Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / टाकळी गावाची वैद्यकीय...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

टाकळी गावाची वैद्यकीय शिबिरांतून कोरोनामुक्तीकडे वाटचाल

टाकळी गावाची वैद्यकीय शिबिरांतून कोरोनामुक्तीकडे वाटचाल
ads images

टाकळी गावाची वैद्यकीय शिबिरांतून कोरोनामुक्तीकडे वाटचाल

वणी: यवतमाळ जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या वणी तालुक्यात असलेल्या टाकळी गावात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागात थैमान घातले होते. यवतमाळ जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या टाकळी या 85 घरांच्या गावात जवळ - जवळ ६० हून अधिक घरात कोरोना विषाणूचा प्रसार झाला. ऑक्सिजन बेडसची कमतरता आणि अचानक वाढलेल्या रुग्णांनी वैद्यकीय सुविधांचा अभाव जाणवू लागला. अत्यंत भितीचे वातावरण निर्माण झाले असताना मूळ गाव टाकळी येथील रहिवासी पूजा संतोष टोंगे  हिने गावकऱ्यांना गावतच वैद्यकीय सुविधा देण्याचा निश्चय केला. पूजा सध्या नागपूर येथील भाऊसाहेब मोडक आयुर्वेदिक कॉलेजला अंतिम वर्षात वैद्यकीय शिक्षण घेत आहे. तिने तिच्या ओळखीच्या डॉक्टर्सशी संपर्क साधला. तेव्हा नागपूर येथील  आयुर्वेदिक डॉ. रचनील कमाविसदार, डॉ. राहुल राऊत, डॉ. सिद्धेश काळे,डॉ. वृषभ जूनघरे यांनी टाकळी गावात येऊन मोफत वैद्यकीय तपासणी व औषधी उपचार देण्याचे मान्य केले. गडचांदूर येथील प्रसिद्ध डॉ. भाग्यश्री जिबकाटे या देखील स्वेच्छेने सहभागी झाल्या. आवश्यक वैद्यकीय सामुग्रीसाठी लोकसहभागातून निधी उभा करत कोरोनाग्रस्त टाकळी गावात  वैद्यकीय तपासणी व औषधोपचार देण्याचे ठरले.

रीतसर प्रशासकीय परवानगी घेत १४ मे २०२१ रोजी आयुर्वैदिक डॉक्टरची टीम गावात पोहचली. सुरवातीला गावकऱ्यांत कोव्हिड १९ ची जनजागृती करण्यात आली. लोकांचा विश्वास संपादित  केल्यानंतर १५ मे २०२१ रोजी ११० गावकऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यात ६० हून अधिक कोरोनाग्रस्तांचा सहभाग होता. सर्व रुग्णांवर आयुर्वेदिक पध्दतीने उपचार करण्यात आले. पुन्हा २२ मे २०२१ रोजी गावात दुसऱ्यांदा वैद्यकीय तपासणी शिबिर घेण्यात आले. तेव्हा रुग्णांत मोठ्या प्रमाणात सुधारणा दिसू लागली होती. रुग्णांचे शास्त्रीय पद्धतीने माहिती संकलन करण्यात आले. आयुर्वेदिक उपचारांचा कोरोनाग्रस्त रुग्णांवर सकारात्मक परिणाम दिसला. ६९ हून अधिक रुग्ण असलेल्या गावात आता केवळ नामामात्र रुग्ण उरले आहेत.  ३१ मे रोजी गावात वैद्यकीय समारोपीय शिबिर पार पडले. "ग्रामीण भागात आयुर्वेदिक पध्दतीने कोरोनाग्रस्तांवर प्रभावीपणे उपचार केला जाऊ शकतो. कोव्हिड, कोव्हिड पश्चात व नॉन कोव्हिड अशा एकूण जवळपास १५० रुग्णांना मोफत वैद्यकीय तपासणी व आयुर्वेदिक औषधोपचार करण्यात आल्याची माहिती नागपूरचे सुप्रसिद्ध डॉ. रचनील कमाविसदार यांनी दिली.

या कामात स्थानीक PHC व आशा  श्रीमती भगद यांची  मदत झाली.गावातील नागरिकांना दिलासा मिळाला असून नागरिकांच्या आरोग्यात सुधारणा दिसून आली.  या शिबिराचा सकारात्मक परिणाम दिसल्याने केलेल्या कामाचे समाधान वाटले असे मत डॉ. पूजा टोंगे यांनी प्रतीपादित केले. आता गावात केवळ नाममात्र रुग्ण उरले असून मोठ्या प्रमाणात जागृती झाली आहे. मोफत वैद्यकीय सेवा दिल्याने गावातील सरपंच ज्ञानेश्वर टोंगे यांनी डॉक्टर्स चमुचे आभार मानले. यावेळी प्रतिष्ठित नागरिक सुरेश काकडे, संतोष टोंगे, दशरथ बोबडे, दिलीप भगत, दिपक चटप,रवी गैारकर,अरवींद तरवटकर, काशिनाथ झाडे,अनिल गुप्ता, महेश बंडेकर,प्राजक्ता  बाेबडे, विक्रम झाडे,ग्रामसेवक शेख, रुपेश ठाकरे, सुनील वडस्कर, विक्रम रायसिडाम आदींची उपस्थिती होती.  

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञ वर्तवत आहेत. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वैद्यकीय तपासणी व औषधोपचार शिबिर राबविण्याची गरज असून त्यातून नागरिकांच्या आरोग्याचे हित साधले जाईल.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

वणीतील बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...