Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / राळेगाव येथे रास्ता...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

राळेगाव येथे रास्ता रोको आंदोलन, यशस्वी !

राळेगाव येथे रास्ता रोको आंदोलन, यशस्वी !
ads images

आदिवासी महामंडळ उपाध्यक्ष वसंतरावजी पूरके यांची उपस्थिती

प्रविण गायकवाड (राळेगाव प्रतिनिधी): उत्तरप्रदेशातील लखीमपुर खीरी येथे शेतकरी आंदोलनाला दहशतीने चिरडून टाकणाऱ्या केंद्र सरकारच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून पुकारलेल्या बंदला राळेगाव येथील व्यापाऱ्यांनी संमिश्र असा प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठाने काही प्रमाणात स्वयंस्फूर्तीने बंद ठेवत पाठिंबा दिला.

न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांना भाजपाच्या योगी सरकार कडून व केंद्रीय मंत्र्यांच्या मुलांकडून चिरडून टाकल्याच्या घटनेचां संपूर्ण देशभरात सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे. भाजप सरकारचे हे कृत्य हिटलर व मुसोलिनीलाही लाजवेल अशा प्रकारचे आहे. शेतकर्‍यांचा सामुहिक नरसंहार करणाऱ्या भाजप सरकार विरोधात संपूर्ण देशभर आंदोलने सुरू आहे.

राळेगाव शहरात सकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बंद साठी व्यापाऱ्यांना आग्रह न धरता यवतमाळ चौफुली येथे जवळपास एक तास रास्ता रोको आंदोलन करून लखीमपूर येथील घटनेचा तीव्र निषेध नोंदविला.

आदिवासी विकास मंडळ नाशिक उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) वसंतरावजी पुरके यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अरविंदभाऊ फुटाने, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळूभाऊ धुमाळ, शिवसेनेचे तालुका प्रमुख विनोदभाऊ काकडे, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रदीपभाऊ ठूणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाशभाऊ खुडसंगे, शिवसेनेचे शहर प्रमुख राकेशभाऊ राऊळकर, काँग्रेसचे नेते जानरावभाऊ गिरी, प्रसादभाऊ ठाकरे, अजिंक्यभाऊ वैद्य, अफसर अली सैयद, मंगेशभाऊ राऊत, दिलीपजी कन्नाके, गिरीधरजी ससनकर, भानुदासजी राऊत, श्रीधरजी थूटूरकर, संदीपजी पेंदोर, तेजसजी ठाकरे, सौरभजी पारिसे, प्रशांतजी काटकर, मंगेशजी पिंपरे,मधुकरराव राजूरकर, इम्रान पठाण, रउफ शेख, महादेव लांबाडे, मनोज पेंदोर, वसंत पोतफोडे, किशोर दोडके, मनिष कोपरे, प्रज्वल काळे, प्रणय गवळी, राहुल बहाळे, कुंदन कांबळे, प्रफुल खसाळे, बाळु दरणे, बादशाह काजी, शुभम चिडाम,  प्रदीप पिंपरे, सलमान सय्यद, आकाश भोकरे या सह महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...