Tranding

Reg No. MH-36-0010493

Saturday May 11, 2024

43.14

Home / यवतमाळ-जिल्हा / घाटंजी / तेली समाज महासंघ घाटंजीच्या...

यवतमाळ-जिल्हा    |    घाटंजी

तेली समाज महासंघ घाटंजीच्या वतिने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव आणि सामाजिक कार्यकर्ते सत्कार सोहळा संपन्न

तेली समाज महासंघ घाटंजीच्या वतिने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव आणि सामाजिक कार्यकर्ते सत्कार सोहळा संपन्न
ads images

घाटंजी: काल दि. १४ नोव्हेंबर रोज रविवार ला तेली समाज महासंघ आणि श्री संताजी बहुउद्देशीय विकास संस्था घाटंजीच्यावतिने सन १९- २० आणि २० - २१ या शैक्षणिक सत्रातील वर्ग १० वी, १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि सामाजिक क्षेत्रात विशेष कामगीरी करणारे सामाजिक कार्यकर्ते, सेवानिवृत कर्मचारी, यूवा उद्योजक, प्रगतिशील शेतकरी आणि नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार समारंभ पार पडला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. सतिषभाऊ मलकापूरे यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी एस. पी. एम विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री. देविदासजी टोंगे, घाटंजी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी दिपीकाताई गुल्हाणे, घाटंजी न. प. च्या माजी अध्यक्षा सौ. दुर्गाताई साखरकर, बहिरम देवस्थानचे अध्यक्ष श्री. दिगांबरराव राजगुरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री. अजयराव डेहनकर,दहेगावचे सरपंच श्री. शंकररावजी लाकडे सर, प्रा. श्री. गजाननराव कापसे सर, श्री. विष्णुजी नित सर, शहर अध्यक्ष श्री. प्रशांतभाऊ नित, श्री. संताजी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. वर्षाताई सुनिलराव बुटले यांची उपस्थिती लाभली.

शैक्षणिक सत्र २०१९ - २० मधिल वर्ग १० वी चे गुणवंत विद्यार्थी प्रथमेश खाडे, रागीनी वडे, कोमल गुल्हाणे, वृशाली साखरकर, साहिल गुल्हाणे,१२ वी चे विद्यार्थी रोहन गोबाडे

शैक्षणिक सत्र २०२० - २१ मधिल वर्ग १० चे गुणवंत विद्यार्थी ऋतुजा क्षीरसागर, सार्थक डेहनकर, ओम देऊळकर, संस्कृती कापसे, श्रेयश्री बोंद्रे, कनिष्क बुटले, वैष्णवी देवळे, रिया साखरकर, लक्ष्मी गुल्हाणे, वैष्णवी वडे, रोहन नित,वर्ग १२ वी चे विद्यार्थी रितेश उपाते, यथार्थ गोबाडे, हर्षद क्षीरसागर, तनय क्षीरसागर, मयूर कठाणे,संतोषी वडे, साकेत ढोले या गुणवंतांचा गुणगौरव करण्यात आला. सेवानिवृत्त कर्मचारी म्हणून श्री. शंकररावजी लाकडे सर, श्रीरामजी गुल्हाणे, यूवा उद्योजक सुनीलभाऊ बुटले, प्रशांत चावरे, विश्वास चावरे, प्रगतिशील शेतकरी श्री. स़ंतोष गोल्लर, नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य श्री. वीजयराव गोबाडे, श्री. नरेंद्र ढवळे, सौ. कापसे, श्री. अमोलभाऊ डेहनकर, श्री. साखरकर यांचा सत्कार करण्यात आला.

शोषित, पिडीत,अनाथ, अपंग, शेतकरी, शेतमजूर, यांच्यासाठी सामाजिक न्यायाचा लढा उभारणारे शेतकरी नेते श्री. मोरेश्वरभाऊ वातिले, सामाजिक कार्यकर्ते श्री. महेशभाऊ पवार,समाजभूषण, लोककलावंत श्री. मामा मरगडे, सतरा वर्ष अविरत देशसेवा करुन नुकतेच निवृत्त झालेले भारतीय सैनिक श्री. किरणभाऊ वाढई, भूकेलेल्यांना अविरत अन्नदान करून मानवतेची सेवा करणारे श्री. सुरजभाऊ हेमके यांना शाल, श्रीफळ आणि संताजी महाराजांची प्रतीमा भेट देवून तेली समाज महासंघाच्या वतिने मान्यवरांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. राजेंद्र गोबाडे यांनी केले, संचालन श्री. वीजयराव बोंद्रे आणि आभार प्रदर्शन श्री. विठ्ठलराव पारखे सर यांनी केले. गुणगौरव आणि सत्कार सोहळ्याच्या यशस्वितेसाठी आशिषभाऊ साखरकर परसरामजी साखरकर, गजूभाऊ ढवळे,अनंतरावजी चावरे,केशवराय गोल्लर, विठ्ठलराव लाकडे,रविंद्रभाऊ उमाटे, मदनभाऊ देऊळकर, विलासराव कठाणे, दिपकराव नीत, गोलूभाऊ फूसे,धनराज गुल्हाणे, सुनिलभाऊ बुटले, नितिनभाऊ गोल्लर, महेशभाऊ गोल्लर, अजय कलांद्रे, आशिष सावरकर,अनिलभाऊ कलोडे, गजानन काळे,किशोर वाडे,अमोलभाऊ चरडे, वासुभाऊ गोबाडे यांनी मोलाचे सहकार्य केले.या कार्यक्रमासाठी समाजबांधव उपस्थित होते.

ads images

ताज्या बातम्या

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन. 11 May, 2024

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन.

वणी:- अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री. धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पत संस्था, वणी रजि.नं.११६२ चा स्थानांतरण व...

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

घाटंजीतील बातम्या

घाटंजी शिक्षणविभागाचा अभिनव उपक्रम-'जागर नारीशक्तीचा'

घाटंजी: वैविध्यपुर्ण शैक्षणिक व सामाजिक उपक्रमासाठी जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या घाटंजीच्या शिक्षण विभागाने नवरात्रीच्या...