वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून गोपनीय माहिती मिळाली की, काही इसम नागपूर पांढरकवडा या राष्ट्रीय महामार्गावरून हैदराबाद येथे एम एच २६ बी एन.११३७ व सीजी २४ एस ७६६७ या ट्रकने अवैद्य गोवंश तस्करी करीत आहे अशा माहितीवरून केळापूर टोल प्लाझा येथे पहाटे पाच वाजता नाकाबंदी करून ट्रक थांबवून पंचायत समक्ष ट्रकची झडती घेतली असता ट्रक मध्ये बैल, गोरे असे १२१ गोवंश जनावरे अवैद्यरित्या वाहतूक करीत असल्याचे आढळून आल्याने पांढरकवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करून आरोपी मोहम्मद हातम अब्दुल नवी वय ४९ दुर्गा चौक रोशन पुरा मुर्तीजापुर, मोसिन अली सय्यद मोबीन वय ४५ अकोट , इरशाद उल्लाखा किस्मत अल्ला खाॅ वय ३२ पठाणपुरा मूर्तिजापूर, यांना ताब्यात घेऊन अटक करून १२१ गोवंश जनावरे, दोन ट्रक असा एकूण किंमत ८७,२१,००० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजने पांढरकवडा यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सतीश चवरे, सोपोनी अजय कुमार वाढवे उल्हास कुरकुटे, सुनील खंडागळे सुधीर पांडे सुधीर पिदुरकर निलेश निमकर रजनीकांत मडावी चालक सतीश फुके सर्व स्था.गु.शा यवतमाळ यांनी पार पाडली.