Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / आदर्श मंडळाच्या वतीने...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

आदर्श मंडळाच्या वतीने श्रीराम नवमी निमित्त भव्य शोभायात्रा

आदर्श मंडळाच्या वतीने श्रीराम नवमी निमित्त भव्य शोभायात्रा
ads images

आदर्श मंडळाच्या वतीने श्रीराम नवमी निमित्त भव्य शोभायात्रा

 

✍️ प्रवीण गायकवाड

राळेगाव प्रतिनिधी

 

राळेगाव:- शहरातील इंदिरा नगर येथील आदर्श दुर्गोत्सव मंडळ व श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने दिनांक ३० मार्च रोजी सकाळी बाईक रॅली काढण्यात आली तसेच सायंकाळी माँ दुर्गा व प्रभु श्रीराम यांच्या प्रतिमेचे पुजन करून भव्य शोभयात्रेला सुरुवात करण्यात आली.

आंदोरी येथील ढोल ताशा पथकाने प्रत्यक्ष शोभयात्रेला सुरुवात करण्यात आली. या पथकाने संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष वेधले, या शोभायात्रेत प्रभु श्रीरामाच्या वेशभूषेत जानवी दिलीप लांभाडे,

संयम फिडेल बायदाणी, प्रतिक  काका दोडके आणि माता सीतेच्या वेशभूषेत सुहानी दिलीप लांभाडे, बुलबुल राहुल पंडित, प्रज्ञा राऊत आणि लक्ष्मण अमित दिलीप लांभाडे   व रामभक्त श्री हनुमान च्या वेशभूषेत हर्षल अनिल राऊत,

रियांश अमोल पंडित या बालगोपालानी अतिशय सुंदर असा पेहराव करून शुभयात्रेत रंगत आणली, ही शोभायात्रा इंदिरा नगर येथील मुख्य मार्गाने जाऊन गांधी ले-आऊट येथे हनुमान मंदिरात या शोभयात्रेचा समारोप करण्यात आला.

        यावेळी प्रतिमेचे पुजन व शोभयात्रेला प्रमुख पाहुणे आदिवासी नेते तथा सामाजिक कार्यकर्ते रमेश कन्नाके, राळेगाव नगर पंचायत चे अध्यक्ष रवींद्र शेराम, उपनगराध्यक्ष जानराव गिरी, नगरसेवक कुंदन कांबळे, नगरसेविका कमरूनिस्सा पठाण, फरजाना लाखाणी, रूपा लाखाणी, ॲड फिडेल बायदाणी, विनोद काकडे, विलास मुके, संदीप पेंदोर, विजय वैद्य, बंडुजी महाजन, राळेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश शेंडे, पत्रकार महेश भोयर, मनोहर बोभाटे सह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन युसुफअली सैय्यद यांनी तर प्रास्तविक फिरोज लाखाणी यांनी केले.

सामाजिक बांधिलकी कशी जोपासावी? सर्वधर्म समभाव किती महत्त्वपूर्ण

याचं खरं खूप छान प्रदर्शन आदर्श दुर्गोत्सव मंडळ राळेगांव चे प्रमुख फिरोझ सलीमभाई लाखाणी यांनी वेळोवेळी विविध कार्यक्रमा मधून दाखवून दिली आहे हे विशेष..

ads images

ताज्या बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...