Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / घुग्घुस येथे छापती...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

घुग्घुस येथे छापती शिवाजी महाराज जयंती साजरी

     घुग्घुस येथे  छापती शिवाजी महाराज जयंती साजरी

 

वंचित बहुजन आघाडी घुग्घुस

 

घुग्घुस 

दि.19 फेब्रुवारी 2024 रोजी वंचित बहुजन आघाडी घुग्घुस शहर च्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

या कार्यक्रमाला उपस्थित झालेले प्रमुख पाहुणे चंद्रपूर जिल्हा महासचिव अँड. अक्षय लोहकरे तालुका अध्यक्ष धर्मेंद्र शेंडे व घुग्घुस शहर अध्यक्ष शरद पाईकराव यांनी आपले मनोगत वेक्त केले.

 

महाराष्ट्राचे अराध्य दैवत  स्वराज्याचे  संस्थापक, जाणता राजा,रयतेवर जीवापाड प्रेम करणारा असा रयतेचा राजा ,  महाराष्ट्रातील महान मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती (19 फेब्रुवारी)  शिवजयंती म्हणून सर्वत्र आनंदात आणि जल्लोषात साजरी केली जाते

 

 

ज्याने आपल्या स्वतःच्या पराक्रमाने, शौर्याने, धाडसाने आणि जिद्दीने  मुठभर मावळ्यांच्या जोरावर महाराष्ट्र भूमीवर भगवा फडकवला.त्यावेळी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ माजवत होत्या. मुघलांच्या कैदेत लाखो मराठा सैनिक खितपत पडले होते. स्त्रियांची अब्रु लुटली जात होती. अनेक बायकांचा कुंकवाचा धनी मारला जात होता. शेतकऱ्यांच्या कोणी कैवारी उरला नव्हता. अशा या परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक झंकार, जगमता पेटता अंगार ,एक ज्वालामूखी आणि अखेर ती वेळ आली.

सहियाद्रीची गर्जना झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी वर एक तारा चमकला. जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला. मानाचा मुजरा करतो शिवाजी महाराजाला. ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला ज्यांनी

शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला म्हणून त्यांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते आणि आईचे नाव जिजाई भोसले होते.शिवराय लहानपणा पासूनच अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते. बालवयातच त्यांनी अनेक युद्ध कलांचे प्रशिक्षण घेतले.

 

 

वयाच्या सोळाव्या वर्षापासून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. अत्यंत कमी वयात शिवरायांनी हे धाडस केले आणि ते माझ्या राजाने पूर्णत्वास नेले. यासाठी त्यांनी पुणे, मावळ यासारख्या आसपासच्या प्रांतात स्वतः फिरून  सर्वसामान्य लोकांच्या समस्या समजावून घेतल्या. त्यांच्या मनात स्वराज्य बद्दल आस्था निर्माण केली आणि रायरेश्वराच्या मंदिरातून जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून  स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली

 

 

मित्रांनो त्यावेळी स्वराज्याची निर्मिती करणे काही सोपी गोष्ट नव्हती. बलाढ्य शत्रू त्यासाठी अनेक मावळ्यांनी आपले प्राण पणाला लावले होते. त्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी देशपांडे, नेताजी पालकर कोंडाजी फर्जद ,शिवा काशिद,मुरारबाजी, येसाजी कंक,अशा अनेक शूर वीरांनी आपल्या महाराजांना साथ दिली होती. शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांसोबत नेहमी प्रेमाने व आपुलकीने वागत असत. उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता घरदार विसरून शिवाजी महाराज व मावळे स्वराज्यासाठी दिवस-रात्र झटायचे. म्हणूनच

 

 

मित्रांनो शिवरायांनी आपल्या चतुर बुद्धीने आणि मावळ्यांच्या साथीने  समोरील बलाढ्य शत्रूला म्हणजेच अफजल खान, औरंगजेब, शाहिस्तेखान अशा अनेक शत्रूला हरवून टाकले.आणि आई जिजाऊंनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न त्यांनी सत्यात उतरविले.शिवाजी महाराजांनी अनेक गड जिंकले व शत्रुंचा नाश करुन हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना केली

 

असे आपले विचार मांडून हा कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.  या वेळी उपस्थित घुग्घुस शहर अध्यक्ष शरद पाईकराव उपाध्यक्ष जगदीश मरबाते दत्ता वाघमारे महासचिव योगेश नगराळे कोषाध्यक्ष अशोक भगत संघटक राकेश पारशीवे it शेल प्रमुख आशिष परेकर आशिष हटकर अमर भगत अमन व समस्त वंचित बहुजन आघाडी घुग्घुस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

ताज्या बातम्या

स्वर्णलीलाची जिनेशा लोढा दहावीत तर ओम आकुलवार बारावीत अव्वल. 13 May, 2024

स्वर्णलीलाची जिनेशा लोढा दहावीत तर ओम आकुलवार बारावीत अव्वल.

वणी :- केंद्रीय शिक्षण मंडळाने दहावी व बारावी चा निकाल ऑनलाईन जाहीर केला. यात येथील स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल शाळेने...

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम. 13 May, 2024

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम.

वणी.- स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलने उज्वल यशाची परंपरा कायम राखत या वर्षीही दहावी...

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*                                    13 May, 2024

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ  सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा. 13 May, 2024

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा.

उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतं असल्याने शहराला उन्हाच्या चटक्या बरोबर पाणी टंचाईच्या झळा सुध्दा सोसाव्या लागत...

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

घुग्गुसतील बातम्या

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

पद्मशाली समाजाच्या वतीने विवेक बोढे यांचा सत्कार

घुग्घुस येथील पद्मशाली समाजाच्या वतीने नवनियुक्त भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी...