Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / *सेवानिवृत्त सैनिकाची...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

*सेवानिवृत्त सैनिकाची भव्य मिरवणूक व नागरी सत्कार सोहळा संपन्न* *मित्र परिवार व नवोदय क्रीडा मंडळाचे आयोजन*

*सेवानिवृत्त सैनिकाची भव्य मिरवणूक व नागरी सत्कार सोहळा संपन्न*    *मित्र परिवार व नवोदय क्रीडा मंडळाचे आयोजन*
ads images

*सेवानिवृत्त सैनिकाची भव्य मिरवणूक व नागरी सत्कार सोहळा संपन्न*

 

मित्र परिवार व नवोदय क्रीडा मंडळाचे आयोजन

 

✍️प्रविण गायकवाड

राळेगाव तालुका प्रतिनिधी

 

राळेगाव:- शहरातली भारतीय सैन्य दलात एकवीस वर्षे सेवा देऊन भारतीय सीमेचे रक्षण करणारे सचिन एकोनकर हे सेवानिवृत्त होऊन राळेगाव शहरात स्वगृही परत आल्याने सचिन एकोनकर यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक शहराच्या प्रमुख मार्गाने काढण्यात आली व नंतर भारतीय सैनिक सचिन एकोनकर यांचा नागरी सत्कार घेण्यात आला यावेळी कार्यक्रमांसाठी राळेगाव येथील तहसीलदार अमित भोईटे ठाणेदार रामकृष्ण जाधव सत्कार मुर्ती सचिन एकोनकर व त्यांचे कुटुंब उपस्थीत होते यावेळी राळेगाव येथील सचिन एकोनकर मित्र परिवार, नवोदय क्रीडा मंडळ माता राणी दुर्गाउत्सव मंडळ व शहीद भगतसिंग गृप व सोबत शहरातील नागरिक यांनी प्रमूख पाहुण्याच्या उपस्थितीत सचिन एकोनकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तहसीलदार अमित भोईटे यांनी सैन्य दलातील सैनिक हे आपले कुटुंब मित्र परिवार यांच्या पासून दुर राहून भारत सीमेचे रक्षण करतात त्यामुळे त्यांचा सत्कार करण्याचे भाग्य मला लाभले हा शन माझ्यासाठी पेरणादायी आहे असे त्यांनी भाषणात सांगितले.सोबत राळेगाव येथील ठाणेदार रामकृष्ण जाधव यांनी वर्दीचे महत्व उपस्थीत नागरीकांना व खेळाडूंना सांगितले.सोबतच सत्कार मुर्ती भारतीय सैनिक सचिन एकोनकर यांनी सत्काराला उत्तर देताना आपला देशसेवेतील एकवीस वर्षाचा अनुभव सांगितला व सोबतच नवोदय क्रीडा मंडळ लायन्स क्रिकेट क्लब व आदर्श क्रिकेट क्लब यांचे मोठे मार्गदर्शन लाभले व त्यांना भारतीय सैन्यात भरती प्रक्रियेत सहभागी करण्यासाठीं नेणारे पांढरकवडा येथे पोलीस दलात कार्यरत असलेले प्रमोद जूनूनकर व मित्र परिवार यांचे आभार मानले या कार्यक्रमासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थीत होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनय मुनोत यांनी केले तर संचालन सुजित बेहरे व आभार प्रदर्शन आशिष महाजन यांनी केले या कार्यक्रमाचे आयोजन सचिन एकोनकर मित्र परिवार व नवोदय क्रीडा मंडळ यांनी केले होते.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...