झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे बांधकाम सुरू असल्यामुळे मुकूटबन येथील बसस्टँड चौकात असलेला मोठा प्रवासी निवारा व मुत्रिघर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाडण्यात आले. त्यामुळे प्रवाशांची व जनतेची गैरसोय होत आहे. ही गैर सोय थांबविण्यासाठी मुकूटबन येथे बस स्टैंड चौकात शौचालय तसेच प्रवासी निवारा उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी निवेदनातून मुकूटबन ग्रामपंचायतचे सरपंच व सचिव यांचेकडे केली आहे.
मुकूटबन हे गाव महत्वाचे व मोठे गाव असून तेथे लोकसंख्येने सुध्दा जास्त आहे. मुकुटबनला बाजारपेठ व उद्योग असल्यामुळे नेहमीच वर्दळ असते. उन्हाळ्यात पाडलेले प्रवासी निवारा व स्वछता गृह (महीलासाठी) सहा महिन्याचा कालावधी होऊन सुध्दा बनविण्यात आला नाही. बस थांबल्या बरोबर महिलांना उघड्यावर जावे लागते त्यामुळे महिलांची कुचंबना होत आहे. प्रवासी निवारा नसल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुने विद्यार्थी व नागरीक उन्हात, पावसात तसेच
थंडीत उभे असतात अश्यावेळी अवजड वाहनामुळे उपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी महीलांना होणारा त्रास लक्षात घेऊन लवकरात लवकरच नविन प्रवासी निवारा व महीलांसाठी व नागरीकांसाठी स्वच्छता गृह उपलब्ध करून द्यावा अशी मागणी निवेदनातून केली. निवेदन देताना सुरेन्द्र गेडाम अध्यक्ष निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी व सहयोग ग्रुप मुकुटबन, रुपेश ड्यागलवार, सागर ताडपेल्लीवार, चितांमण पथाडे, संतोष देवंतवार, सुरेश ताडुरवार, गौतम मुन, संदीप धोटे, नरेश तारावार, प्रियल पथाडे, प्रभाकर मद्देलवार, प्रविण एनगंधेवार, राजलिंगु मंदुलवार, अशोक कल्लुरवार इत्यादी उपस्थित होते.