Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / *वाढदिवसानिमित्य खा....

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

*वाढदिवसानिमित्य खा. संजय राऊत यांचे रविंद्र शिंदे यांच्या हस्ते अभिष्टचिंतन* *मुंबई येथील निवासस्थानी छायाचित्रांची काष्ट प्रतिमा भेट*

*वाढदिवसानिमित्य खा. संजय राऊत यांचे रविंद्र शिंदे यांच्या हस्ते अभिष्टचिंतन*    *मुंबई येथील निवासस्थानी छायाचित्रांची काष्ट प्रतिमा भेट*

*वाढदिवसानिमित्य खा. संजय राऊत यांचे रविंद्र शिंदे यांच्या हस्ते अभिष्टचिंतन*

 

*मुंबई येथील निवासस्थानी छायाचित्रांची काष्ट प्रतिमा भेट*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

 भद्रावती / वरोरा:-शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे नेते खा. संजय राऊत यांच्या वाढदिवसा- निमित्य आज दि. १५ नोव्हेंबर रोजी शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांनी मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट घेवून त्यांचे अभिष्टचिंतन केले. याप्रसंगी शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांनी खा. संजय राऊत यांना अभिष्टचिंतना दाखल त्यांना छायाचित्रांची काष्टप्रतिमा भेट दिली. या कष्टप्रतिमात खा. संजय राऊत यांच्या प्रतिमेचा समावेश आहे.  जेव्हा खा. संजय राऊत यांना कारागृहात जावे लागले , त्यावेळी सांत्वना दाखल शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी खा. संजय राऊत यांच्या  मातोश्रीची भेट घेऊन त्यांचे सुध्दा आशिर्वाद घेतले, या क्षणाचे साक्षीदार असलेल्या काष्ठ छायाचित्रांचा सुध्दा यात  समावेश आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे ज्यावेळी खा. सजंय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणात ईडीने अटक केली. त्यावेळी खा.राऊत यांनी सत्यमेव जयते... ! ही घोषणा दिली होती. अखेर न्यायालयीन सुनावणीत सत्याचा विजय होवुन दि. ९ ॲाक्टोबर २०२२ रोजी न्यायपालिकेने खा. राऊत यांना निर्दोष मुक्तता केले.रविंद्र शिंदे यांनी खा. संजय राऊत यांच्या वाढदिवसानिमित्य अभिष्टचिंतन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच खा. संजय राऊत यांचे आशिर्वाद सुध्दा  घेतले. याप्रसंगी आमदार  सुनील राऊत, भिवंडी पश्चिम विधानसभा क्षेत्र प्रमुख आशीष बागवान, वरोरा विधानसभा क्षेत्र  प्रमुख रविंद्र शिंदे, वरोरा तालुका प्रमुख  दत्ता बोरेकर, सामाजिक कार्यकर्ते सुबोध तिवारी आणि सचिन चट्टे प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी खा. संजय राऊत यांच्या सोबत अनेक विषयांवर मनमोकळ्या चर्चा करण्यात आल्या. हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कारकिर्दी दरम्यानचे शिवसेनेचे दिवस महाराष्ट्र राज्यात परत घेवून येण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकांनी पक्षाशी एकनिष्ठ होवून कार्य करावे, असे आवाहन  खा. संजय राऊत यांच्या मार्फत समस्त शिवसैनिकांना करण्यात आले.

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

भद्रावतीतील बातम्या

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी...

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू*

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू* रिपोर्टर✍️...