Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / नियमावलीत शिथिलता,...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

नियमावलीत शिथिलता, कृषी सेवा केंद्रांच्या वेळात मोठा बदल

नियमावलीत शिथिलता, कृषी सेवा केंद्रांच्या वेळात मोठा बदल
ads images

सकाळी ७ ते सायंकाळी ७ सुरूराहनार

वणी:   कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्यात ब्रेक द चैन अंतर्गत लॉकडाऊनची नवीन नियमावली लागू करण्यात आली. मागील काही दिवस कडक निर्बंध लागू केल्यानंतर आता कोरोना संक्रमणाचा वेग कमी झाल्याने नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली असून अत्यावश्यक सेवेतील दुकानांबरोबरच इतरही दुकानांना सुरु करण्यास अनुमती देण्यात आली आहे. बाजरपेठेच्या वेळांमध्ये बदल करून दुपारी दोन वाजेपर्यंत वेळ वाढवून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कृषी केंद्रांची वेळ सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत करण्यात आली होती. परंतु खरिपाचा तोंडावर आलेला हंगाम लक्षात घेता कृषी केंद्रांच्या वेळेत मोठा बदल करण्यात आला असून कृषी सेवा केंद्रे आता सकाळी ७ ते सायं. ७ वाजे पर्यंत सुरु ठेवण्यास प्रशासनाकडून अनुमती देण्यात आली आहे. 

ब्रेक द चैन अंतर्गत लागू करण्यात आलेले लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकानांव्यतेरिक्त इतर दुकानांनाही सुरु करण्यास प्रशासनाने परवानगी दिली. तसेच बाजारपेठेची वेळ वाढवून दुपारी दोन वाजेपर्यंत करण्यात आली. शेतकऱ्यांची सध्या कृषी उपयोगी वस्तूंची खरेदी करण्याची लगबग सुरु आहे. खरिपाचा हंगाम अगदीच तोंडावर आल्याने शेती उपयोगी वस्तूंची खरेदी करण्यास शेतकऱ्यांची कृषी केंद्रांमध्ये झुंबड दिसून येत आहे. कृषी साहित्य खरेदी करण्यास वेळ कमी पडू नये याकरिता प्रशासनाने कृषी सेवा केंद्रांच्या वेळेत मोठा बदल करत सकाळी ७ ते सायं. ७ वाजे पर्यंत कृषी सेवा केंद्रे सुरु ठेवण्यास अनुमती देण्यात आली. सर्व प्रकारची कृषी सेवा केंद्रे, बि-बियाणे, कीटकनाशके, खते विक्री केंद्र, ठिबक सिंचन,  तुषार सिंचन विक्री दुकाने, कृषी साहित्य व कृषी अवजार विक्री दुकाने उद्या ३ जून पासून सकाळी ७ ते सायं. ७ वाजे पर्यंत सुरु ठेवता येणार आहे. असे असले तरी दुकानदारांनी जास्तीत जास्त पार्सल सेवा व ऑन लाईन सेवा देण्यावर भर देण्याचे प्रशासनाने सुचविले आहे.

व्हाट्सऍप व मोबाईल कॉल वरून शेकऱ्यांकडून त्यांना हव्या असलेल्या साहित्यांची माहिती घेऊन कृषी निविष्ठा घरपोच देण्याचा जास्त प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. कृषी सेवा देतांना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक राहील. नियमांचे उल्लंघन झाल्यास योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

वणीतील बातम्या