Home / यवतमाळ-जिल्हा / उमरखेड / उमरखेड शहरातील नाल्या...

यवतमाळ-जिल्हा    |    उमरखेड

उमरखेड शहरातील नाल्या घाणीने तुंबल्या ; नागरिकांच्या आरोग्याला धोका

उमरखेड शहरातील नाल्या घाणीने तुंबल्या ;  नागरिकांच्या आरोग्याला धोका
ads images

 .

 

 

 

 

सय्यद रहीम रजा

तालुका प्रतिनिधी उमरखेड

 

 

 

अनेक वर्षापासून ठिय्या मांडून बसलेल्या  अधिकाऱ्याची तात्काळ बदली करा अन्यथा रा कॉ  च्या वतीने आंदोलनाचा इशारा

 

उमरखेड प्रतिनिधी :

 मागील एका वर्षापासून नगरपरिषद उमरखेड येथे प्रशासक लागू झाल्यानंतर शहराअंतर्गत प्रत्येक वार्डातील आरोग्य विषयक समस्या वाढलेल्या दिसत आहेत त्यामुळे न पा अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मागील 6 ते 7  वर्षांपासून कार्यालयात ठाणं मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दि 17 एप्रिल रोजी मुख्याधिकारी यांना निवेदनातून देण्यात आला .

 नगर परिषदेतील उदासीन धोरणामुळे शहरातील नाल्या ,घाण व कचऱ्याने तुंबलेले आहेत  तुंबलेल्या नाल्यामुळे  परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत आहेत .

प्रामुख्याने सांडपाण्याची नालीसफाई होत नसल्याने व डासांचे प्रमाण वाढलेले आहेत .प्रभाग क्रमांक 1 व 2 मधील शाईन नगर ,सेवादास कॉलनी ,साक्षी नगर , ढाणकी रोड येथील मजबूत बांधकाम केलेल्या नाल्या असून त्यातील गाळ उपसा केला जात नाही . मागील एक वर्षापासून प्रभागांमध्ये रस्ते झाडले जात नाही त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 10 ,11 व 12 मध्ये कचरा घंटागाडी येत नसून कचरा रस्त्यावर टाकण्याची वेळ जनते समोर येत आहेत .घनकचरा संकलन करणारे कामगार व ठेकेदार त्यांच्या कामाकडे लक्ष देत नसून सफाई कामगारांना वेळेचे बंधन राहिलेले नाही सफाई कामगारांना कामासाठी विनंती केली असता अरेरावी व उद्धटपणे बोलून काम न करता निघून जातात व तेथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे

          नगरपरिषद अंतर्गत कार्यरत असलेला संवर्ग चे अधिकारी मागील 5 ते 6 वर्षांपासून एकाच डागी ठाण मांडून बसले आहेत अशा अधिकाऱ्यांची बदली होणे आवश्यक आहे असे न झाल्यास भ्रष्टाचार होण्यास चालना मिळेल अशा अधिकारी येणाऱ्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षांच्या फायद्याचे अशु शकतात .तसेच नगरपरिषद मध्ये अधिकाऱ्यांचा राजकीय हस्तक्षेप वाढला असून एका विशिष्ट सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या आदेशानुसार कार्यालयीन कामकाज चालू असल्याने सामान्य नागरिकांना अडचणी निर्माण होत असल्याचे निवेदनाद्वारे केली आहे .

      सदर अधिकाऱ्याकडे अतिरिक्त विभागाचे अतिरिक्त प्रभार दिले असून या अधिकाऱ्याला आपल्या पदाचा दुरुपयोग करण्यास वाव  मिळत आहे व  कार्यालयात येणाऱ्या सामान्य जनतेला अरेरावी व शिवीगाळ करून गैरवर्तणूक देत असलेल्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून व शहराच्या स्वच्छतेकडे गांभीर्याने लक्ष देऊन विशिष्ट संवर्ग अधिकाऱ्यांच्या बदली बाबत ताबडतोब कारवाई न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा न पा मुख्याधिकारी यांना निवेदनातून देण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष राजू भैया जयस्वाल , शहर अध्यक्ष युसुफ सौदागर ,जिल्हा सरचिटणीस दत्ता गंगासागर ,  युवक तालुका अध्यक्ष बबलू जाधव पाटील,सुभाष जाधव ,मिथिलेश जयस्वाल , साजीद जागीरदार,जाकीर राज , तलहा जाबाज ,संतोष सूर्यवंशी ,शेख इस्त्राईल ,रहमत जागीरदार ,सय्यद मुसासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

ads images

ताज्या बातम्या

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम. 13 May, 2024

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम.

वणी.- स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलने उज्वल यशाची परंपरा कायम राखत या वर्षीही दहावी...

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*                                    13 May, 2024

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ  सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा. 13 May, 2024

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा.

उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतं असल्याने शहराला उन्हाच्या चटक्या बरोबर पाणी टंचाईच्या झळा सुध्दा सोसाव्या लागत...

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उमरखेडतील बातम्या

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा गजानन वानखेडे

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...