Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / जळका येथे कृषी विभागा...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

जळका येथे कृषी विभागा मार्फत शेतीशाळा संपन्न...

जळका येथे कृषी विभागा मार्फत शेतीशाळा संपन्न...
ads images

प्रवीण गायकवाड(राळेगाव तालुका प्रतिनिधी): तालुक्य‍ातील मौजे जळका येथे दी.२९ सप्टेंबर रोजी कृषी विभागामार्फत  राज्य पुरस्कृत, एकात्मिक कापूस उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजने अंतर्गत तालुका कृषी अधिकारी अमोल जोशी, मंडळ कृषी अधिकारी राजु ताकसांडे यांच्या मार्गदर्शनात कापुस पिकाची शेतीशाळा प्रशिक्षण वर्ग प्रगतशील शेतकरी  श्री प्रताप जगन आडे यांच्या शेतात घेण्यात आली. 

यावेळी कृषी सहाय्यक तुषार मेश्राम यांनी कापुस पिकावरील येणा-या

रसशोषक किडी विशेषत: फुलकिडे व्यवस्थापन

निंबोळी अर्क ५% किंवा फ्लोनिकॅमिड ५० टक्के -८० ग्रॅम किंवा फिप्रोनील ५℅ - ६०० मिली किंवा डायनोटेफ्युरॉन २० टक्के ६० ग्रॅम किंवा स्पिनेटोरम ११.७% - १६० मिली किंवा बुप्रोफेझीन २५% - ४०० मिली यापैकी एका कीटकनाशकाची प्रति एकर याप्रमाणे फवारणी करावी.

गुलाबी बोंडअळी चा प्रादुर्भाव दिसल्यास

कपाशीच्या पिकात नियमित सर्वेक्षण करुन डोमकळ्या दिसून आल्यास त्या तोडून आतील अळीसह नष्ट कराव्यात.

निरिक्षणासाठी गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे प्रति एकरी २ या प्रमाणात लावावेत.

कामगंध सापळ्यामध्ये सलग तीन दिवस ८ ते १० पतंग प्रति सापळा किंवा १ अळी प्रति १० फुले किंवा १० टक्के प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या दिसून आल्यास  

१. प्रोफेनोफॉस ५० टक्के ४०० मिली प्रती एकर किंवा*

२. इमामेक्टिन बेंझोएट ५ टक्के ८८ ग्रॅम प्रती एकर किंवा

प्रोफेनोफोस ४० टक्के + सायपरमेथ्रीन ४ टक्के (पूर्व मिश्रित कीटकनाशक) ४०० मिली प्रती एकर यापैकी एका रासायनीक कीटकनाशकाची आलटून पालटून फवारणी करावी

तसेच काही ठिकाणी कपाशीमध्ये मोठ्या उघाडी नंतर पाऊस झाल्यास आकस्मिक मर ही विकृती दिसून येत आहे. त्याकरिता

१. अतिरिक्त पाण्याचा लवकरात लवकर निचरा करून

२. वापसा येताच कोळपणी व खुरपणी करावी

३. लवकरात लवकर २०० ग्रॅम युरिया+ १०० ग्रॅम पालाश (पोटॅश) + २५ ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड प्रति १० लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड १५० मिली आळवणी करावी.

किंवा

१ किलो १३:००:४५ + २ ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड + २५० ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड २०० लिटर पाण्यातून मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड १०० मिली आळवणी करावी.

कपाशीतील नैसर्गिक पातेगळीचे व्यवस्थापन करण्यासाठी नॅपथेलिन ॲसीटीक ॲसीड (NAA) २.५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी

लाल्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कपाशीच्या शेतामध्ये २० ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट प्रति १० लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने दोन वेळा फुले लागण्याच्या आणि बोंडे भरण्याच्या अवस्थेतफवारावे.

फवारणी करिता दुषित पाणी न वापरता स्वच्छ पाणी वापरावे कामगऺध  पक्षी थाऺबे,पिवळे चिकट सापळे या बाबत माहीती देण्यात आली. बिव्हेरीया बासियाना, व्हर्ट्टीसेलियम लेकएनी, या सारख्या मित्र बुरशीचा वापर करणे अशा प्रकारे जैविक पद्धतीने नियंत्रण करण्याचे मार्गदर्शन केले कापसाची फरदड न घेता हंगाम संपल्या नंतर पऱ्हाट्या पासून कंपोस्ट खत तयार करण्याचे आव्हान केले  पोकरा व  महाडीबीटी योजने विषयी माहिती दिली तसेच लघु उद्योगांना बळकटी करणासाठी ३५% अनुदान असलेली PMFME योजनेत सहभागी होण्याचे व PM किसान योजनेतील लाभार्थ्यांना ekyc पूर्ण करण्याचे आव्हान उपस्थितांना करण्यात आले. सिझंटा कंपनीचे तालुका समन्वयक संदीप काळे यांनी फवारणी करताना घ्यावयाची काळजी बाबत मार्गदर्शन केले.

या वेळी सदर शेतिशाळेला सरपंच  शंकर मडावी , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गोविंद चहांदकर यांच्या उपस्थितीत प्रकल्पातील १०० हेक्टर क्षेत्रा करिता प्रकल्पातील १०० शेतकऱ्यांना   अजाडीरॅक्टिन १०००० पीपीएम, फेरोमन ट्रॅप,लूर, झिंग सल्फेट इत्यादी कृषी निविष्ठांचा वाटप करण्यात आला करण्यात आला यावेळी  प्रगतशील शेतकरी प्रताप आडे, विठ्ठल ठोंबरे, मंगाम ,कृषी मित्र पंकज सोणेकर व असंख्य शेतकरी व महीला शेतकरी उपस्थित होते शेतीशाळा   संपताच अल्पोपहार देण्यात आला..

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...