Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / मनसे च्या दणक्या नंतर...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

मनसे च्या दणक्या नंतर वीज वितरण विभाग ऍक्शन मोडवर....

मनसे च्या दणक्या नंतर वीज वितरण विभाग ऍक्शन मोडवर....
ads images

प्रश्न निकाली न निघाल्यास लढा कायम राहिलं

प्रवीण  गायकवाड(राळेगाव तालुका प्रतिनिधी): राळेगाव तालुक्यात विजेचा प्रश्न गंभीर बनला आहे. तब्बल बारा  तास वीज गूल होण्याच्या घटना काही गावात घडल्या. बोगस ट्रान्सफार्मर मुळे शेतातील व गावातील वीज जाण्याचे प्रकार वाढले. मनसे ने हा प्रश्न लावून धरला. जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांचे नेतृत्वात आधी निवेदन व त्या नंतर आंदोलनाचा इशारा देण्यात आल्या नंतर वीज वितरण विभागाने तातडीने यावर उपाययोजना करण्यात आली. निवेदना नंतर चार ठिकाणी ट्रान्सफार्मर बसविण्यात आले.

राळेगाव तालुक्यातील खैरी, दहेगाव, देवधरी, वरुड या सह विविध गावात थ्री फेज पुरवठा करण्याची तथा नियमित वीज उपलब्ध होण्याची मागणी अनेक शेतकरी गावकऱ्यांची आहे. दहेगाव साऱख्या गावात सलग दहा-दहा तास वीज नसल्याच्या घटना घडलेल्या आहे. दसरा सारखा सण अंधारात घालवण्याची पाळी गावकऱ्यांवर आली. या ठिकाणी नवीन ट्रान्सफार्मर देण्याची मागणी जनता करत आहे. तर दुसरीकडे ज्या गावात नवीन ट्रान्सफार्मर दिले ते ते दोन चार दिवसात निकामी होतं आहे. या बोगस ट्रान्सफार्मर देणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी देखील मनसेच्या वतीने करण्यात आली.

आंदोलनाचा इशारा देण्यात आल्यानंतर वीज वितरण विभागाने या कडे लक्ष दिल्याचे दिसलें. खैरी ला 4 ट्रान्सफार्मर, पिंपरी ला 1 बसविण्यात आले. वरुड (जहांगीर) काही प्रमाणात निकाली निघाला तसेच देवधरी आणि दहेगांव ची समश्या दोन दिवसात निकाली काढण्याचे आस्वासन देण्यात आले. चार ठिकाणी नवीन ट्रान्सफार्मर बसविण्यात आले आहे. जनतेच्या मनातील प्रश्नाला वाचा फोडल्याबद्दल समाधान वेक्त होताना दिसते.

प्रतिक्रिया

दसऱ्या सारखा सण माझ्या शेतकरी, कष्ट्करी बांधवानी अंधारात घालवला. वीज वितरण विभागाचे अव्वा च्या सव्वा बील नियमित येते. तिथे चुका होतं नाही. यांचे लाईनमन सांगूनही येतं नाही. पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. 

रात्री-बेरात्री विषारी प्राण्यांचा वावर असतो. जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. सलग वीज मिळणे हा आमचा हक्क आहे.बोगस ट्रान्सफार्मर हा गंभीर प्रश्न आहे. आमच्या करातून याची खरेदी होते त्या अर्थाने तो आमच्या उत्पनावर पडलेला दरोडा आहे.  तालुक्यात या बाबत संतापची भावना असणे स्वाभाविक म्हणावे लागेल. वीज वितरण विभागाशी आमचे काही वाकडे नाही. त्या ठिकाणी कामं करणारे अनेक शेतकऱ्यांचीच मुलं आहेत. 

मात्र नियमित वीज मिळली पाहिजे, बोगस ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे ही आमची न्याय मागणी आहे. मनसे च्या निवेदना नंतर ट्रान्सफार्मर बसवण्याचे कामं हाती घेण्यात आले. आता विजेचा प्रश्न चिघळू देऊ नका, अन्यथा आम्हाला मनसे स्टाईल ने न्याय मागावा लागेल

-शंकर वरघट  

मनसे, जिल्हा उपाध्यक्ष यवतमाळ

ads images

ताज्या बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...