Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / मध्य रेल्वे महापरिनिर्वाण...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

मध्य रेल्वे महापरिनिर्वाण दिनासाठी विशेष १४ गाड्या चालवणार

मध्य रेल्वे महापरिनिर्वाण दिनासाठी विशेष १४ गाड्या चालवणार

मध्य रेल्वे महापरिनिर्वाण दिनासाठी विशेष १४ गाड्या चालवणार

 

 

✍️ रिपोर्टर : तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर मो. ७७५६९६३५१२

 

 

( भारतीय वार्ता न्युज ) भद्रावती : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे १४ अनारक्षित विशेष गाड्या चालवणार आहे.  बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस दि. ६ डिसेंबर २०२३ रोजी आहे.  ३ विशेष नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, ६ विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/दादर ते सेवाग्राम/अजनी/नागपूर, २ विशेष कलबुरगि आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  मुंबई दरम्यान, २ विशेष सोलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान आणि १ विशेष अजनी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई  चालविण्यात येईल.

 

विशेष गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

 

(अ) नागपूर- मुंबई अनारक्षित विशेष (३)

 

१. विशेष ट्रेन क्र.  ०१२६२ नागपूर येथून दि. ४.१२.२०२३ रोजी २३.५५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १५.३० वाजता पोहोचेल.

 

२. विशेष ट्रेन क्र.  ०१२६४ दि. ५.१२.२०२३ रोजी नागपूर येथून ०८.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे त्याच दिवशी २३.४५ वाजता  पोहोचेल.

 

३. विशेष गाडी क्रमांक ०१२६६ दि. ५.१२.२०२३ रोजी नागपूर येथून १५.५० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १०.५५ वाजता पोहोचेल.

 

थांबे: नागपूर, अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, जलंब, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कसारा, कल्याण, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई.

 

संरचना:

विशेष ट्रेन क्रमांक ०१२६२ - १६ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे

विशेष ट्रेन क्रमांक ०१२६४ आणि ०१२६६ - १२ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे

 

(ब) मुंबई/दादर ते सेवाग्राम/अजनी/नागपूर अनारक्षित विशेष (६)

 

१. विशेष ट्रेन क्र.  ०१२४९ दि. ६.१२.२०२३ रोजी १६.४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि अजनी येथे दुसऱ्या दिवशी ०९.३० पोहोचेल.

 

२. विशेष ट्रेन क्र.  ०१२५१ दि. ६.१२.२०२३ रोजी १८.३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि सेवाग्राम येथे दुसऱ्या दिवशी १०.३० वाजता  पोहोचेल.

 

३. विशेष ट्रेन क्र.  ०१२५३ दि. ७.१२.२०२३ रोजी (६/७.१२.२०२३ च्या मध्यरात्री) दादर येथून ००.४० वाजता सुटेल आणि अजनी येथे त्याच दिवशी १५.५५ वाजता  पोहोचेल.

 

४. विशेष ट्रेन क्र.  ०१२५५  ७.१२ .२०२३ रोजी १२.३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०३.०० वाजता  पोहोचेल.

 

५. विशेष गाडी क्र.  ०१२५७ दि. ८.१२.२०२३ रोजी १८.३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १२.१० वाजता  पोहोचेल.

 

६. विशेष ट्रेन क्र.  ०१२५९ दि. ८.१२.२०२३ रोजी (७/८१२.२०२३ च्या मध्यरात्री) दादर येथून ००.४० सुटेल आणि अजनी येथे त्याच दिवशी १५.५५ वाजता  पोहोचेल.

 

थांबे:छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, दादर, कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, जलंब, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम, अजनी आणि नागपूर.

 

संरचना:

विशेष ट्रेन क्रमांक ०१२४९, ०१२५५, ०१२५७ आणि ०१२५९ या विशेष ट्रेनला १६ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील.

विशेष ट्रेन क्रमांक ०१२५१ आणि ०१२५३ - १२ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे

 

(क) कलबुरगि - मुंबई अनारक्षित विशेष (२)

 

१. विशेष ट्रेन क्र.  ०१२४५ कलबुरगि येथून दि. ५.१२.२०२३ रोजी १८.३० वाजता सुटेल  आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०८.२० वाजता पोहोचेल.

 

२. विशेष ट्रेन क्र.  ०१२४६ दि. ७.१२.२०२३ रोजी (६/७.१२.२०२३ च्या मध्यरात्री) ००.२५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि कलबुर्गी येथे त्याच दिवशी ११.३० वाजता  पोहोचेल.

 

थांबे: कलबुरगि, गंगापूर रोड, अक्कलकोट रोड, सोलापूर, कुर्डूवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई.

 

संरचना: ८ सामान्य द्वितीय श्रेणी

 

(ड) सोलापूर-मुंबई अनारक्षित विशेष (२)

 

१. विशेष ट्रेन क्र.  ०१२४७

दि. ५.१२.२०२३ रोजी २२.२० वाजता सोलापूर येथून सपटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ०८.२० वाजता पोहोचेल.

 

२. विशेष ट्रेन क्र.  ०१२४८ दि. ७.१२.२०२३ रोजी (६/७.२०२३ च्या मध्यरात्री) ००.२५ वाजता  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सुटेल आणि सोलापूर येथे त्याच दिवशी ०९.०० वाजता  पोहोचेल.

 

थांबे: सोलापूर, कुर्डूवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई.

 

संरचना: ९ सामान्य द्वितीय श्रेणी.

 

(इ) अजनी-मुंबई वन-वे सुपरफास्ट अनारक्षित विशेष (१)

 

१. सुपरफास्ट स्पेशल ट्रेन क्र.  ०२०४० अजनी येथून दि. ७.१२.२०२३ रोजी १३.३० वाजता सुटेल  आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ०४.१० वाजता पोहोचेल.

 

थांबे: अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई.

 

संरचना: १६ सामान्य द्वितीय श्रेणी.

 

*टीप:* मध्य रेल्वेने दि. ६.१२.२०२३ रोजी सुरू होणार्‍या ट्रेन क्रमांक ११४०१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई -आदिलाबाद एक्स्प्रेसचा प्रवास महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या फायद्यासाठी १ सामान्य द्वितीय श्रेणी कोचसह वाढवण्याचा निर्णय देखील घेतला आहे.

 

सर्व संबंधितांना विनंती आहे की कृपया या विशेष गाड्यांची नोंद घ्यावी आणि आपला प्रवास सुखकर करावा.  प्रवासादरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रवाशांनी वैध तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

----- -----

दिनांक: २५ नोव्हेंबर २०२३

प्रप क्रमांकः २०२३/११/६५

सदर प्रसिद्धी पत्रक जनसंपर्क विभाग, मध्य रेल्वे, मुख्यालय, मुंबई यांनी जारी केले आहे.

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

भद्रावतीतील बातम्या

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी...

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू*

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू* रिपोर्टर✍️...