Home / थोडक्यात / *श्रावस्ती युवा सेवाभावी...

थोडक्यात

*श्रावस्ती युवा सेवाभावी संस्था व डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारमंच तर्फे आयोजित* *राज्यस्तरीय निंबध स्पर्धेचा निकाल जाहीर*

*श्रावस्ती युवा सेवाभावी संस्था व डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारमंच तर्फे आयोजित*    *राज्यस्तरीय निंबध स्पर्धेचा निकाल जाहीर*

*श्रावस्ती युवा सेवाभावी संस्था व डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारमंच तर्फे आयोजित*

 

राज्यस्तरीय निंबध स्पर्धेचा निकाल जाहीर

 

(  प्रतिनिधी कल्याण  / आशा रणखांबे)

 

दि. 21

 

श्रावस्ती युवा सेवाभावी संस्था व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच तर्फे आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निंबध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर, लिखाणावर तसेच त्यांनी केलेल्या भाषणावर अभ्यास व्हावा,  हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून  स्पर्धकांनी ह्या स्पर्धेत  सहभाग दर्शविला.

    स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ. सुमेध पारधे, कवी साहित्यिक नवनाथ रणखांबे, कवी अँड प्रज्ञेश सोनावणे आणि इंजि.गौतम बस्ते यांचे सहकार्य लाभले तसेच श्रावस्ती युवा सेवाभावी संस्था उल्हासनगर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच उल्हासनगर सर्व सभासद सहकारी ह्याचे ही मोलाचे योगदान लाभले. या स्पर्धेत एकूण 80 स्पर्धकांनी भाग घेतला  होता. पारितोषिक विजेते आणि स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांचे आयोजकांनी  अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या . या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे

       ह्या स्पर्धेत प्रथम पारितोषिक - शेख अल्यार शेख रज्जाक,  बुलढाणा ( गट ब ) विषय- वर्तमान आंबेडकरवादी आंदोलनासमोरची आव्हाने आणि त्याचे समाधान व  द्वितीय पारितोषिक (गट अ) - कोल्हापूर स्नेहल पंकज पाटील,  विषय- लोकशाही आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर  तर तृतीय पारितोषिक  ( गट ब) - वाडा /  ठाणे  सीमा महाले -  नविन शैक्षणिक धोरणाचे बहुजन समाजावर परिणाम   यांना मिळाले असून प्रोत्साहन पारितोषिके संदिप गायकवाड - नागपूर ( गट ब ) वर्तमान आंबेडकरवादी आंदोलनासमोरची  आव्हाने व त्यांचे समाधान , प्रिया भोले - पुणे ( गट अ) लोकशाही आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर, प्रणय प्रभा - नागपूर (गट ब )   विषय-वर्तमान आंबेडकरवादी आंदोलनासमोरची आव्हाने व समाधान,  पुर्वा कुलकर्णी -  नाशिक  ( गट अ ) विषय-लोकशाही आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर, किर्ती होवळे -  सांगली (गट अ)   विषय -डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांनी काढलेल्या वृत्तपत्रांचा आढावा ,  अमित कांबळे -  कल्याण  ( गट ब)  विषय- वर्तमान आंबेडकरवादी आंदोलनासमोरची आव्हाने व त्यांचे समाधान,

स्पर्धेत विजेत्यांना रोख रक्कम आणि प्रमाणपत्र तसेच ह्या स्पर्धेसाठी सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.  स्पर्धेचा निकाल  ऑनलाइन गुगलमीट द्वारे  कार्यक्रम घेऊन जाहीर करण्यात आला. यावेळी कवी साहित्यिक नवनाथ रणखांबे, कवी अँड प्रज्ञेश सोनावणे आणि इंजि.गौतम बस्ते यांनी निकाला संदर्भात माहिती देऊन  निबंध कसे असावेत, कसे नसावेत  आणि निबंध कसे लिहावे याबाबद्दल  उपस्थित स्पर्धकांना मार्गदर्शन केले.

ताज्या बातम्या

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

थोडक्याततील बातम्या

*अंदरूनी मामले कितने अंदरूनी, बाहरी आलोचनाएं कितनी बाहरी*

*अंदरूनी मामले कितने अंदरूनी, बाहरी आलोचनाएं कितनी बाहरी* *(आलेख : राजेन्द्र शर्मा)* बाहरी बनाम अंदरूनी के संघ-भाजपा...

*अब टमाटर-मुक्त भारत!*

*अब टमाटर-मुक्त भारत!* *(व्यंग्य : राजेंद्र शर्मा)* इस बार टमाटर ने भी अपने नखरे दिखा ही दिए। अब तक अक्सर कभी आलू, तो कभी...

पर्यावरणाचा गळा घोटणारे प्लास्टिक प्रदूषण (जागतिक पर्यावरण दिन विशेष - ०५ जून २०२३)

पर्यावरणाचा गळा घोटणारे प्लास्टिक प्रदूषण जागतिक पर्यावरण दिन विशेष - ०५ जून २०२३ पर्यावरण हा पृथ्वीवरील जीवनाचा...