Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / एसीसी सिमेंट कंपनीविरोधात...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

एसीसी सिमेंट कंपनीविरोधात एकवटले उसगाव, नकोडा व घुग्घुसचे ग्रामस्थ

एसीसी सिमेंट कंपनीविरोधात एकवटले उसगाव, नकोडा व घुग्घुसचे ग्रामस्थ

 

 

उसगावचा रस्ता पूर्ववत सुरु न केल्यास आंदोलनाचा इशारा

 

घुग्घुस:

 

येथून जवळच असलेल्या एसीसी सिमेंट कंपनी ते उसगाव पर्यंतच्या रस्त्याची गुरुवार, २२ फेब्रुवारी रोजी राजुरा विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे, उपविभागीय अधिकारी रंजित यादव, तहसीलदार विजय पवार, भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, काँग्रेस नेते रोशन पचारे, माजी जि.प.सभापती नितु चौधरी, नकोडा सरपंच किरण बांदूरकर, उसगाव सरपंच निविता ठाकरे, न.प.चे मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रकाश अमरशेट्टीवार, संध्या बोधनवार, प्रभारी ठाणेदार प्रशांत साखरे व उसगाव, नकोडा आणि घुग्घुसच्या ग्रामस्थांनी पाहणी केली.

 

उसगाव येथील ५० ते ६० वर्षापासून सुरु असलेला रस्ता ग्रामपंचायतची पूर्वपरवानगी न घेता तसेच गावकऱ्यांना विश्वासात न घेताच एसीसी कंपनीने बंद केला.

 

त्याअनुषंगाने यासंदर्भात उसगाव येथे प्रशासनाची, उसगाव, नकोडा घुग्घुस ग्रामस्थांची आणि एसीसी कंपनी व्यवस्थापनाची बैठक पार पडली. बैठकीत दोन दिवसात प्रशासनातर्फे उसगावचा रस्ता पूर्ववत सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रसंगी बोलतांना राजुरा विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे म्हणाले, उसगावचा रस्ता पूर्ववत सुरु करण्यासाठी एसीसी सिमेंट कंपनीला प्रशासनातर्फे आदेश देण्यात आले होते परंतु एसीसी सिमेंट कंपनीने मुजोरी करीत हा रस्ता सुरु केला नाही एसीसी सिमेंट कंपनीची दडपशाही कदापी सहन केली जाणार नाही. दोन दिवसात उसगावचा रस्ता पूर्ववत सुरु केला नाहीतर एसीसी सिमेंट कंपनीविरुद्ध आंदोलन करण्यात येईल.

 

यावेळी घुग्घुसचे माजी सरपंच संतोष नुने, नकोडा उपसरपंच मंगेश राजगडकर, काँग्रेस नेते प्रेमानंद जोगी, माजी पं. स. सभापती वर्षा ताजने, सिनू इसारप, साजन गोहने, वैशाली ढवस, अमोल थेरे, विनोद चौधरी, धनंजय ठाकरे, रत्नेश सिंग, शाम आगदारी, श्रीकांत सावे, मानस सिंग, तुलसीदास ढवस, विनोद जंजर्ला, वमशी महाकाली, विवेक तिवारी व मोठया संख्येत नागरिक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

स्वर्णलीलाची जिनेशा लोढा दहावीत तर ओम आकुलवार बारावीत अव्वल. 13 May, 2024

स्वर्णलीलाची जिनेशा लोढा दहावीत तर ओम आकुलवार बारावीत अव्वल.

वणी :- केंद्रीय शिक्षण मंडळाने दहावी व बारावी चा निकाल ऑनलाईन जाहीर केला. यात येथील स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल शाळेने...

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम. 13 May, 2024

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम.

वणी.- स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलने उज्वल यशाची परंपरा कायम राखत या वर्षीही दहावी...

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*                                    13 May, 2024

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ  सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा. 13 May, 2024

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा.

उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतं असल्याने शहराला उन्हाच्या चटक्या बरोबर पाणी टंचाईच्या झळा सुध्दा सोसाव्या लागत...

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

घुग्गुसतील बातम्या

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

पद्मशाली समाजाच्या वतीने विवेक बोढे यांचा सत्कार

घुग्घुस येथील पद्मशाली समाजाच्या वतीने नवनियुक्त भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी...