Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / वेकोलीच्या सुरक्षा...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

वेकोलीच्या सुरक्षा रक्षकाने आपल्या पत्नी व मुलीवर केला धारदार शस्त्राने केला खुनी हल्ला.

वेकोलीच्या सुरक्षा रक्षकाने आपल्या पत्नी व मुलीवर केला धारदार शस्त्राने केला खुनी हल्ला.

पत्नीचा वेकोली रुग्णालयात मृत्यु तर मुलीवर चंद्रपूर च्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू.

नौशाद शेख (विशेष प्रतिनिधी):  माणसाचा क्रोध कुठल्या स्तरांवर जाईल व त्यातून काय विपरीत घटना घडेल याचा नेम नसून माणसे आता फक्त स्वताचा विचार करायला लागली आहे व स्वताच्या स्वार्थासाठी कुटुंबातील कलह हा हत्त्या पर्यंत पोहचवीत आहे अशीच एक दुर्दैवी घटना भद्रावती तालुक्यातील माजरी पोलीस ठाण्याअंतर्गत कुचना येथे घडली एक माजरी वेकोली येथील एका सुरक्षा रक्षकाने धारदार चाकूने हल्ला करून त्यांना जबर जखमी केलेआहे या हल्यात पत्नीचा मृत्यू झाला आहे तर मुलगी गंभीर जख्मी असून तीचेवर चंद्रपुरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ला कशावरून झाला हा सध्या गूलदस्त्यात असून पोलीस तपासात यामागचे खरे कारण कळणार आहे.

ही थरारक घटना वेकोलि ए-टाइप वसाहत कुचना कॉलोनी येथील ब्लॉक नंबर- १० क्वार्टर नंबर – ७७ मध्ये घडली असून आरोपी वीरेंद्र रामप्यारे साहनी वय (४३) हा वेकोलि माजरीच्या खुल्या कोळसा खाणीत सुरक्षा रक्षक या पदावर कार्यरत असून काल (१३ जानेवारी) दुपारी दोन वाजताच्या दरम्यान आपल्या राहत्या घरी पत्नी व मुलीवर धारदार चाकूने हल्ला करून तो पळून गेला. या हल्ल्यात पत्नी सुमन वीरेंद्र साहनी (३६) हिला पोटात व छातीत घाव घातले त्यामुळे गंभीर जखमी अवस्थेत वेकोलि माजरीच्या रुग्णालयात भरती केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाला तर मुलगी सिमरन वीरेंद्र साहनी (१७) हिला पोटात चाकू खुपसले यात ती गंभीर जख्मी झाली असून तिचेवर चंद्रपुरच्या खाजगी रुग्णालय कुबेर हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहे. आरोपी वीरेंद्र साहनी हा आपल्या घरात खूनी खेळ खेळून झाल्यावर वसाहतीची भीत ओलांडून विसलोन गावाच्या रेलवे मार्गाने पसार होत असताना कुचना कॉलोनीतील काही युवकानी पकडून माजरी पोलिसांच्या ताब्यात दिले.

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

भद्रावतीतील बातम्या

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी...

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू*

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू* रिपोर्टर✍️...