Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / राळेगाव तालुक्यात १६.०५...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

राळेगाव तालुक्यात १६.०५ कोटींचा राशन घोटाळा

राळेगाव तालुक्यात १६.०५ कोटींचा राशन घोटाळा
ads images

उच्च स्तरीय समितीकडून (निवृत्त न्यायाधीश व पोलीस अधिकारी) कडून चौकशी करण्याची मुख्यमंत्री यांना मागणी

यवतमाळ: राळेगाव तालुक्यातील अतिरिक्त युनिटस व खोटे अंत्योदय गटातील कार्ड डिलीट करण्यात आले आहे, ज्यामुळे सरकारी दरानुसार राशन धान्यांची रक्कम रुपये १६.०५ कोटीचा महा घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

निरीक्षण अधिकारी राळेगाव यांच्यामुळे रुपये १६.५ कोटी राशन धान्य काळाबाजार/ फसवणूक/ अपहार रास्त भाव दुकानदार कडून झालेल्या आहे. सविस्तर माहितीसाठी ५ रास्त भाव दुकानाचे अतिरिक्त युनिट्सचे पुरावे सोबत जोडण्यात आले आहे

1) एप्रिल 2022 मध्ये तालुक्यात अंत्योदय गटातील कार्डस ची संख्या ७९३१ व ३०२३७ युनिट्स होती आमच्या तक्रारी नंतर एप्रिल 2023 मध्ये ६९९४ व २५०१७ युनिट्स झाली आहे. एकूण ९३७ कार्ड्स व ५२२० युनिट्स वगळण्यात आले आहे. ज्यामुळे सरकारी दरानुसार राशन धान्य रुपये ६.४१ कोटीचा  अपहार झाला / घोटाळा झाला आहे. (९३७ 35 kg33 इकॉनॉमिक rate 75 महिने व युनिट्स ५किलो).

२)  एप्रिल 2022 मध्ये तालुक्यात PHH गटातील कार्डस ची संख्या १४२१७ व ५४७६१ युनिट्स होती आमच्या तक्रारी नंतर एप्रिल 2023 मध्ये १३७२४ व ५०३४९ युनिट्स झाली आहे. एकूण ४९३ कार्ड्स व ४४१२ युनिट्स कमी झाले.  ज्यामुळे सरकारी दरानुसार राशन धान्य रुपये ८.१५  कोटीचा अपहार झाला / घोटाळा झाला आहे. (युनिट्स 5 kg 33 इकॉनॉमिक rate ४१ महिने व एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२२- युनिट्स  १० kg 33 इकॉनॉमिक rate ३३ महिने).

३)  एप्रिल  2022 मध्ये तालुक्यात शेतकरी गटातील युनिट्सची संख्या १८२९३ होती आमच्या तक्रारी नंतर एप्रिल 2023 मध्ये १५५०४ झाली आहे. एकूण २७८९ युनिट्स वगळण्यात आले आहे. ज्यामुळे सरकारी दरानुसार राशन धान्य रुपये १.५२ कोटीचा अपहार झाला / घोटाळा झाला आहे. (२७८९  5 kg 33 इकॉनॉमिक rate ३३ महिने)

४) वरील सर्व अतिरिक्त युनिट्स आधार लिंक न केलेले हे सन २०१६ पासून मृत लाभार्थी, गावातील विवाहित स्त्री, अतिरिक्त नावे, दुबार नावे होती. निरीक्षण अधिकारी यांनी दर वर्षी डोळे बंद करून वार्षिक अहवाल रा भा दु यांना दिले आहे.

५) ग्राम दक्षता समिती ग्राम पातळीवर  असून समिती कडून मागील ६ वर्षात कधीही अहवाल घेण्यात आलेल्या नाही. जबाबदार अधिकारी यांना वरील सर्व अतिरिक्त युनिट्स mahafood.gov.in साईट वर उपलब्ध असूनही तालुक्यातील रास्त भाव दुकानातील युनिट्स कमी केले नाही. रास्त भाव दुकानातील परिवाराला अंत्योदय कार्ड देण्यात आले. रास्त भाव दुकानदारास अतिरिक्त युनिट्स चे राशन धान्य न काढण्याची सूचना वारंवार देवूनही उचल करीत होते व प्राधन्य गटातील आताही राशन धान्य उचल चालू आहे (मृत लाभार्थी आधार लिंक).  

मा. मुख्यमंत्री यांनी जातीने  लक्ष घालून व उच्च स्तरीय समितीची नेमणूक करून 5 रास्त दुकानाची फेरचौकशी करण्याचे आदेश देण्यात यावे. रु १६.०५  कोटीचा  संबधित जबाबदार अधिकारी यांच्या पगारातून वसूल करण्यात यावे व फौंजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी राजेश राठोड यांनी केली आहे.

 

 

ads images

ताज्या बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...