Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *ग्रील कंपनीचे अवैद्यरित्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*ग्रील कंपनीचे अवैद्यरित्या मुरूम वाहतूक करणारे पाच हायवा ताब्यात* *कोरपना पोलिसाची धडक कारवाई*

*ग्रील कंपनीचे अवैद्यरित्या मुरूम वाहतूक करणारे पाच हायवा ताब्यात*    *कोरपना पोलिसाची धडक कारवाई*

*ग्रील कंपनीचे अवैद्यरित्या मुरूम वाहतूक करणारे पाच हायवा ताब्यात*

 

*कोरपना पोलिसाची धडक कारवाई*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-अवैधरित्या बेलगामपणे दिवसरात्र विना परवानगी मुरूम वाहतूक करणाऱ्या ग्रील कंपनीचे पाच हायवा कुसळ मार्गावरून शुक्रवार दिनांक ८ ला रात्रौ साडे दहा वाजता दरम्यान ताब्यात घेण्यात आले.कोरपना पोलिसांकडून पेट्रोलिंग करीत असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ बी चे काम असलेले ग्रील कंपनीचे हायवा अवैध रित्या मुरूम भरून कोरपना कडे घेऊन जात आहे अशी गुप्त माहिती कोरपना पोलिसांना मिळाली. लागलीच कोरपनाचे पोलीस निरीक्षक संदीप एकाडे यांनी आपल्या सह कर्मचाऱ्यासह माथा फाटा येथे जाऊन नाकाबंदी केली. दरम्यान कुसळ रोडनी मुरूम भरलेले एका पाठोपाठ एक  यु पी ७० जे टी ९०४५ , यू पी ७० जे टी ९०४६, एम एच २४ ए यू ५९३१, एम एच ३४ बी झेड ४८८० ,एम एच २४ ए व्हीं १९५० क्रमांकाचे पाच हायवा येत असताना थांबविले. चालकांना रात्रौ दरम्यान वाहतूक करण्याची परवानगी आहे का याबाबत विचारणा करून कागदपत्र मागवण्यात आले. सदर चालकाकडे कोणतेही कागदपत्र उपलब्ध नव्हते. त्या अनुषंगाने कोरपनाचे तहसीलदार पी एस व्हटकर यांना माहिती देण्यात आली.तसेच कोरपना तहसील कार्यालयात सदर वाहने आणून देऊन पुढील कार्यवाही साठी ताब्यात देण्यात आले. यापूर्वी ही ग्रील कंपनीच्या अवैध रित्या वाहतूक करणाऱ्या वाहनावर महसूल विभाग व पोलिसांनी धडक कारवाई केली होती. त्यातच पुन्हा हा मुजोरीने प्रकार चालू असताना कोरपना पोलिसांनी ही कारवाई केल्याने ग्रील कंपनीचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

ताज्या बातम्या

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

कोरपनातील बातम्या

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...