Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / राळेगाव तालुक्यातील...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

राळेगाव तालुक्यातील ०ते२० पटसंख्येच्या ३४ शाळांवर टांगती तलवार...

राळेगाव तालुक्यातील ०ते२० पटसंख्येच्या ३४ शाळांवर टांगती तलवार...
ads images

प्रवीण गायकवाड(राळेगाव तालुका प्रतिनिधी)  राळेगाव:- शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने शून्य ते २० पटसंख्येच्या शाळांची समायोजनाबाबतची माहिती मागविली आहे . ही प्रक्रिया राबविल्या गेल्यास राळेगाव तालुक्यातील ३४ शाळा बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

राळेगाव तालुक्यात ३४ शाळा मध्ये शून्य ते २०च्या आत पटसंख्या असल्याची माहिती राळेगाव येथील गट शिक्षण अधिकारी लुकमान शेख यांनी दिली आहे. जिल्ह्यातील ही संख्या मोठी असल्याची माहिती आहे .

 २८ ऑगस्ट २०१५ च्या शासन निर्णयानुसार जिल्हानिहाय विद्यार्थी संख्या तसेच संचमान्यतेनुसार मंजूर शिक्षक , शिक्षकेतर पदे , भरलेली पदे व रिक्त पदांची माहिती मागविण्यात आली आहे . 

जिल्हानिहाय अतिरिक्त शिक्षक असतील तर त्या शिक्षकांची माहिती तसेच अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाबाबतच्या कार्यवाहीची माहिती शासनाकडून मागविण्यात आली आहे.

 त्यासोबतच ० ते २० विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांची संख्या , या शाळा बंद करण्याबात विभागाची कार्यवाही कोणत्या स्तरावर आहे , याची माहिती शासनाकडून मागविण्यात आली आहे . त्यामुळे शासनाच्या पत्राने खळबळ निर्माण झाली असून ० ते २० पटसंख्येच्या शाळा बंद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे .

 रिक्त भरल्यास तसेच एकूण खर्चापैकी १८ टक्के निधी शालेय शिक्षण विभागावर खर्च होत असून महसुली खर्चापैकी मोठ्या प्रमाणातील निधी वेतनावर खर्च होत असल्याची बाब पत्रात स्पष्ट केली आहे. 

ग्रामीण भागातील गोरगरीब , सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचाच आधार आहे . त्यावेळी सरकारच्या वतीने एक , दोन विद्यार्थ्यांसाठीही गाव पातळीवर शाळा सुरू करण्यात आल्यात . पण , आता मात्र खर्चाचे कारण पुढे करून शाळा बंद करण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप होत आहे . शासनाने असा निर्णय राबविल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे .

 

बॉक्स

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचे काय ?

शून्य ते २० विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा बंद करून शासनाने विद्यार्थ्यांचे दुसऱ्या शाळेत समायोजन केल्यास आवागमनाचा प्रश्न निर्माण होईल. 

वाहतूक व्यवस्था केली तरीही ग्रामीण भागात अनेक विद्यार्थ्यांना स्वतः शिक्षकांना जावून शाळेत आणावे लागते.

 त्यांच्या येण्याची प्रतिक्षा करावी लागत असल्याची अनेक ठिकाणी परिस्थिती आहे . मग अशा स्थितीत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा होण्याची शक्यता आहे .

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...