Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / *प्रा. धनराज आस्वले आता...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

*प्रा. धनराज आस्वले आता स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे आजीवन अध्यक्ष तर सामाजिक कार्यकर्त्या रुपाली शिंदे सेक्रेटरी पदावर* *राजकीय क्षेत्रात सक्रिय असल्याने सामाजिक कार्य बाधित होवू नये म्हणून रविंद्र शिंदे यांचा ट्रस्टच्या अध्यक्ष पदावरून राजीनामा*

*प्रा. धनराज आस्वले आता स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे आजीवन अध्यक्ष तर सामाजिक कार्यकर्त्या रुपाली शिंदे सेक्रेटरी पदावर*    *राजकीय क्षेत्रात सक्रिय असल्याने सामाजिक कार्य बाधित होवू नये म्हणून रविंद्र शिंदे यांचा ट्रस्टच्या अध्यक्ष पदावरून राजीनामा*

*प्रा. धनराज आस्वले आता स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे आजीवन अध्यक्ष तर सामाजिक कार्यकर्त्या रुपाली शिंदे सेक्रेटरी पदावर*

 

राजकीय क्षेत्रात सक्रिय असल्याने सामाजिक कार्य बाधित होवू नये म्हणून रविंद्र शिंदे यांचा ट्रस्टच्या अध्यक्ष पदावरून राजीनामा

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

वरोरा/भद्रावती : स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था कोविड-१९ प्रादुर्भाव काळापासून आरोग्य, सामाजिक, क्रीडा, प्रबोधन, शैक्षणिक दत्तक, अभ्यासिका, व्यसनमुक्ती, महिला सक्षमीकरण, युवा योजना आदी क्षेत्रात उत्तम कार्य करून परिसरात नावारूपास आली आहे. सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे हे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते. तर प्रा. धनराज आस्वले हे कार्यकारी अध्यक्ष होते. यांच्या मार्गदर्शनात ट्रस्ट जिल्ह्यात व प्रामुख्याने वरोरा तथा भद्रावती तालुक्यात विविध क्षेत्रात जनहितार्थ कार्य करत आहे. सामाजिक कार्यासोबत राजकीय क्षेत्रात सक्रिय झाल्याने रविंद्र शिंदे यांनी ट्रस्टच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. आता ते ट्रस्टचे विश्वस्त म्हणून काम पाहत राहील व ट्रस्ट चे कार्यकारी अध्यक्ष धनराज आस्वले यांना धर्मदाय आयुक्त चंद्रपुर कार्यालयातून सर्व कायदेशीर बाबाने परवानगी घेवुन अध्यक्ष बनविण्यात आले आहे तसेच सामाजिक कार्यकर्त्या रुपाली शिंदे यांच्या कडे ट्रस्टच्या सेक्रेटरी पदाची जवाबदारी देण्यात आली आहे.राजकीय क्षेत्रात काम करीत असल्याने सामाजिक कार्य बाधित होवू नये, या उद्देशाने ट्रस्टचे अध्यक्षपद सोडल्याचे रविंद्र शिंदे म्हणाले तर ट्रस्ट अंतर्गत कार्य करण्याची इच्छा असलेल्यांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या नियमानुसार रीतसर ट्रस्ट कडे अर्ज करून ट्रस्टचे विश्वस्त म्हणून ट्रस्ट अंतर्गत सामाजिक क्षेत्रात काम करत राहील असेही ते पुढे म्हणाले.सामाजिक कार्यकर्ते प्रा. धनराज कान्होबाजी आस्वले हे  उच्चविद्या विभूषित आहेत. प्रा. धनराज कान्होबाजी आस्वले यांचा भद्रावती तालुक्यातील देऊरवाडा या गावातून प्रवास सुरू झाला. त्यांनी वाणिज्य शाखेत पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केलेले असून त्यांचे बी.एड., एम.फिल. झाले आहे. सध्या ते समाजशास्त्र विषयात एम.ए. करीत आहे. सहकार व शिक्षण क्षेत्रात त्यांच्या आयुष्याची कारकीर्द गेली. परदेशात बहरीन येथे छत्तीस वर्षे त्यांनी प्राध्यापक म्हणून नोकरी केली. जगभरात एकोणचाळीस देशांना त्यांनी भेटी दिल्या. राष्ट्रहीत व समाजहित जोपासत त्यांचे सामाजिक कार्य सुरू आहे. ट्रस्टद्वारे ग्रामीण व शहरी भागात श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियान सुरु आहे. दिव्यांगाना सायकल वाटप, कॅन्सर व दुर्धर आजारग्रस्त रुग्णांना मदतकार्य, कोरोनाने मृत, आत्महत्याग्रस्त, निराधार, गरीब गरजू पालकांच्या पाल्यांचा मोफत विवाह सोहळा, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक योजना, गावागावात अभ्यासिकेला पुस्तक भेट व आर्थिक सहकार्य, शेतकरी-शेतमजूर, पाळीव प्राणी यांना मदतकार्य, अवैध व्यवसाय मुक्त गाव अभियान, क्रीडा स्पर्धा, लघु व्यावसायिकांना मदत, आत्महत्येच्या मार्गावर असलेल्यांना धीर देण्याचे कार्य, सामाजिक जागृती हेतूने विविध बौध्दिक मार्गदर्शनपर उपक्रम, युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा स्पर्धा, आदी विविधांगी कार्य सुरू आहेत व दिवसेंदिवस ट्रस्टच्या कार्याचा आलेख वाढत आहे. अनेक लोकोपयोगी सामाजिक कार्याची भर पडत आहे व ट्रस्टचा आवाका वाढत आहे. त्यानुसार ट्रस्टला जिल्हाभरातून विविध क्षेत्रातील दिग्गजांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आले आहे.ट्रस्टच्या सेवेचा लाभ घ्यावा व सामाजिक क्षेत्रात आवड असलेल्यांनी ट्रस्ट सोबत जुडावे असे ट्रस्टचे नवे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले म्हणाले.

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

भद्रावतीतील बातम्या

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी...

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू*

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू* रिपोर्टर✍️...