*राळेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण*
✍️प्रवीण उद्धवराव गायकवाड
राळेगाव प्रतिनिधी
राळेगाव:-काॅंग्रेस पक्षाचे नेते तथा भारताचे माजी पंतप्रधान, संगणक क्रांतीचे स्व.राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त राळेगाव तालुक्याच्या वतीने व राळेगाव तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने नगरपंचायत कार्यालयाजवळील राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.त्यावेळी काॅंग्रेस पक्षाचे राळेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे,काॅग्रेस पक्षाचे राळेगाव शहर अध्यक्ष प्रदीप ठूणे काॅंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तथा नगरपंचायत अध्यक्ष रविंद्र शेराम,नगरपंचायतीचे उपाध्यक्ष जानराव गिरी,काॅंग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य अरविंद तामगाडगे, नगरसेवक कमलेश गयलोत, नगरसेवक कुंदन कांबळे, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष मारोतराव पाल, भानुदास राऊत, नगरपंचायतचे सभापती मंगेश राऊत,माजी नगरसेवक प्रदीप लोहकरे, खरेदी विक्री संघाचे संचालक श्रीधर थुटुरकर सर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गोवर्धन वाघमारे, पुरूषोत्तम कोपरकर, माजी नगरसेवक अफसर अली, ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था राळेगावचे सदस्य गजानन पाल, शासकीय काॅंट्रक्टर राजू दुधपोहळे,राहूल होले सुनिल भामकर मंगेश पिंपरे,अभय फाळके यांच्या सह अनेक पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.