Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *आमदार सुभाष धोटेंच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*आमदार सुभाष धोटेंच्या मागणीला यश : त्या ३२३ अंगणवाडी सेविकांना जिल्हास्तरावर लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा* *२२० लाभार्थ्यांची देयके अदा तर उर्वरित १०३ सेविकांनाही मिळणार लाभ*

*आमदार सुभाष धोटेंच्या मागणीला यश : त्या ३२३ अंगणवाडी सेविकांना  जिल्हास्तरावर लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा*    *२२० लाभार्थ्यांची देयके अदा तर उर्वरित १०३ सेविकांनाही मिळणार लाभ*

*आमदार सुभाष धोटेंच्या मागणीला यश : त्या ३२३ अंगणवाडी सेविकांना  जिल्हास्तरावर लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा*

 

२२० लाभार्थ्यांची देयके अदा तर उर्वरित १०३ सेविकांनाही मिळणार लाभ

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा:-- चंद्रपूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त अंगनवाडी सेविका व मदतनिस यांनी आ. सुभाष धोटे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे सेवा निवृत्ती नंतरचा लाभांश विमा कंपनीकडून मिळत नसल्याने तो लाभ मिळवून देण्याची मागणी केली. सदर गंभीर बाब लक्षात घेऊन आ. सुभाष धोटे यांनी एकूण ३२३ प्रलंबित सेवानिवृत्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे रखडलेले देयके तातडीने जिल्हा स्तरावर अदा करण्याचे तसेच येणाऱ्या काळात सर्व सेवानिवृत्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जिल्हा स्तरावरूनच लाभ देण्याचे निर्देश संबधीताना देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्राचे महिला व बालकल्याण विभागाचे प्रधान सचिव अनुपकूमार यादव यांच्याकडे  केली होती.  राज्य शासनाने विमाकंपनी सोबतचा करार रद्द करून या कर्मचाऱ्यांना जिल्हा स्तरावर सेवानिवृत्तीपर लाभांश देण्याची मागणी आयुक्त महिला बालकल्याण सेवा योजना, मुंबई, मुख्य कार्यपालन अधिकारी, चंद्रपूर यांच्याकडेही सातत्याने लावून धरली होती. अखेर  विमा कंपनी सोबतचा करार रद्द करून तो लाभांश एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत जिल्हा स्तरावरून देण्याबाबत निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आ. सुभाष धोटे यांच्या पाठपुराव्यामुळे आयुक्त कार्यालय एकात्मिक बालविकास सेवा योजना मुंबई यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांचेकडे दिनांक १ एप्रिल २०२२ पासून प्रलंबित असलेली सेवानिवृत्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे देयके अदा करण्यासाठी १ कोटी रुपये निधी मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्याकडे वर्ग केला असून एलआयसी कडे प्रलंबित असलेल्या ३२३ पैकी २२० लाभार्थ्यांचे ध्येयके अदा करण्यात आलेली आहेत आणि उर्वरित १०३ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना लवकरच त्यांचा लाभांश निधी लवकरच उपलब्ध होणार असल्याची खात्रीदायक माहिती आहे. यामुळे जिल्हातील सेवानिवृत्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आ. सुभाष धोटे यांचे विशेष आभार मानले आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, वयाची ६५ वर्ष पुर्ण झाल्यामुळे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अतंर्गत अंगनवाडी सेविका व मदतनिस म्हणुन कार्यरत असतांना अनेक अंगनवाडी सेविका व मदतनिस यांना मानधनी पदावरून त्यांचे वयाची ६५ वर्ष पूर्ण झाल्याने सेवानिवृत्त करण्यात आले आहे. मात्र संबंधित विभागाकडून १० ते १५ वर्षे उलटूनही अनेकांना सेवा निवृत्ती नंतरचा लाभांश देण्यात आलेला नाही. यातील काही कर्मचाऱ्यांवर व कुटुंबीयांवर वृद्धापकाळामुळे उपासमारीची वेळ उद्भवलेली आहे. अनेक सेवानिवृत्त कर्मचारी मयत सुद्धा झालेले आहेत. त्यामुळे वृद्ध कर्मचाऱ्यांमध्ये शासनाचे धोरनाप्रती तीव्र असंतोष होता. जिल्हातील १४९ सेवानिवृत्त, ८६ मय्यत, ३४ राजीनामा व ५४ NFT Return असे एकूण ३२३ प्रलंबित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे देयक अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. याबाबत आमदार सुभाष धोटे यांनी महाराष्ट्राचे संबधित विभागाचे मंत्री, सचिव, आयुक्त यांचेकडे अनेकदा पाठपुरा केला. तसेच विधानसभेत विविध आयुधांच्या माध्यमातून रखडलेला प्रश्न सोडविण्यास भाग पाडले. अखेर सर्व सेवानिवृत्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मोठी अडचण आ. सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने दूर झाली असून सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे.

ताज्या बातम्या

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

राजुरातील बातम्या

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

*आमदार सुभाष धोटेंनी घेतला बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा क्लास : अर्धवट बांधकामे ३० मे पर्यंत पुर्ण करण्याचे दिले निर्देश*

*आमदार सुभाष धोटेंनी घेतला बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा क्लास : अर्धवट बांधकामे ३० मे पर्यंत पुर्ण करण्याचे दिले...