Home / यवतमाळ-जिल्हा / उमरखेड / शेतकर्‍याच्या हितासाठी...

यवतमाळ-जिल्हा    |    उमरखेड

शेतकर्‍याच्या हितासाठी सत्यशोधक पॅनल निवडणुकिचा मैदानात :- डाॅ विजय माने

शेतकर्‍याच्या हितासाठी सत्यशोधक पॅनल निवडणुकिचा मैदानात :- डाॅ विजय माने
ads images

शेतकर्‍याच्या हितासाठी सत्यशोधक पॅनल निवडणुकिचा मैदानात :- डाॅ विजय माने

 

 

✍️.सय्यद रहीम रजा

तालुका प्रतिनिधी उमरखेड

 

उमरखेड तालुका शेतकरी सहकारी जिनिंग अंड प्रेसिंग सहकारी संस्था र न. १०४ च्या निवडणुकीचा कार्यक्रम लवक लागणार आहे. आपला जीन प्रेस उमरखेड या संस्थेचे संचालक मंडळ परिवर्तन करण्यासाठी बहुजन हिताय बहुजन सुखाय या तत्वाने प्रेरित असलेले सभासद शेतकऱ्याचे प्रतिनिधी स्वच्छ प्रतिमेचे संस्थे विषयी निष्टा व प्रामाणिक पणा असलेल्या युवा चेहऱ्यांना संधी देऊन निवडणुकीला समोर जाण्याचा सत्यशोधक शेतकरी संघ पॅनल यांचा माणस ठरला आहे. शेतकऱ्याचा सर्वांगीण विकास साधने तसेच संस्थेच्या हिताच्या दुष्टीने नवनवीन प्रकल्प राबविण्याच्या प्रयत्न करण्यात येईल.

 

डॉ. विजयराव पं. माने यांनी ५७० अपूर्ण सभासदाचे शेअर्सची रक्कम पदर मोड करून भरून अपूर्ण शेअर्स पूर्ण केले आहे. त्यांची नावे स. निबंधक साहेब यांनी आदेश करून यादी मध्ये नावे समाविष्ट केली आहे. हि एक चांगली सुरवात केली असून जुन्या सभासदाचा मताधिकार कायम राहिला आहे.

 

आपला जिन प्रेस हि संस्था भरभराटीला आण्यासाठी तसेच शेतकर्याचे आश्रयस्थान असलेली संस्था राजकारणाचा अड्डा होऊ नये म्हणून चागंल्या हेतूने या निवडणुकीत सत्यशोधक शेतकरी संघ या नावाने हे पॅनल तयार केले आहे.

 

डॉ. विजयराव पं. माने हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब माने मा. आमदार यांचे नातू आहेत. नितीन माहेश्वरी हे संस्थेच्या उभारणीत वाटा असलेले कै. जेठमलजी माहेश्वरी मा. आमदार यांचे नातू आहेत. अॅड. अनिल पं. माने हे आपला जिन प्रेसचे माजी संचालक आहेत.

 

या सर्वांच्या नेतृत्वात मुळावा, ढाणकी, बिटरगाव, विडूळ, उमरखेड या सर्व साधारण गटातून, महिला गटातून वि.जे.न.टी. व ओ. बि.सी. गटातून तसेच सहकारी सोसायटी संस्थेतून १६ जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. स्वच्छं प्रतिमा असलेल व तसेच निवडणुकीला उभे राहणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी पॅनल प्रमुखाकडे आपला प्रस्ताव दाखल करावा.

*शेतकऱ्यांनो जागे व्हा.....*

चौकट

 

*तुरटी फिरवण्याची वेळ आली आहे.....

विजयराव माने

 

 

     ज्या आर्थी पाण्यामध्ये गाळाचे कन पाणी गढुळ करतात त्या आर्थि पाण्यात तुरटी फिरवावी लागते, तुरटी फिरल्याने पाण्यातील गढूळ कण बुडाला जाऊन पाणी स्वच्छ होते, तसे.. आपल्यालाही तुरटी फिरवावी लागणार, परंतु तुरटी फिरल्यानंतर  कोणीही प्रलोभना पाई स्वच्छ होत असलेले पाणी ढवळू नये अन्यथा या गढूळ पाण्यामुळे कायमचे सामाजिक आरोग्य धोक्यात येईल.

 

*जिनिंग प्रेस वर कष्टकरी शेतकऱ्यांची सत्ता हवी.....*

 

     लवकरच उमरखेड तालुका शेतकरी सहकारी जिनिग अँड प्रेसिंग ची निवडणूक कार्यक्रम लवकरच लागणार आहे. त्या अनुषंगाने या निवडणुकी मध्ये स्वच्छ प्रतिमा, निस्वार्थ भावना आणि संस्थेप्रथी निष्ठा असणाऱ्या प्रामाणिक इच्छुक उमेदवारांना  आव्हान करण्यात येते की त्यांनी सत्यशोधक शेतकरी संघ या पॅनल प्रमुखांशी संपर्क साधावा. ज्यामुळे एक सर्व समावेशक, ज्यांचा केंद्रबिंदू शेतकरी, कष्टकरी असेल असे प्रामाणिक लोकांना निवडणुकीमध्ये उमेदवारी देण्याची सत्यशोधक शेतकरी संघाची अपेक्षा आहे. या करिता सभासदांनी स्व्यांभू जागृत राहण्याची गरज निर्माण झाली आहे असे आव्हान करण्यात आले.

 

ads images

ताज्या बातम्या

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम. 13 May, 2024

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम.

वणी.- स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलने उज्वल यशाची परंपरा कायम राखत या वर्षीही दहावी...

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*                                    13 May, 2024

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ  सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा. 13 May, 2024

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा.

उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतं असल्याने शहराला उन्हाच्या चटक्या बरोबर पाणी टंचाईच्या झळा सुध्दा सोसाव्या लागत...

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उमरखेडतील बातम्या

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा गजानन वानखेडे

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...