Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / *राजकीय स्वार्थ साधणाऱ्यापासून...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

*राजकीय स्वार्थ साधणाऱ्यापासून प्रकल्पग्रस्तांनी दूर रहावे : रविंद्र शिंदे*

*राजकीय स्वार्थ साधणाऱ्यापासून प्रकल्पग्रस्तांनी दूर रहावे : रविंद्र शिंदे*

*राजकीय स्वार्थ साधणाऱ्यापासून प्रकल्पग्रस्तांनी दूर रहावे : रविंद्र शिंदे*

       

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

   

भद्रावती: प्रकल्पग्रस्तांनी स्वतः निर्णय घेवून कायदेशीर मार्गाने आपली भूमिका बजावावी, कोणत्याही दलालांच्या व जनप्रतिनिधींच्या भूलथापांना बळी पडू नये, असे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी बरांज (मोकासा) येथील प्रकल्पग्रस्तांच्या आमरण  आंदोलनाला भेट देताना म्हटले.स्थानिक बरांज (मोकासा) येथील गावाचे पुर्नवसन करीता महीला भगिनींनी आपल्या हक्काच्या मागणी करीता आंदोलन पुकारले असुन त्याचे आंदोलन हे कायदेशीर मार्गाने सुरु आहे.  दि.१४ डिसेंबर २०२३ पासुन ते दि.२६ डिसेंबर २०२३ पर्यंत त्यांचे साखळी उपोषण सुरु होते व दि. २७ डिसेंबर २०२३ पासुन प्रकल्पग्रस्त महिलांचे आमरण उपोषण सुरु आहे.रविंद्र शिंदे यांनी आज (दि.२८) ला उपोषण मंडपात भेट दिली असता आमरण उपोषण करीता सौ. पल्लवी आण्याजी कोरडे बसल्या असुन संपूर्ण गावकरी, महीला मंडळी उपोषण मंडपात बसुन होत्या. त्यांच्या तीव्र वेदना असुन लोकप्रतिनिधींचे या समस्यांकडे दुर्लक्ष असुन निव्वड स्वतःच्या स्वार्थाचे राजकारण सुरू आहे. प्रकल्पग्रस्तासमोर व जनतेसमोर थातुर मातुर आंदोलन करून मोठमोठ्या बाता केल्या. वसुल्या करणे व पैसे उचलने हा धंदा या लोकप्रितनिधीचा होता व नुकताच तो काही दिवसाअगोदर घडला. ज्या मागण्या होत्या त्या पुर्ण झाल्या नाहीत. उलट त्याच्या स्व-मागण्या पुर्ण झाल्यात.आज मी आपला भाऊ म्हणुन या उपोषण मंडपात भेट देण्यासाठी आलो असुन, माझे कार्य हे सामाजिक कार्य असुन  आपण सुध्दा माझ्या सोबत सामाजिक कार्यात आपले मोठे योगदान दिले आहे. मी मागील काही काळापासुन औद्योगिक क्षेत्रातल्या आंदोलनांकडे लक्ष दिले नाही. यांचे कारण म्हणजे अनेक आंदोलनकर्ते हे आंदोलन सुरु करतात व ते स्वतःचा आर्थिक स्वार्थ साधतात. यात अनेक राजकिय मंडळी, लोकप्रितीनिधी व दलाल लोक असतात व मुळ चळवळ मोडुन काढतात. आजपर्यंत कर्नाटक एम्टा व केपीसीएल कंपनी बाबत असेच घडले हे जनतेनी बघितले आहेतच. त्यामुळे याकडे मी दुर्लक्ष करतो, परंतु आपण माझे सोबत नेहमी लोकहितार्थ कार्यात व सामाजिक कार्यात सोबत आहात व ही चळवळ आपण महीला भगिनीनी समोर येवुन सुरु केली असल्याने मी आपल्या संकटकालीन समयी आपला भाऊ म्हणुन माझे दायित्व निभवने माझे आदर कर्तव्य समजतो त्यामुळे मी आपला भाऊ म्हणुन माझे कर्तव्य पाडण्यास आपल्या सोबत आहो. यावेळी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे भद्रावती तालुकाप्रमुख नरेंद्र पढाल, शहरप्रमुख घनश्याम आस्वले उपस्थित होते. सदर विषयी भद्रावती तहसिलदार डॉ. सोनवणे यांचेशी फोनवर चर्चा केली असता आज किंवा उद्या यासंदर्भात मिटींग बोलविण्याचे आश्वासन दिले. परंतु सदर समस्या निराकरण हे जिल्हाधिकारी करु शकतात व त्यात त्यांनी केपीसीएल यांचेशी बोलुन मार्ग काढावा याबाबत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने निवेदन सुध्दा दिले असुन हे आंदोलन कायदा सुव्यवस्था न बिघडवता शांततेच्या व कायदेशीर मार्गाने करावे असे रविंद्र शिंदे म्हणाले.या आंदोलनास शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पाठिंबा देण्यात येत असुन या आंदोलनकर्त्या महीला भगिनी सोबत सदैव पक्ष खबीरपणे उभा राहील, अशी ग्वाही दिली.

       

मी कोणत्याच पदावर नाही पण माझ्याने जेव्हढे सहकार्य होते तेव्हढे मी या आंदोलनकर्त्यांना करत राहील, असेही रविंद्र शिंदे यावेळी म्हणाले.

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

भद्रावतीतील बातम्या

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी...

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू*

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू* रिपोर्टर✍️...