Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / अंतरगाव येथे गोवारी...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

अंतरगाव येथे गोवारी समाजाच्या वतीने गोवर्धन पूजा उत्साहात ।। गोमातेचे पूजन

अंतरगाव येथे गोवारी समाजाच्या वतीने  गोवर्धन पूजा उत्साहात ।। गोमातेचे पूजन
ads images

राळेगाव : राळेगाव तालुक्यातील अंतरगाव येथे गोवारी समाजाच्या वतीने दिं २६ ऑक्टोबर २०२२ रोज बुधवार ला दुपारी २:०० वाजता गोवर्धन पूजा व ढाल पूजा मुटवा पूजा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. यावेळी पूजनला सरपंच प्रवीण येंबडवार ,मेजर गजू ठाकरे,संतोष बिलोरकर,( शिक्षक)महादेव नेहारे गावातील गायकी,शेळकी,यांना नारळ पान देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

अंतरगाव येथे गोवारी समाजाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे दिवाळीचा पाडवा अर्थात बलिप्रतिपदा म्हणजेच गोवर्धन पूजा पाडव्याच्या दिवशी गाईला लक्ष्मीसारखे सजवितात गायी म्हशीची पूजा करून मिरवणूक काढली जाते ही गोवर्धन पूजेची परंपरा आजही अंतरगाव येथे गोवारी समाजात शेकडो वर्षापासून चालत आलेली आहे या परंपरेनुसार येथील गोवारी समाज ढाल पूजनाचा वारसा आजही पुढे नेत आहेत गोवारी समाजाच्या पारंपारिक व्यवसाय हा गाई राखणे असून गोवारी लोक गाईची भक्तिभावाने पूजाअर्चा करून कृतज्ञता व्यक्त करतात ढाल पूजनाच्या वेळी एका बांबूवर चंदनाच्या लाकडी कोरलेली चार मुखी ढाल लावून मोरपंख व नवीन कापड लावून त्याची विधिवत पूजा केली जाते यावेळी गाईंना चटईवर बसविण्यात येते व त्यानंतर पूजाअर्चा करून गावातून मिरवणूक काढली जाते या मिरवणुकीला गावातील गोंड गोवारी समाजातील पुरुष महिला मोठ्या उत्साहाने सहभागी होत असून यामध्ये विनोद दूधकोळे, श्रीकृष्ण सोनवणे, रामभाऊ वगारहांडे, अजय उईके, अरविंद ठाकरे ,गोलू वगारहांडे, माणिक न्याहारे, रामकृष्ण सोनवणे, उषाताई न्याहारे, सुमन दूधकोहळे, संगीता वगारहांडे, विजय ठाकरे, किसना वगारहांडे, गोपीचंद ढाले सुरज सोनवणे श्रीधर वगारहांडे,तसेच गावातील इतरही समाजबांधव या गायी गोधन पूजेला यावेळी उपस्थित होते

ads images

ताज्या बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...