Home / थोडक्यात / *अनाथांचे तीन साथी -...

थोडक्यात

*अनाथांचे तीन साथी - तर्पण, श्रीकांतजी आणि देवेंद्रजी* *मंगेश नरसिंह चिवटे, कक्ष प्रमुख - मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, मंत्रालय, मुंबई यांचे ह्रूदयस्पर्शि मनोगत*

*अनाथांचे तीन साथी - तर्पण, श्रीकांतजी आणि देवेंद्रजी*    *मंगेश नरसिंह चिवटे, कक्ष प्रमुख - मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, मंत्रालय, मुंबई यांचे ह्रूदयस्पर्शि मनोगत*

*अनाथांचे तीन साथी - तर्पण, श्रीकांतजी आणि देवेंद्रजी*

 

*मंगेश नरसिंह चिवटे, कक्ष प्रमुख - मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, मंत्रालय, मुंबई यांचे ह्रूदयस्पर्शि मनोगत*

 

✍️जगदीश का. काशिकर व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

मुंबई: ऋग्वेदात एक मंत्र आहे, ओम यज्ञेन यज्ञ जयमंते....याचा संदर्भ असा आहे की, विश्वाच्या  कल्याणासाठी ऋषीमुनींनी एक यज्ञ केला आणि यज्ञात समिधा म्हणून स्वतःचीच आहुती दिली...श्रीकांतजी भारतीय यांनी अनाथांच्या साठी तर्पण नावाचा यज्ञ केलाय , आणि या यज्ञात स्वतःच संपूर्ण आयुष्यच समिधा म्हणून अर्पण केलंय,  याची प्रचिती तर्पण संस्थेन अनाथांच्यासाठी उभारलेल रचनात्मक कार्य पाहताना येते.

राष्ट्रीय युवा दिना निमित्ताने नुकताच तर्पणचा भव्य पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहण्याचा प्रेमळ आदेशच मित्रवर्य श्री अजित चव्हाण यांनी दिला होता. कार्यक्रम मुंबईतच मंत्रालय शेजारील गरवारे क्लब मध्ये असल्याने वेळेआधीच कार्यक्रमाला उपस्थित राहिलो.

कार्यक्रमाच्या ठिकाणी मुख्य प्रवेशद्वारावरच कार्यक्रमाला येणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या व्यक्तीच आदराने आणि विनम्रपणे स्वागत करणारे श्रीकांतजी भारतीय नजरेस पडले. त्यांचा हा नम्र आणि सहज वावर पाहून ही व्यक्ती आमदार आहे हे कुणालाही खरं वाटत नसेल. अर्थात एरवी देखील सर्वत्र त्यांचा असाच सहज वावर असतो हे मी स्वतः यापूर्वी अनेक वेळा अनुभवले आहे. मी ज्यावेळी कार्यक्रम ठिकाणी पोहोचलो त्यावेळी नेमके भगवानगडचे सर्वेसर्वा न्यायाचार्य ह भ प श्री नामदेव शास्त्री महाराज आले होते. श्रीकांतजी यांनी अतिशय नम्रपणे अक्षरशः साष्टांग दंडवत घालत श्री नामदेव शास्त्री महाराज यांचे स्वागत केले. श्रीकांतजी त्यांच्याप्रति एवढा आदरभाव का ठेवतात याचा उलगडा त्यांनी भाषणात केला.

तर्पणच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून असलेले श्रीकांतजी यांचे मार्गदर्शक उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांस कार्यक्रमास येण्यास उशीर होत होता. आपणच आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आपल्याच घरातील हक्काचा पाहुणा जेव्हा उशिरा पोहोचतो तेव्हा जीवाची अक्षरशः घालमेल होते आणि आयोजक तणावात येतो हे मी स्वतः अनुभवले आहे. मात्र श्रीकांतजी यांच्या चेहऱ्यावर कोणताही तणाव दिसत नव्हता. यातून त्यांची स्थितप्रज्ञता अनुभवता आली. उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे स्मित हास्याने स्वागत करत होते. मंत्री श्री मंगलप्रभात लोढा, आमदार श्री नितेश राणे आणि अन्य काही महत्त्वाच्या व्यक्तींना व्यासपीठासमोरील VIP खुर्चीवर बसवत होते.

उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आगमन होताच कार्यक्रमाला सुरुवात झाली. आपल्या प्रास्ताविकात मनोगत व्यक्त करताना श्रीकांतजी यांनी तर्पण संस्थेच्या कार्याचा धावता आढावा घेतला. वय वर्षे 18 पूर्ण झाल्यावर अनाथ मुलांचा वाली कोण.? त्यांच्या राहण्याची व्यवस्था काय ? अनाथांच्या पुढील उच्च शिक्षणाचं काय? अनाथांच्या नोकरीचं काय? अनाथांना कुठल्या कॅटेगरीमध्ये आरक्षण देणार ? कारण अनाथांना त्यांच्या आई-वडिलांची माहीतीच नाही, त्यामुळे त्यांना जात - धर्मही नाही ?? अनाथांच्या या प्रश्नांनी श्रीकांतजीना अस्वस्थ केले आणि आपलं आयुष्यचं या अनाथांच्यासाठी देण्याचा निर्धार त्यांनी केला. यातूनच तर्पण संस्थेचा जन्म झाला. श्रीकांतजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लावलेल्या तर्पण नावाच्या झाडाचं आता वटवृक्षात रूपांतर होत आहे. तर्पणचे अनेक विद्यार्थी देश-विदेशात नामांकित कंपन्यामध्ये नोकरीला आहेत. तर काही जण राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून अनाथांचा साठी धोरणं तयार करण्याच्या कामात गुंतले आहेत. तर्पणच्या माध्यमातून श्रीकांतजी भारतीय यांनी मागील फडणवीस सरकारच्या काळात अनाथांना सरकारी नोकरीत 1 टक्का आरक्षण मिळावं यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आणि त्यात यशही मिळवलं. अनाथांना सरकारी आणि स्थानिक स्वराज संस्थाच्या नोकर भरती मध्ये 1 टक्का आरक्षण देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

यासोबतच संजय गांधी निराधार योजनेचा लाभ अनाथांना मिळवून देण्यात देखील तर्पण संस्थेचा सिंहाचा वाटा आहे. तर्पणच्या या रचनात्मक कार्यांची दखल राज्यातील सर्वच पक्षांनी घेतली आहे. म्हणूनच महाविकास आघाडी सरकारच्या काळातच राज्यातील सर्व अनाथांना तर्पण संस्थेच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रस्तावाला संमती देण्यात आली होती.

म्हणूनच उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात याचा उल्लेख करताना आवर्जून सांगितले की, महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या काळात जी काही दोन चार कामे चांगली केली होती, त्यातील तर्पण संस्थेच्या सोबत राज्यसरकारने  केलेला करार हे एक चांगल काम होत. तोच निर्णय पुढे नेण्याची भूमिका घेत शिंदे फडणवीस सरकारने तर्पण सोबत करार केला असल्याचे जाहीर सांगितले. सोबतच यासाठी महाराष्ट्र सरकार तर्पण संस्थेला कोणतेही शुल्क देणार नसून , तर्पण अनाथांच्या साठी राज्यसरकारला विनामूल्य मदत करत असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमात अनाथांच्या साठी निस्वार्थी पणे काम करणाऱ्या दोन व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. भगवानगडचे महंत ह भ प श्री नामदेव शास्त्री महाराज यांनी अतिशय सुरेख निरूपण केले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली हे देखील एका रूढार्थाने अनाथ होते, मात्र अनाथ असलेल्या संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून अखिल विश्वाची माऊली बनण्याचा प्रवास केला. अनाथांच्या मध्ये समाजाची माऊली होण्याचं आणि समाजाला दिशा देण्याचं सामर्थ्य असल्याचे सांगत शास्त्री महाराजांनी तमाम अनाथांच्या मध्ये एक आश्वासक संदेश दिला.

पण संपूर्ण कार्यक्रमात मला व्यक्तीश भावलेला प्रसंग म्हणजे आपल्या प्रास्ताविकात श्रीकांतजी यांनी व्यासपीठावर सर्वांना आणि परमेश्वराला उद्देशून एक साकडं घातलं की, "अनाथांच्या साठी उभारलेल हे रचनात्मक कार्य आता एका यशस्वी टप्प्यावर येऊन पोहोचल आहे, पण कधी कधी या चांगल्या कार्याचा देखील अहंकार येऊ शकतो, पण हाच अहकांराचा वारा न लागो माझ्या राजसा या उक्तीप्रमाणे माझ्यात अहंकार येऊ नये अशी मी प्रार्थना करत आहे"

श्रीकांतजी या वाक्यांन मलाही अंतर्मुख केलं. कार्यक्रमानंतर रात्री उशिरापर्यंत विचार केला. आपल्या बाबतीत तर असं काही होत नाही ना रूग्णसेवेत काम करत असताना मला आणि माझ्या सहकाऱ्यांना देखील गेल्या काही काळात अनेकविविध पुरस्कार आणि सन्मान मिळत आहेत. नकळतपणे आपल्या चांगल्या कामाचा देखील अहंकार येतो, आपल्या चालण्या बोलण्यात दिसू लागतो. हा मानवी स्वभाव आहे, याला कोणीच अपवाद नाही. पण तर्पणच्या अद्वितीय आणि अविस्मरणीय कार्यक्रमात श्रीकांतजी भारतीय आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आमच्यासारख्या कार्यकर्त्याना एक मोलाचा संदेश दिला. अहंकाराचा वारा न लागो माझ्या राजसा हा मूलमंत्र जपत आपण सारे आपआपल्या परीने रूग्णसेवेत शेवटपर्यंत कार्यरत राहूयात.

जाता जाता

महात्मा गांधीजी यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे की, आयुष्यात कुठलंही एक क्षेत्र निवडा. अमर्यादित क्षेत्रात मर्यादित काम करण्यापेक्षा मर्यादित क्षेत्रात अमर्याद काम करा. एवढं काम करा की ते कामच तुमची ओळख ठरेल. श्रीकांतजी भारतीय यांनी  आज 21 व्या शतकात महात्मा गांधीजी यांचं वाक्य सार्थ ठरवलं आहे.

तर्पण संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील अनाथ मुलांसाठी रचनात्मक काम उभं करणारा अवलिया म्हणून श्रीकांतजी भारतीय आपणास आणि अनाथांना सरकारी नोकरीत 1 टक्का आरक्षण घेणारा तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री  श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपणास महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. जेव्हा जेव्हा अनाथ शब्द येईल तेव्हा तेव्हा फडणवीस - भारतीय ही नावं आदरानं घेतली जातील.

ताज्या बातम्या

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

थोडक्याततील बातम्या

*अंदरूनी मामले कितने अंदरूनी, बाहरी आलोचनाएं कितनी बाहरी*

*अंदरूनी मामले कितने अंदरूनी, बाहरी आलोचनाएं कितनी बाहरी* *(आलेख : राजेन्द्र शर्मा)* बाहरी बनाम अंदरूनी के संघ-भाजपा...

*अब टमाटर-मुक्त भारत!*

*अब टमाटर-मुक्त भारत!* *(व्यंग्य : राजेंद्र शर्मा)* इस बार टमाटर ने भी अपने नखरे दिखा ही दिए। अब तक अक्सर कभी आलू, तो कभी...

पर्यावरणाचा गळा घोटणारे प्लास्टिक प्रदूषण (जागतिक पर्यावरण दिन विशेष - ०५ जून २०२३)

पर्यावरणाचा गळा घोटणारे प्लास्टिक प्रदूषण जागतिक पर्यावरण दिन विशेष - ०५ जून २०२३ पर्यावरण हा पृथ्वीवरील जीवनाचा...