Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / श्री. लखाजी महाराज विद्यालयात...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

श्री. लखाजी महाराज विद्यालयात रमेश टेंभेकर सरांना शिक्षकदिनी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित...

श्री. लखाजी महाराज विद्यालयात रमेश टेंभेकर सरांना  शिक्षकदिनी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित...
ads images

प्रविण  गायकवाड(राळेगाव  तालुका प्रतिनिधी):  राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आज दिनांक 5 सप्टेंबर म्हणजे डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमात सर्वप्रथम आज सर्व वर्गातील इच्छुक विद्यार्थी शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली.

त्याचप्रमाणे विद्यालयाचे मुख्याध्यापक,चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची सुध्दा निवड करण्यात आली.या एकदिवसीय शिक्षकांनी आपल्या तासिका घेऊन विद्यार्थ्यांना अध्यायनाचे धडे दिले.तर कायमस्वरूपी शिक्षकांनी या एकदिवसीय शिक्षकांचे अध्यायनाचे मुल्यमापन करून त्यांना वस्तू स्वरूपी भेट देऊन त्यांना प्रोत्साहित केले.त्यानंतर  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष दिलीप कोल्हे हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे संस्थेचे उपाध्यक्ष आशिष कोल्हे, संचालक सुरेश गंधेवार,शेखरराव झाडे, गुलाबराव महाजन,भरतजी पाल ,सोबतच विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास निमरड सर तर आजचे आदर्श शिक्षक सत्कार मुर्ती रमेश टे़ंभेंकर सर उपस्थित होते. या कार्यक्रमात सर्वप्रथम सावित्रीबाई फुले व डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

त्यानंतर उपस्थित मान्यवर मंडळींना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सोबतच या वर्षी विद्यालयातर्फे अध्यायनाचे गुनदान करून,त्यांचे सर्वपरी मुल्यमापन पाहता विद्यालयातून जेष्ठ असलेले शिक्षक रमेश टेंभेंकर सर यांना स्व. बाबूसाहेब थोडगे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुकुंदराव थोडगे यांचेकडून विद्यालयाचे अध्यक्ष दिलीप कोल्हे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य विलास निमरड सर यांनी करून विद्यालयाच्या सर्वतोपरी होणाऱ्या विकास कामावर प्रकाश टाकून उपस्थित मान्यवर मंडळीचे लक्ष वेधले सोबतच आजच्या सत्कारमूर्ती टेंभेंकर सर यांच्या कार्यांची प्रशंसा करून भविष्यात अशाप्रकारे कार्य करणाऱ्या शिक्षकांना अशाचप्रकारे पुरस्कृत केले जाईल असे सुतोवाच केले. 

त्यानंतर विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक  दिगांबर बातुलवार सर, सौ. कुंदा काळे मॅडम यांचे सुध्दा भाषण झाले सोबतच रंजय चौधरी सरांनी शुभेच्छा दिल्या व आजच्या तीन शिक्षकांची नावे जाहीर केली.सोबतच संस्थेचे उपाध्यक्ष आशिष कोल्हे यांनी सुध्दा मार्गदर्शन केले.सोबतच शिक्षकांना व विद्यार्थ्यांना शिक्षकदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे अध्यक्ष दिलीप कोल्हे यांनी संस्थेच्या होणाऱ्या विकासकामांची माहिती दिली.सोबतच आपली शाळा ही तालुक्यातील शाळा नाही तर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळेच्या चांगल्या शाळेच्या यादीत असावी,सोबतच रमेश टेंभेकर सरांच्या कार्याचा आढावा देऊन त्यांच्या कार्याची प्रशंसा करून त्यांना पुरस्कृत केल्याचे सांगितले. 

या कार्यक्रमाला विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्रावनसिंग वडते सर,दिगांबर बातुलवार सर,रंजय चौधरी सर,सौ.कुंदा काळे मॅडम,सौ.वाढोणकर मॅडम, राजेश भोयर सर,मोहन आत्राम सर, सौ.स्वाती नैताम मॅडम,मोहन बोरकर सर, विशाल मस्के सर,कुमारी वैशाली सातारकर मॅडम,कोल्हे मॅडम, अश्विनी तिजारे मॅडम,रोहोणकर मॅडम तर शिक्षकेतर कर्मचारी वाल्मिक कोल्हे,पवन गिरी,शुभम मेश्राम, बाबूलाल येसंबरे हे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सातारकर मॅडम यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार वडते सरांनी मानले.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...