वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी ४ वाजता दरम्यान उघडकीस आली.
बेसा येथे आई व लहान भावासह वास्तव्यास असलेले विनीत शैलेश वाघमारे २४ असे मृतकाचे नाव आहे.
विनीत हा स्वताची शेती करून इतरही कामे करीत होता. तो अविवाहित असून आई व लहान भावाचे शिक्षण करुन घर सांभाळत होता.
सततच्या नापिकीमुळे व शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने तसेच बॉंकेचे कर्ज झाल्याने तो सतत विवंचनेत राहायचा त्यामुळे आज दिनांक ६ जानेवारी रोजी बेसा येथील राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्याचे पश्चात आई, आणि लहान भाऊ आहेत.
विनीत यांचे निधनामुळे बेसा गावात शोककळा पसरली आहे.
आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास वणी पोलिस करीत आहेत.