*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता :
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी राजे भोसले छत्रपती ह्या काळा राममंदिर नाशिक येथे श्रीराम दर्शन व अन्य धार्मिक विधी साठी गेल्या होत्या . त्यावेळी त्यांनी विधी साठी नेमलेल्या पुजारी पुरोहित भटजी ब्राह्मण यांनी वेदोक्त मंत्र ऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणत विधी सुरू केले होते . युवराज्ञी संयोगिता राजे यांच्या ही बाब लक्षात आली . त्यांनी पुरोहितास थांबवून वेदोक्त मंत्रांचा जप करावा अशी सूचना केली होती . परंतू ब्राह्मण पुरोहितांनी ती सूचना युवराज्ञी संयोगिता राजे शूद्र असल्याने मान्य केली नाही . यात पुरोहितांनी युवराज्ञी संयोगिता राजे यांचा उघडपणे अपमान केला होता हे स्पष्ट होते . त्यामुळे तेथेच थोडेफार वादविवाद झाले ... आणि युवराज्ञी संयोगिता राजे यांनी काळा राम मंदिर परिसर सोडला . असे असले तरी युवराज्ञी संयोगिता राजे यांनी तत्कालीन परिस्थितीत तो अपमान गिळून वातावरण शांत ठेवले असे लक्षात येते ... मराठा सेवा संघ काळा राम मंदिर मधील या दुरघटनेचा जाहीर निषेध करुन महाराष्ट्रातील सर्व हिंदू मंदिरातील ब्राह्मण पुरोहित हटविण्याची व बहुजन समाजातील मुले-मुली पुजारी व सेवक पदावर नेमण्याची मागणी करत आहे .
दोन दिवसांपूर्वी एका सोशल मीडिया ग्रुप वर युवराज्ञी संयोगिता राजे यांची ह्या संतापजनक घटनेची माहिती देणारी पोस्ट वाचनात आली . सर्वप्रथम आम्ही मराठा सेवा संघाच्या वतीने काळा राम मंदिर नाशिक येथील सर्व पुरोहित भटजी ब्राह्मण वर्गाचा जाहीर निषेध करतो . सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी असेच वेदोक्त प्रकरण राजर्षी शाहू महाराज यांच्या बाबतीत कोल्हापूर येथे निर्माण झाले होते . वर्तमान काळात भारतीय संविधान आणि लोकशाहीच्या राज्यात पुन्हा एकदा त्याच घराण्यातील युवराज्ञी संयोगिता राजे यांना तशाच विधी प्रकरणाला तोंड द्यावे लागते ही बाब निषेधार्थ व गंभीर असून संविधान विरोधी आहे . यावरून छत्रपती घराण्यातील युवराज्ञी बाबतीत जर असे प्रकार घडत असतील तर सामान्य जनतेच्या बाबतीत किती क्रुरपणा होत असेल याची कल्पनाही करवत नाही ..
या पार्श्वभूमीवर मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आमची जाहीर मागणी आहे की , महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व हिंदू मंदिरातील वंश परंपरागत सुरू असलेली भटजी पुरोहित ब्राह्मण यांची विधी व अन्य मक्तेदारी संपुष्टात आणावी . तसेच सर्व मंदिरात भाविकांची गर्दी व कुचंबणा टाळण्यासाठी मंडल आयोगाच्या नुसार बहुजन समाजातील पुजारी नेमावेत . श्रीविठ्ठल मंदिर पंढरपूर येथे अशी सुविधा उपलब्ध झाली आहे . तरी राज्यभरातील सर्व लहानमोठ्या मंदीरात बहुजन समाजातील पुजारी व सेवक नेमण्याची प्रक्रिया त्वरित हाती घेण्यात यावी . अन्यथा हा भारतीय संविधानाचा अपमान होत आहे असे मानले जाईल ..
या निमित्ताने एक महत्वाची बाब लक्षात घेणे गरजेचे वाटते . राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळण्याची मागणी केली असता मराठा समाज सवर्ण पुढारलेला क्षत्रिय समाज असल्याचे सांगून आरक्षण नाकारले जाते . तर जेंव्हा जेंव्हा धार्मिक अधिकारांचा वापर करण्याची मागणी केली जाते तेंव्हा तेंव्हा मराठा समाज शूद्र ठरविला जातो . यावरून मराठा समाजाची सार्वजनिक कुचंबणा होत आहे असे म्हणायला हरकत नाही .. हीच खेळी अन्य बहुजन समाजातील सर्व घटकांच्या बाबतीत वापरली जाते व सामाजिक कटुता निर्माण केली जाते ... बहुजन समाजाला जागृत व सावधान राहण्याची गरज आहे .
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन वेळी प्रवेशाचा अधिकार मिळाला पाहिजे अशी मागणी होती . आता युवराज्ञी संयोगिता राजे यांच्या वेदोक्त प्रकरणामुळे महाराष्ट्रातील सर्व हिंदू मंदिरामध्ये सरसकट सर्व हिंदू समाजातील स्त्री व पुरुष यांना मुक्त प्रवेश मिळण्यासह तेथे बहुजन समाजातील स्त्रिया व पुरुष यांना पुजारी व सेवक पदावर नेमण्याची मागणी आहे . महाराष्ट्रात वाढलेली बेरोजगारी पाहता सर्वच मंदिरात बहुजन पुजारी व सेवक नियुक्त केले तर कमीत कमी दोन लाख रोजगार उपलब्ध होईल . याची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष कायदा व नियम करावेत अशी मराठा सेवा संघ जाहीर मागणी करत आहे . तसेच यासाठी सर्वांनीच एकत्रित येऊन मोठे जन आंदोलन करण्याची गरज निर्माण झाली आहे ..
सध्या केंद्र स्थानी व बहुतांशी राज्यात हिंदुत्ववादी विचारधारा मानणारे सरकार आहे . सर्व हिंदू एक !!! असे नारे दिले जात आहेत . पण व्यवहारात तसे होत नाही . या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने व विशेषतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन एससी एसटी ओबीसी ओपन घटकांना अपेक्षित समता व समन्यायी धर्माधिकार मिळण्यासाठी भारतातील सर्वच हिंदू मंदिरे भटमुक्त करण्याचा निर्णय घेऊन त्वरित अंमलात आणावा ही विनंती आहे . अखिल भारतीय पातळीवर सर्वच मंदिरात सुमारे पंचवीस लाख बहुजन पुजारी व सेवक नियुक्त केले जाऊ शकतात . यामुळे सर्वच हिंदू समाज आनंदीत होईल . कृपया राज्य व केंद्र सरकारने गंभीरपणे दखल घेऊन योग्य निर्णय घ्यावा ही विनंती आहे .
--++ पुरुषोत्तम खेडेकर चिखली .
संस्थापक अध्यक्ष ,
मराठा सेवा संघ .
दिनांक ... १ एप्रिल २०२३ .
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*आ. सुभाष धोटेंनी घेतला ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामाचा आढावा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...
*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...
वणी:- वणी ते नांदेपेरा रस्त्यावरील स्वर्णलीला शाळेसमोरील धोकादायक विद्युत वाहिनी पोल तात्काळ सरळ करून लोंबकळलेल्या...
वणी:- संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक ७ सप्टेंबर पासून घरोघरी तसेच गावागावात श्री गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात करण्यात...
वणी : यवतमाळ जिल्ह्यात वणी हे गाव महत्वपूर्ण शहर असून, वणी शहर हे वेकोलीच्या खदानी मुळे येथील बाजारपेठ ही मोठ्या प्रमाणात...
*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...
भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...
जगदीश का. काशिकर,कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ *ग्राहक...