Home / विदर्भ / गडचिरोली / *चुडाराम बल्हारपुरे...

विदर्भ    |    गडचिरोली

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या

 

 

 

 गडचिरोली -                

      ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा)  या संस्थेतर्फे गेल्या ७ वर्षांपासून 'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट वांड्.मय स्पर्धा'  आयोजित करण्यात येतात. व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना साहित्य प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

       अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या या पुरस्काराकरीता नाट्यवांड्.मय प्रकारात झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास नाट्यलेखनाचे  पारितोषिक जाहीर करण्यात आल्याचे "ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्टच्या पुरस्कार समिती प्रमुख प्रा . विजय काकडे व संयोजक प्रकाश सस्ते यांनी कळविले असून मंगळवार, दि. २७ फेब्रुवारीला मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून मौजा फलटण येथे होणाऱ्या ७ व्या धर्मवीर संभाजी महाराज राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या दिमाखदार सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

     या  पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे आहे. विशेष म्हणजे या नाटकाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयोग सुरू असून नुकत्याच भोपाळ (मध्यप्रदेश) येथे झालेल्या जनयोद्धा राष्ट्रीय समारोहात १३ फेब्रुवारीला या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला आहे.

            चुडाराम बल्हारपुरे हे झाडीपट्टीतील राज्य पुरस्कार प्राप्त नाटककार आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वांड्.मय पुरस्कार प्राप्त झालेले आहे. आजपर्यंत त्यांची विविध १३ पुस्तके प्रकाशित झाली असून विविध स्तरावरील अनेक पुरस्काराने ते सन्मानीत आहेत. महामृत्युंजय मार्कंडेश्वर, बहूढंगी समाधीवाले बाबा, स्पेशल रिपोर्ट, धरती आबा-क्रांतीसुर्य बिरसा मुंडा ,व गोंडवानाचा महायोध्दा- क्रांतिवीर बाबूराव शेडमाके ही त्यांची गाजलेली नाटके आहेत.

               चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल प्रा. अरुण बुरे, योगेश गोहणे,  दै. लोकमतचे संजय तिपाले, दै. हितवादचे रोहिदास राऊत, दै. देशोन्नतीचे नरेश बावणे, दै. सकाळचे मिलिंद उमरे,  दै. पुण्यनगरीचे प्रल्हाद म्हशाखेत्री व प्रमोद गेडेकर, प्रा. नवनीत देशमुख (साहित्यिक),  मधुश्री प्रकाशनचे पराग लोणकर (प्रकाशक) ,   प्रा. प्रब्रम्हानंद मडावी, पुंडलिक भांडेकर (पत्रकार) व इतर साहित्यिक मित्रांनी अभिनंदन केले आहे.

ताज्या बातम्या

वणी येथील धनोजे कुणबी समाज संस्थेचा प्रतिभा धानोरकर यांना जाहीर पाठिंबा 18 April, 2024

वणी येथील धनोजे कुणबी समाज संस्थेचा प्रतिभा धानोरकर यांना जाहीर पाठिंबा

वणी :- धनोजे कुणबी समाज संस्था, वणी रजिस्टर क्रमांक ८६५६ (य) ३०२ / २०२४ यांनी इंडिया आघाडीचे लोकसभेतील उमेदवार आमदार प्रतिभा...

शिंदोला येथील रहिवाशांनी निवडणुकीवर घातलेला बहिष्कार मागे, उपविभागीय अधिकारी यांना निवेदन. 18 April, 2024

शिंदोला येथील रहिवाशांनी निवडणुकीवर घातलेला बहिष्कार मागे, उपविभागीय अधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील शिंदोला येथील रहिवाशांनी येत्या लोकसभेच्या निवडणुकीत एकमताने बहिष्कार टाकला होता.मात्र याच गावातील...

लोकशाही पद्धतीने निवडून येऊन हुकूमशाही लादण्याचा मोदींचा प्रयत्न- कुमार केतकर 18 April, 2024

लोकशाही पद्धतीने निवडून येऊन हुकूमशाही लादण्याचा मोदींचा प्रयत्न- कुमार केतकर

वणी:पंतप्रधान नरेंद्र मोदी अब की बार ४०० पारचा नारा देत असले तरी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा व मोदी यांना २००...

*बाबासाहेबांच्या राज्य समाजवाद संविधानाचा मूलभूत पाया असता तर शेतकरी व कामगारांची उन्नती झाली असती*    *मेंढोली येथे भीमजयंती कार्यक्रमात मान्यवरांचा सुर* 17 April, 2024

*बाबासाहेबांच्या राज्य समाजवाद संविधानाचा मूलभूत पाया असता तर शेतकरी व कामगारांची उन्नती झाली असती* *मेंढोली येथे भीमजयंती कार्यक्रमात मान्यवरांचा सुर*

*बाबासाहेबांच्या राज्य समाजवाद संविधानाचा मूलभूत पाया असता तर शेतकरी व कामगारांची उन्नती झाली असती* *मेंढोली येथे...

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती उत्साहात साजरी. 17 April, 2024

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती उत्साहात साजरी.

वणी : भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात...

वेदड येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी 15 April, 2024

वेदड येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

झरी : दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा मोठ्या उत्साहाने बिना डीजे वाजविता वेडद पो.अडेगाव ता.झरी जि.यवतमाळ येथे भीमजयंती...

गडचिरोलीतील बातम्या

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता...

*सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदेचा कार्यक्रम आज आलापल्लीत*

*सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदेचा कार्यक्रम आज आलापल्लीत* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- सुप्रसिद्ध गायक आनंद...