Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / *वडकी पोलिसांनी केला...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

*वडकी पोलिसांनी केला गोवंश तस्करीचा पर्दाफाश* *वडकीचे ठाणेदार विजय महल्ले यांची गोवंश तस्करावर धडक कारवाई*

*वडकी पोलिसांनी केला गोवंश तस्करीचा पर्दाफाश*      *वडकीचे ठाणेदार विजय महल्ले यांची गोवंश तस्करावर धडक कारवाई*
ads images

*वडकी पोलिसांनी केला गोवंश तस्करीचा पर्दाफाश*

 

 

वडकीचे ठाणेदार विजय महल्ले यांची गोवंश तस्करावर धडक कारवाई

 

✍️प्रवीण गायकवाड

   राळेगाव

 

राळेगाव:-शुक्रवार दिनांक ०९/०६‌‌़२०२३ वडनेर कडून आदीलाबाद कडे कत्तलीसाठी गोवंशाची कंटेनर द्वारे तस्करी केल्या जात असल्याची गुप्त माहिती वरून वडकी पोलिसांनी दहेगाव फाट्याजवळ सापळा रचून सदर कंटेनरला थांबण्याचा इशारा केला असता कंटेनर न थांबताच पांढरकवडा च्या दिशेने पळाला. वडकी पोलिसांनी कंटेनरचा वीस किलोमीटर पाठलाग करून ३६ बैल व १गाय यांची सुटका केली मात्र कंटेनर सोडून दोन्ही आरोपी जंगलात पसार झाले.

                   शुक्रवार दिनांक ९ जून रोजी वडकी पोलिसांना कंटेनर क्रमांक एन एल ०१ए.एफ.१०१३ मध्ये वडनेर कडून आदिलाबाद कडे अवैध्यरित्या, निर्दयतेची वागणूक देऊन, आखूड दोराने बांधून व चारा पाण्याची व्यवस्था न करता विना परवानगी कत्तलीसाठी गो वंश घेऊन जात आहे अशी माहिती मिळाली त्यावरून वडकी पोलिसांनी तात्काळ पोलीस स्टाँफ सह दहेगाव फाटा जवळ नाकाबंदी करून सदर कंटेनर वाहनास थांबन्याचा इशारा केला असता कंटेनर न थांबताच पांढरकवडा कडे भरधाव गेला असता वडकी पोलिसांनी त्याचा २०कि. मी. पर्यंत पाठलाग केला. पोलिसांचा पाठलाग बघून आरोपी यांनी  साखरा गावाजवळील हॉटेल जवळ कंटेनर थांबवून कंटेनर मधील दोघे आरोपी जंगलात पसार झाले. मात्र पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेतला.          

                 वडकी पोलिसांनी पंचासमक्ष वाहनांची तपासणी केली असता सदर वाहनांमध्ये गो वंशीय बैल ३६ व गाय ०१ अशी एकूण३७  जनावरे अंदाजे प्रत्येकी किंमत २०,०००/- रुपये प्रमाणे एकूण किंमत  ७,४०,०००/- रुपये व कंटेनर वाहन किंमत३०,००,००० /- असा एकुण किं.३७,४०,०००/-रुपये चा मुद्देमाल पंचा समक्ष वडकी पोलिसांनी घटनास्थळावरुन जप्त केला. सदर वाहनात बैल निदर्यपणे आखूड दोराने दाटीवाटीने डबल डेक्कन स्वरूपात बांधलेले होते. चारा पाण्याची कोणतीही व्यवस्था केली नव्हती व सदर गोवंशाची तस्करी करणारेआरोपी हे फरार झाले होते.फरार आरोपी इसम व कंटेनर मालक यांचे विरुध्द पो.स्टे.ला प्राण्यांना निर्दयतेने वागणूक कायद्या प्रमाणे व मोटार वाहन कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.

           सदरची कार्यवाही मा श्री पवन बन्सोड, पोलीस अधीक्षक, यवतमाळ, मा श्री पियुष जगताप, अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ, मा श्री प्रदीप पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा यांचे मार्गदर्शनात वडकी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार  विजय महाले सोबत चालक पो हवा गजानन अडपावार, नापोका विलास जाधव, सचिन नेवारे, पोका अरविंद चव्हाण यांनी केली.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...