Home / थोडक्यात / *मार्केटिंग फंडा पासून...

थोडक्यात

*मार्केटिंग फंडा पासून सावध राहा - अॅड. चैतन्य एम. भंडारी*

*मार्केटिंग फंडा पासून सावध राहा - अॅड. चैतन्य एम. भंडारी*

*मार्केटिंग फंडा पासून सावध राहा - अॅड. चैतन्य एम. भंडारी*

 

✍️जगदीश का. काशिकर,

मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

पुणे: मार्केटिंगच्या क्षेत्रात "मार्केट सर्व्हे" नावाचा महत्वाचा भाग असतो, की जेणेकरून एखाद्या वस्तूबद्दल एखाद्या गोष्टीबद्दल लोकांना काय वाटत ? त्याबद्दल किती पैसे खर्चायचे याचे ठोकताळे समजून घेणे हा या सर्व्हे चा मुख्य उद्देश असतो. त्यात वावगं काहीच नाही. एखादे वाहन नव्याने बाजारात येण्यापूर्वी ग्राहकांची अपेक्षा काय आहे हे समजून घेण्यासाठी सर्व्हे केला जातो. तर असेच आता ऑनलाईन सर्व्हे फॉर्म भरून द्या आणि त्याबद्दल तुम्हाला अमेझॉनचे शंभर रुपयांचे व्हाउचर गिफ्ट मिळेल असं आमिष दाखवलं जात आहे. त्यात म्हटलं जात की फार साधे साधे प्रश्न आहेत आणि सहज तुम्ही लिहू शकाल शिवाय वरती त्याबद्दल शंभर रुपये (व्हाउचर) पण मिळेल ! आणि तुमच्या घरातील लोकांनी देखील हे फॉर्म भरले तर त्यांनाही शंभर रुपये मिळतील आणि तुम्हाला वाटत की बसल्या जागी दहा पंधरा मिनिटाचे काम तर आहे, करून टाकू असं म्हणत तुम्ही त्यांनी दिलेल्या लिंकला क्लिक करता आणि तिथेच तुमचा  त्यांच्या सापळ्यात प्रवेश झालेला असतो. त्यांनी पाठवलेल्या लिंकमध्येच इनबिल्ट स्वरूपाचा व्हायरस असतो. जो तुम्ही लिंक ला क्लिक केलं की तुमच्या मोबाईलमध्ये घुसतो आणि तुमच्या मोबाईल मधील डाटा मग चोरला जातो. (थोडक्यात तुमचा फोन हॅक करून क्लोन केला जातो.) आणि तुमच्या गॅलरीतले फोटो, खाजगी काही चॅटिंग याचा वापर करून नंतर तुम्हाला ब्लॅकमेल केलं जातं. आजकाल अनेक मोठ्या कंपन्यांना खरोखरच नवीन लोकांचे फोन नम्बर, पत्ता इत्यादी डिटेल्स लागतात (त्यांना त्यांच्या मार्केट सर्व्हे साठी) आणि मग हॅकर मंडळी तुमचा डेटा अशा कंपनीला विकून पैसे कमवतात. कधी कधी अशा कंपन्यांचे सेल्स चे / मार्केटिंग चे मेसेज आलेले असतील आठवून पहा. तर तेव्हा त्यांच्याकडे तुमचा नंबर गेलाच कसा ? हा प्रश्न पडला पाहिजे न ? तेव्हा कळत की अशाच "सर्व्हे" फॉरमॅट मध्ये भाग तुम्ही घेतलेला असतो आणि त्यावेळी तुम्हाला काही बेसिक माहिती विचारली जाते तीच माहिती मग नंतर हॅकर मंडळी मोठ्या कंपन्यांना विकतात. सुरुवातीला अशा फॉर्म भरून घेतल्यावर खरोखर तुम्हाला शंभर रुपये दिले जातात. नंतर काही काळाने तुम्हाला विचारलं जाते की तुम्हाला आता पाचशे रुपये मिळवायचे आहेत का ? कारण आता तुम्ही आमचे सन्माननीय सदस्य झाल्याने तुम्हाला आता वरच्या श्रेणीचे प्रश्न पाठवले जातील. तुम्ही मग अजून मोहात पडता आणि तोही फॉर्म भरून देता. असं करत करत ते तुम्हाला काही वेळा दोन तीन हजार रुपयापर्यंत नेतात. आणि मग नवीन ऑफर दिली जाते की, आता तुम्ही व्हीआयपी क्लास मध्ये पोचला आहात. तर तुम्हाला दामदुप्पट योजनेचा फायदा मिळू शकतो. तुम्ही जितकी रक्कम आमच्याकडे ठेवाल त्याच्या दुप्पट रक्कम एक आठवड्यात मिळेल आणि खरोखर सुरुवातीला तशी रक्कम तुम्हाला दिलीही जाते आणि मग तुम्हला खेळवत खेळवत ते लाख रुपयापर्यंत नेतात आणि ज्या वेळी तुम्ही ते भरता त्याचक्षणी त्या फ्रॉडर लोकांनी तुम्हाला ब्लॉक करून टाकलेलं असत. तुम्ही त्याच्यापर्यंत पोचूच शकत नाही. आता कल्पना करा.तुमच्यासारखेच अजून शंभर लोक जरी अडकले तरी चोरट्याने एकूण एक कोटी रुपये पळवलेले असतात. कळलं किती भीषण आहे हे सगळं. मग आता यावर उपाय काय ? तर उपाय खूप सोप्पा आहे. असं बसल्या जागी कुणी तुम्हाला का शंभर पाचशे रुपये देईल ? तेही सांधा एक सर्व्हे फॉर्म भरून ? इतकाच कॉमन सेन्स वापरला तरी तुम्ही त्या जाळ्यात अडकणार नाहीत. या जगात मोफत काहीच नसत. हे लक्षात घ्या. काहीच नाही तर तुम्ही स्वतःच आता एक "गळ" झालेला आहात. आणि तुम्हाला पुढे करून इतरांना लुटण्याचे काम मग सुरु होते.

त्यामुळे स्वतःला बजावून सांगा.मला असा हराम पैसा (बसल्या जागी) नको. मी मेहनत करेल, कष्ट करेल आणि त्यातून पैसे मिळवीन असं म्हणा मग कुणाचा बाप पण तुम्हाला जाळ्यात ओढणार नाही,हे नक्की ! त्यामुळे असल्या मार्केटिंग फंडा पासून सावध राहा असे आवाहन सायबर अॅवरनेस फौंडेशनचे अध्यक्ष व ख्यातनाम सायबर तज्ञ अॅड. चैतन्य एम. भंडारी , सायबर अवेअरनेस फाऊंडेशनचे सदस्य धनंजय देशपांडे, पुणे यांनी तमाम नागरीकांना केले आहे.

ताज्या बातम्या

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

थोडक्याततील बातम्या

*अंदरूनी मामले कितने अंदरूनी, बाहरी आलोचनाएं कितनी बाहरी*

*अंदरूनी मामले कितने अंदरूनी, बाहरी आलोचनाएं कितनी बाहरी* *(आलेख : राजेन्द्र शर्मा)* बाहरी बनाम अंदरूनी के संघ-भाजपा...

*अब टमाटर-मुक्त भारत!*

*अब टमाटर-मुक्त भारत!* *(व्यंग्य : राजेंद्र शर्मा)* इस बार टमाटर ने भी अपने नखरे दिखा ही दिए। अब तक अक्सर कभी आलू, तो कभी...

पर्यावरणाचा गळा घोटणारे प्लास्टिक प्रदूषण (जागतिक पर्यावरण दिन विशेष - ०५ जून २०२३)

पर्यावरणाचा गळा घोटणारे प्लास्टिक प्रदूषण जागतिक पर्यावरण दिन विशेष - ०५ जून २०२३ पर्यावरण हा पृथ्वीवरील जीवनाचा...