Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / जिल्हा परिषद हायस्कूल,भद्रावतीच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

जिल्हा परिषद हायस्कूल,भद्रावतीच्या विद्यार्थ्यांची खेळात भरारी शनल सिलांबम स्पर्धा गाजविणारे क्रिश भोस्कर व कु तंनू आडे यांच्या सन्मानार्थ भव्य स्वागत रॅली

जिल्हा परिषद हायस्कूल,भद्रावतीच्या विद्यार्थ्यांची खेळात भरारी    शनल सिलांबम स्पर्धा गाजविणारे क्रिश भोस्कर व कु तंनू आडे यांच्या सन्मानार्थ भव्य स्वागत रॅली

जिल्हा परिषद हायस्कूल,भद्रावतीच्या विद्यार्थ्यांची खेळात भरारी

 

शनल सिलांबम स्पर्धा गाजविणारे क्रिश भोस्कर व कु तंनू आडे यांच्या सन्मानार्थ भव्य स्वागत रॅली

 

 

 

 ✍️ रिपोर्टर : तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर मो. ७७५६९६३५१२

 

( भारतीय वार्ता न्युज) भद्रावती : स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूल,नागमंदिर समोर,भद्रावतीचे खेळाडू मास्टर क्रिश बंडू भोस्कर ( वर्ग १२ वा ) व कु.तनू हिरालाल आडे* ( वर्ग १२ वा ) या दोन्ही सिलांबम ( लाठीकाठी ) या खेळात स्टिक फाईट या क्रीडा प्रकारात नुकत्याच तामिळनाडू राज्यातील कुडलोर येथे संपन्न झालेल्या फेडरेशन कप नॅशनल राष्ट्रीय सिलांबम चॅम्पियनशिप मध्ये महाराष्ट्र राज्य संघाला दोघांनीही आपल्या महाराष्ट्राच्या मातीतील रांगड्या-मर्दानी खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करून सिल्व्हर मेडल प्राप्त केले.

आपल्या शाळेचे, भद्रावती तालुक्याचे , चंद्रपुर जिल्ह्याचे व आपल्या महाराष्ट्र राज्याचे नाव लौकिक केलेले आहे.

या निमित्ताने आज १४ ऑक्टोबर २०२३ ला सकाळी संपूर्ण भद्रावती शहरात जि.प.हायस्कूलच्या  विद्यार्थ्यांच्या बँडपथका सह या खेळाडूंची सन्मान रॅली काढण्यात आली,या रॅली मध्ये शाळेतील वर्ग ०५ ते वर्ग १२ वी पर्यंत चे सर्व मुले व मुली तसेच शाळेतील सर्व सन्माननीय शिक्षक वृंद,पालक वर्ग यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवून या खेळाडूंना आपल्या कल्पनेने भद्रावती शहरात च्या इतिहासात प्रथमच राष्ट्रीय विजेत्या खेळाडूं ना एक वेगळाच मानाचा सन्मान दिलेला आहे.

 

या प्रसंगी या राष्ट्रीय विजेत्या खेळाडूचे मुख्य तांत्रिक मार्गदर्शक व कोच मास्टर दुर्गराज नारायण रामटेके (संस्थापक व सचिव - ऑल चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेच्युअर सिलांबम असोसिएशन,तसेच भद्रनाग स्पोर्ट्स अकादमी,भद्रावती चे अध्यक्ष ) यांचा सुद्धा शाळेचे मुख्याध्यापक श्री. अरविंद चौधरी सर व समस्त शिक्षक वृंद यांच्या हस्ते शाल गुलदस्ता व स्पेशल गिफ्ट देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.

 

यावेळी जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक  श्री.अरविंद चौधरी सर,या सन्मान रॅलीचे नियोजक श्री.राजू हिवंज क्रीडा शिक्षक तसेच शिक्षक वृंद

श्री.ज्योतीराम गावंडे श्री.नरेंद्र मुद्दमवार,श्री.गणपत वाघमारे,

श्री.सिध्दार्थ बागेसर,श्री.संतोष मेश्राम,श्री.मुक्तेश्वर मेश्राम,श्री.कामटकर सर,श्री.कश्यप सर,श्री.निरांजने सर,सौ.मोरे व श्रीमती भसारकर मॅडम उपस्थित असून भद्रनाग मल्टिपरपज अमेच्युअर स्पोर्ट्स अकादमी,जिल्हा परिषद हायस्कूल,नागमंदिर समोर , या नियमित क्लबमध्ये दररोज सायंकाळी ०६ ते ०७ दरम्यान कोचिंग देणारे  सहाय्यक कोच श्री विकास दुर्योधन, कु आर्या कामरे* इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

भद्रावतीतील बातम्या

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी...

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू*

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू* रिपोर्टर✍️...