मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी मदत म्हणून पुरस्काराचे वितरण करण्यात आले. विकासगंगा समाजसेवी संस्थेच्या माध्यमांतून मुलींना बारा हजार रुपये प्रमाणे तर मुलांना दहा हजार रुपये प्रमाणे धनादेश देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्याना ही मदत मिळावी म्हणून सहयोग ग्रुप मुकुटबन व निसर्ग व पर्यावरण मंडळाने RCCPL कंपनीकडे जुलै महिन्यात निवेदन देऊन मागणी केली होती .
सदर पुरस्कार वितरण कार्यक्रम मुकुटबन येथील मातोश्री पुनकाबाई आश्रम शाळेत घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जयंत कंडपाल (युनिट हेड RCCPL) होते तर उदघाटक म्हणून ब्रिजमोहन वर्मा (HR हेड), धमेन्द्र पात्रा (CSR मॅनेजर), विजय कांबळे (CSR मॅनेजर ), संदीप उरकुडे (वरीष्ट कार्यकारी अधिकारी), चंद्रदत्त शर्मा सेक्युरीटी अधिकारी, मुख्याध्यापक सुरेन्द्र गेडाम निसर्ग व पर्यावरण मंडळ अध्यक्ष व सहयोग ग्रुप सदस्य, गणेश उद्कवार सचिव जय बजरंग शिक्षण संस्था, रंजीत बोबडे अध्यक्ष विकासगंगा समाजसेवी संस्था, मुख्यध्यापिका ममता जोगी, मुख्यध्यापक सुरेश परचाके, विनोद गुजलवार संचालक विकासगंगा संस्था यांची प्रमुख उपस्थिती होती .
गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी पुरस्कार देण्याचे RCCPL कंपनीने जाहीर केले . या कार्यक्रमासाठी पुरस्कार मिळालेले गुणवंत विद्यार्थी श्वेता संतोष देवढगले, मिसबा जावेद सय्यद , रेहान अमजद शेख ( आर्या इंटरनेशनल स्कुल ), प्रणय नंदु मंदुलवार , वृषाली संतोष केळझरकर ( गुरुकुल कॉन्वेंन्ट मुकुटबन ), प्रणय संतोष गुम्मुलवार, हर्षद अंकुश इंगोले (पुनकाबाई आश्रम शाळा ) , साक्षी तुलसीदास पाचभाई ( सरस्वती विद्यालय मुकुटबन ), पायल संतोष पाईलवार ( शेतकरी विकास विद्यालय मांगली ), युवती सुरेश सेंगर ( आदर्श विद्यालय अडेगाव ।व त्यांचे पालक, शिक्षक आणि शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या कार्यक्रमाला निड संस्था, आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था, परीश्रम वाचनालय , विकासगंगा समाजसेवी संस्था, RCCPL कंपनीचे कर्मचारी व सर्व शाळेच्या शिक्षकाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप उरकुडे यांनी केले तर संचालन विपीन वडके यांनी केले व आभार प्रदर्शन विजय झाडे यांनी केले.