Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *सामाजिक सभागृह हे सामाजिक...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*सामाजिक सभागृह हे सामाजिक ऐक्याचं प्रतीक ठरावे : माजी नगराध्यक्ष अरूण धोटे*

*सामाजिक सभागृह हे सामाजिक  ऐक्याचं प्रतीक ठरावे : माजी नगराध्यक्ष अरूण धोटे*

*सामाजिक सभागृह हे सामाजिक  ऐक्याचं प्रतीक ठरावे : माजी नगराध्यक्ष अरूण धोटे*

         

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-समाजात सामाजिक ऐक्य असेल तर समाज गुन्यागोविंदाने जगू शकतो, एकमेकांना मदत करू शकतो आणि समाजावर आलेल्या कोणत्याही संकटाचा सामना करू शकतो त्याचबरोबर आपल्या लहान मुलांना सुसंस्कृत करू शकतो यासाठी समाजामध्ये सामाजिक ऐक्य गरजेचे आहे हे सामाजिक भवन सामाजिक ऐक्याचं प्रतीक ठरावे असे प्रतिपादन राजुरा न.प. चे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी भदंत संघप्रिय बहुउद्देशीय मंडळ गडचांदूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या सामाजिक सभागृह लोकार्पण सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले.  ते पुढे म्हणाले की आमदार सुभाष धोटे यांनी गडचांदूरकरांवर भरभरून प्रेम आहे गडचांदूरच्या विकासासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असून सर्व जाती धर्माच्या प्रतिकांचा तसेच गडचांदूर मधील नाली, रोड, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठीही निधी उपलब्ध करून दिला आहे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे सौंदर्यीकरण करण्यासाठीही निधी उपलब्ध करून देऊ असे सांगितले आहे, नगरपरिषद गडचांदूर साठी निधी उपलब्ध करून देऊन सर्वसमावेशक विकास करू असे ते म्हणाले.या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरूण धोटे, नगराध्यक्ष सविताताई टेकाम, नगरसेवक राहुल उमरे यांचा सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ देऊन आयोजकांकडून सत्कार करण्यात आला. या लोकार्पण सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून प्रा. कीर्तीकुमार करमणकर यांनी हे सामाजिक भवन धम्माचे संस्कार केंद्र बनावे आणि त्यातून सामाजिक ,सांस्कृतिक प्रगती करणारी पिढी जन्माला यावी असे म्हटले आहे.या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी गडचांदूर नगर परिषदेच्या अध्यक्षा सविता ताई टेकाम यांनीही या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आपले विचार करताना म्हटले आहे मेश्राम ले आउट मधील सर्वसामान्य लोकांच्या इच्छेनुरूप हे देखणं सामाजिक सभागृह या ठिकाणी उभे झाले आहे तेव्हा या सामाजिक सभागृहाचा उपयोग इथल्या लोकांनी समाज कल्याण साठी करावा असे म्हटले. डॉ. हेमचंद दूधगवळी यांनी हे सभागृह सामाजिक सांस्कृतिक चळवळीचे केंद्र बनावे व विद्यार्थ्यांना ग्रंथालय म्हणून उपयोगात यावे असे म्हटले तर प्रा. प्रशांत खैरे यांनी हे सामाजिक भवन संपूर्ण गडचांदूर वासियांना प्रेरणा केंद्र ठरावे असे प्रतिपादन केले आहे त्याचबरोबर डॉ. चरणदास मेश्राम यांनी आपले विचार व्यक्त केले तसेच नगरसेवक राहुल उमरे यांनी या सामाजिक भवनाच्या निर्मितीसाठी करावा लागलेला पाठपुरावा याबद्दल माहिती दिली या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून गडचांदूर पोलीस स्टेशनचे आत्ताच रुजू झालेले ठाणेदार राजकमल वाघमारे, अभिजीतदादा धोटे, अरविंद मेश्राम, नगरसेविका अर्चना वांढरे, कल्पना निमजे, सोमेश्वर सोनकांबळे, महेंद्र ताकसांडे, मारोती लोखंडे सर, अहमद भाई तसेच संपूर्ण भिक्खु संघ उपस्थित होते. प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते दशरथ डांगे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रसिद्ध कवी रवी ताकसांडे यांनी केले. आभार सचिव गजानन ताकसांडे यांनी मांडले आहे.या उद्घाटकीय कार्यक्रमानंतर पूज्यनीय भंते धम्म घोष महाथेरो, भंते कश्यप आणि भिख्खू संघाच्या उपस्थितीत बुद्ध मूर्तीची मेश्राम ले आउट मधून रॅली काढण्यात आली व पूज्य भंतेजीच्या हस्ते बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात आली. त्याचबरोबर सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्राचे लोकप्रिय कीर्तनकार सत्यपाल महाराजांचे शिष्य तुषार सूर्यवंशी यांचे समाज प्रबोधन पर कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला या कीर्तनासाठी मेश्राम लेआउट आणि गडचांदुरातील मोठ्या प्रमाणात प्रेक्षक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भदंत संघप्रिय बहुउद्देशीय मंडळ गडचांदूर चे घनश्याम पिपरे, रमाताई धोंगडे, गजानन ताकसांडे, सुरेश चांदेकर, तुकाराम दुर्योधन, बाळकृष्ण शेंडे, धर्मपाल गावंडे आणि मंडळाचे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट. 26 July, 2024

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट.

वणी:- वणी शहरातील भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा समाजसेवक विजय चोरडिया यांनी गोकुळ नगर येथील अपंग व्यक्तींना...

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी. 26 July, 2024

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी.

वणी :- वरोरा मार्गाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नागपुर ते चंद्रपुर व वणी करीता बसेस धावत असतात. परंतू चंद्रपुर...

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी  देण्यात यावी 26 July, 2024

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी देण्यात यावी

वणी:स्थानिक आमदार निधीतून दिव्यांग व्यक्तिकरिता 30 लाख रुपये खर्च करायचा असतो.याच निधीतून दिव्यांग व्यक्ती करिता...

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब. 25 July, 2024

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब.

वणी:- एकतरी कला असावी अंगी , तेव्हाच वाजेल जीवन जगायाची पुंगी या वाक्यप्रचारा प्रमाणे शेकडो कला लिलया अवगत करणारा...

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित 25 July, 2024

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित

वणी - होटल कोणार्क येंल बी नागपूर येथे दिनांक २१ जुलै रोजी प्रयास बहुउद्देशीय सेवा संघाचा रौप्य महोत्सव पार पडला...

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू. 25 July, 2024

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू.

वणी:- कलरचे काम करीत असताना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना आज दुपारी...

कोरपनातील बातम्या

*पशु वैद्यकीय कोरपना कार्यालय रामभरोसे*

*पशु वैद्यकीय कोरपना कार्यालय रामभरोसे* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपणा येथील पशु वैद्यकीय...

*स्व. भाऊराव वा.चटप प्राथमिक/ माध्यमिक/उच्च माध्यमिक आश्रमशाळा प्रवेश उत्सव व पालक मेळावा संपन्न*

*स्व. भाऊराव वा.चटप प्राथमिक/ माध्यमिक/उच्च माध्यमिक आश्रमशाळा प्रवेश उत्सव व पालक मेळावा संपन्न* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

जल जिवन मिशन पिपर्डा नळयोजनेचे काम निकृष्ठ चौकशीची मागणी

जल जिवन मिशन पिपर्डा नळयोजनेचे काम निकृष्ठ चौकशीची मागणी ✍️दिनेश झाडे कोरपना पिपडा:- महाराष्ट्र शासनाच्या...