Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / *३२ अनाथ मुलांना घेतले...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

*३२ अनाथ मुलांना घेतले दत्तक तर दिव्यांगांना सायकल भेट* *रवींद्र शिंदे यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी*

*३२ अनाथ मुलांना घेतले दत्तक तर दिव्यांगांना सायकल भेट*    *रवींद्र शिंदे यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी*

*३२ अनाथ मुलांना घेतले दत्तक तर दिव्यांगांना सायकल भेट*

 

*रवींद्र शिंदे यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी*

 

रोगनिदान शिबिरात तीनशे रुग्णांची तपासणी

 

खा. संजय राऊत व खा. अनिल देसाई यांच्या शुभेच्छा

 

*विविध सामाजिक उपक्रमांनी  वाढदिवस साजरा*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

भद्रावती:-भद्रावती सामाजिक सेवेत सदैव तत्पर शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष रविंद्र शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (दि.१३) विधानसभा क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी वयाची अंशी पार केलेल्या २३ वयोवृध्द नागरिकांचा सत्कार करण्यात आला. वाचनालयाला पुस्तके तर सहा दिव्यांगांना सायकल भेट देण्यात आली. तसेच ३२ अनाथ मुलांना शैक्षणिक कार्यासाठी त्यांनी दत्तक घेत सामाजिक बांधिलकी जोपासली.सर्वप्रथम रविंद्र शिंदे यांनी आनंदवन येथील थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या समाधीला भेट देवून श्रध्दांजली अर्पण केली. त्यानंतर आनंदवनचे विश्वस्त डॉ. विकास आमटे आणि सदाशिव ताजने यांचे आर्शिवाद घेतले. याप्रसंगी रूपाली रविंद्र शिंदे, ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, शिवसेना वरोरा तालुकाप्रमुख दत्ता बोरेकर, वरोरा शहर प्रमुख खेमराज कुरेकर प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच चंद्रपूर जिल्हा धनोजे कुणबी समाजाचे अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम सातपुते, सेवानिवृत्त भूमिअभिलेख अधिकारी चंपत आस्वले, सामाजिक कार्यकर्ते मदन ठेंगणे, विजय पिंपळशेंडे, बंडू जांभूळकर, पुरुषोत्तम मत्ते, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख नर्मदा बोरेकर, युवासेना पूर्व विदर्भ विभागीय सचिव तथा गोंडवाना विद्यापिठाचे सिनेट सदस्य न प्रा. नीलेश बेलखेडे, उपजिल्हाप्रमुख तथा भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भास्कर ताजणे, नरेंद्र पढाल, वरोरा तालुकाप्रमुख तथा बाजार समितीचे संचालक दत्ता बोरेकर, भद्रावती शहरप्रमुख घनश्याम आस्वले, वरोरा शहरप्रमुख खेमराज कुरेकर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूरच्या वर्धापनदिनाप्रित्यर्थ ट्रस्टच्या श्रध्देय बाबा आमटे आरोग्य अभियांनातर्गत भद्रावती येथील श्री मंगल कार्यालयात शुक्रवारी रोगनिदान शिबिर घेण्यात आले. हे शिबिर स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर आणि आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले. या शिबिरात तीनशे रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यातील २३ रुग्णांना पुढील उपचारासाठी सावंगी (मेघे) रुग्णालयात पाठविण्याची शिफारस करण्यात आली. ट्रस्टचे सामाजिक कार्य सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी असल्याचे शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी अॅड. पुरुषोत्तम सातपुते म्हणाले.शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रप्रमुख रवीद्र शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्य शिवसेना नेते खा. संजय राऊत व खा. अनिल देसाई यांनी भ्रमरध्वनीवरून संपर्क साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच अनेक शिवसैनिक, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

भद्रावतीतील बातम्या

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी...

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू*

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू* रिपोर्टर✍️...