Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / *रेती तस्करांनी पोखरले...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

*रेती तस्करांनी पोखरले वर्धा नदीपात्र*, *नवनियुक्त तहसीलदार लक्ष देतील काय?* *अर्थपूर्ण व्यवहारामुळे प्रशासनाचे दुर्लक्ष ; नियमांची माती करून केली जाते रेती तस्करी*

*रेती तस्करांनी पोखरले वर्धा नदीपात्र*, *नवनियुक्त तहसीलदार लक्ष देतील काय?*    *अर्थपूर्ण व्यवहारामुळे प्रशासनाचे दुर्लक्ष ; नियमांची माती करून केली जाते रेती तस्करी*
ads images

*रेती तस्करांनी पोखरले वर्धा नदीपात्र*, *नवनियुक्त तहसीलदार लक्ष देतील काय?*

 

अर्थपूर्ण व्यवहारामुळे प्रशासनाचे दुर्लक्ष ; नियमांची माती करून केली जाते रेती तस्करी

 

✍️संजय कारवटकर

राळेगाव प्रतिनीधी

 

राळेगाव:- तालुक्यात घाट लिलाव न झालेल्या घाटावर रेती तस्करांचा डेरा असून, राळेगाव तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीचे पात्र रेती तस्करांनी अक्षरक्ष: पोखरून काढले आहे. नदीपात्रात ठिकठिकाणी मोठाले खड्डे पडले असून, नदीचा  प्रवाहही थांबला आहे. हा प्रकार खुलेआम सुरू असताना पर्यावरण रक्षणासाठी कुणीही पुढे येताना दिसत नाही. राळेगाव तालुक्यात वर्धा नद ही तालुक्यातील मोठी नदी असून, पात्र विस्तीर्ण आहे. उच्च दर्जाच्या चांगल्या रेतीसाठी वर्धा नद प्रसिद्ध आहे. अशा या वर्धा नदीवरील रेतीघाटांचा दोन वर्षांपासून लिलावच झाला नाही. अहोरात्र तस्कर रेतीचा उपसा करीत आहेत.  वर्धा नदीपात्रात मोठाले खड्डे करून रेतीचा उपसा केला जातो. लिलाव झाल्या नसल्याने या घाटावर महसूल विभागाचे नियंत्रण आहे. परंतु, अर्थपूर्ण व्यवहारामुळे कुणीही मोठी कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे राजरोस रेतीचा उपसा केला जातो.

तालुक्यातील घाटांवर खुलेआम रेती तस्करी केली जात आहे. गत दोन वर्षांपासून रेतीची मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जाते. हा सर्व प्रकार दिवसा ढवळ्या सुरू असते. परंतु महसूल विभागाचे अधिकारी थातूरमातूर कारवाई करतात. यामुळे तस्करांचे मनोबल वाढले आहेत. रस्त्यात ठिकठिकाणी तस्करांचे मानसे पेरलेली असतात. अधिकाऱ्यांचे वाहन जाताना दिसले की तात्काळ सूचना दिली जाते. त्यामुळे वाहन रस्ता बदलून दुसऱ्या मार्गाने जाते. या सर्व प्रकारात महसूल विभाग आणि पोलीस तेवढेच जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे.

वसुंधरा बचाव अभियान कागदावरच-  शासनाने पर्यावरण रक्षणासाठी वसुंधरा बचाव अभियान सुरू केले आहे.   सायकल माध्यमातून विक्रम करीत वसुंधरा बचाव अभियान राबविण्यात आले. संपूर्ण प्रशासन या  राबले; परंतु त्याचवेळी जिल्ह्याच्या विविध घाटांतून रेतीचे उत्खनन होत होते. एकीकडे पर्यावरण बचावासाठी अभियान राबवायचे, तर दुसरीकडे रेती तस्करांना खुली सूट द्यायची, असा प्रकार जिल्ह्यात सुरू आहे.

संघटित रेती तस्करांकडून चोरी- तालुक्यात रेती तस्करांच्या अनेक टोळ्या कार्यरत आहेत.  संघटितपणे रेतीचे राजरोसपणे उत्खनन करतात. खुलेआम  नेहमी वाहनातून रेतीची वाहतूक केली जाते. रेती तस्करांना कुणाचेही भय दिसत नाही. महसूल प्रशासन केव्हा तरी थातुरमातुर कारवाई करते; परंतु इकडे कारवाई सुरू असताना दुसरीकडे राजरोस रेतीचा उपसा सुरू असतो

कोट्यवधींची उलाढाल- राळेगाव  तालुक्यातील रेती गुणवत्तापूर्ण आहे. तिला तालुक्यात मोठी मागणी आहे. या व्यवसायात दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. आतापर्यंत कायमस्वरूपी तस्करांच्या मुसक्या कुणीही आवळल्या नाहीत. राजकीय प्रवाहाने ही तस्करी सुरू असते. तस्करांचे नेटवर्क एवढे मोठे आहे की, कोणता अधिकारी कुठे जाणार याची माहिती तस्करांना असते.  यात  काही राजकीय वेक्तीचा सुध्दा समावेश आहे.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...