Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / *केंद्र व राज्य सरकारने...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

*केंद्र व राज्य सरकारने आदिवासी समाजाला पीक कर्जाशिवात इतरही कर्ज उपलब्ध होण्यास कायदे बनवावे : रविंद्र शिंदे* *तालुक्यातील घोसरी या गावात बुढालपेन सेवा संस्थान या संस्थेमार्फत क्रांतिकारी बापूराव शेडमाके व राणी दुर्गावती जागतिक कोया संमेलन सुरू*

*केंद्र व राज्य सरकारने आदिवासी समाजाला पीक कर्जाशिवात इतरही कर्ज उपलब्ध होण्यास कायदे बनवावे : रविंद्र शिंदे*    *तालुक्यातील घोसरी या गावात बुढालपेन सेवा संस्थान या संस्थेमार्फत क्रांतिकारी बापूराव शेडमाके व राणी दुर्गावती जागतिक कोया संमेलन सुरू*

*केंद्र व राज्य सरकारने आदिवासी समाजाला पीक कर्जाशिवात इतरही कर्ज उपलब्ध होण्यास कायदे बनवावे : रविंद्र शिंदे*

 

तालुक्यातील घोसरी या गावात बुढालपेन सेवा संस्थान या संस्थेमार्फत क्रांतिकारी बापूराव शेडमाके व राणी दुर्गावती जागतिक कोया संमेलन सुरू

 

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

भद्रावती:-आदिवासी समाज हा देशातील समाजाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन चालणारा समाज आहे. आदिवासी बांधवांच या देशासाठी मोठ योगदान आहे. स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षात आजही आदिवासी समाजाच्या अनेक समस्या तशाच आहेत. आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी व इतर कामासाठी कोणतीही वित्तीय संस्था कर्ज उपलब्ध करून देत नाही. आदिवासी शेतकऱ्यांना पीक कर्जाशिवाय कोणतेही कर्ज मिळत नाही. यावर केंद्र व राज्य सरकारने निर्णय घेतला पाहिजे. आदिवासी समाजाला पूरक नविन कायदे तयार केले पाहिजे. आदिवासी बांधवांनी कोणत्याही नेत्याच्या हातचे बाहुले बनायला नको. केवळ वोटबँक म्हणून या समाजाचा वापर व्हायला नको तर आदिवासी समाज मुख्य प्रवाहात कसा येईल यासाठी सर्वांगीण प्रयत्न व्हायला हवे, असे प्रतिपादन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी काल (दि.७) ला येथे आयोजित एका कार्यक्रमात केले.तालुक्यातील चंदनखेडा, मुधोली जिल्हा परिषद गटातील घोसरी या गावात बुढालपेन सेवा संस्थान, घोसरी या संस्थेमार्फत क्रांतिकारी बापूराव शेडमाके व राणी दुर्गावती जागतिक कोया संमेलन दि.6 जानेवारी पासून सुरू झाले आहे.संमेलनाअंतर्गत ग्रामसफाई, सल्ला शक्तिस्थान, सागा समोर हळदी टिका, क्रांतिवीर बापूराव शेडमाके व राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेचे पूजन, गोंडी भजन, आदी कार्यक्रम सुरु आहेत.काल रविवारी (दि. ७ जानेवारीला) रात्री ७ वाजता गोंडी पारंपरिक नृत्य, रेकॉर्डिंग व सामूहिक गोंडी नृत्य स्पर्धा होती. या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख तथा स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर चे संस्थापक रवींद्र श्रीनिवासराव शिंदे यांनी केले. यावेळी ते बोलत होते.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख तथा नगरपरिषद भद्रावतीचे माजी नगरसेवक  नरेंद्र पढाल, तालुका युवा सेना अधिकारी राहुल मालेकर, गोंडियन आदिवासी नेता विलास परचाके, वनरक्षक निरंजन धुळे, वनरक्षक सौ. ममता सोयाम, अथर्व अमर कुडमेथे, दिवाकर पेंदाम, वनरक्षक मधुकर कोवे, वगारे, पोलीस पाटील भानुदास कुडमेथे, वडाळा ग्रामपंचायत सदस्य रवी आत्राम व संपूर्ण गावकरी मंडळी तथा आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टच्या कार्याविषयी माहिती देण्यात आली. सामाजिक प्रबोधन, आरोग्य, शैक्षणिक दत्तक आदी योजना समजून सांगितल्या. कोणतीही समस्या असेल तर ट्रस्टच्या कार्यवाहकांना भेटा आपल्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल व जीवन जगताना  आत्मविश्वासाने जगा येणाऱ्या समस्यांना पराजित होवून चालणार नाही. समस्यांचा सामना करण्यास शिका. असे मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरता संस्थेचे अध्यक्ष परमेश्वर उईके, सौरभ उईके, सचिव गणेश आडे, सहसचिव भानुदास पेंदाम, कोषाध्यक्ष राज मेश्राम, व कोषाध्यक्ष सुरज येरमे, सूत्रसंचालन शेषराव कुडुमथे, विकास तुमराम, नियोजक राजू मेश्राम, कवडू पोयाम, रमेश आडे, कवडू किनाके, रमेश आडे, विशाल येरमे व योगेश्वर येरमे आदींनी परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

भद्रावतीतील बातम्या

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी...

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू*

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू* रिपोर्टर✍️...