधार्थ आहे. सदर घटनेची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी या करीता आंबेडकरी संघटनेच्या वतीने पोलीस स्टेशन मुकुटबन व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना सुधाकर नरांजे, सुरेन्द्र गेडाम, गौतम मुन , चिंतामण पथाडे , नवनाथ देवतळे, विठ्ठल काटकर, मोहन पाटील, उद्धव वाळके , श्रीनिवास देवंतवार, शरद पडवेकर , रामदास पाझारे, दयाकर गेडाम, भारत निमसटकर , हेमराज नगराळे, अमरदीप रामटेके, चंद्रमणी देवतळे , अमोल भोयर , प्रभाकर मद्देलवार , मनोज टेंभूरकर, प्रियल पथाडे , गणेश आत्राम , रामलु कोनावार, प्रमोद कोडापे , प्रविण मद्देलवार , दिपक दंडेवार , अशोक कुमरे , प्रकाश उईके , किशोर येडमे , तुकाराम तेलंग इत्यादी उपस्थित होते .