Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / झरी जामणी तालुक्यातील...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

झरी जामणी तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय मागण्याची तात्काळ पूर्तता करण्याबाबत तहसीलदार झरी यांना निवेदन सादर

झरी जामणी तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय मागण्याची तात्काळ पूर्तता करण्याबाबत तहसीलदार झरी यांना निवेदन सादर
ads images

झरी जामणी तालुका कापूस उत्पादक शेतकरी यांनी दिले निवेदन, खाजगी केंद्रावर एमएसपी पेक्षा कमी दराने कापसाची खरेदी होत असल्याची तक्रार,सीसीआय चे केंद्र सुरू करण्याची मागणी

झरी जामणी : तालुक्यामध्ये खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाची पिळवणूक होत आहे. यासाठी शेतकरी वर्गाने झरी जामणी तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय मागण्याची तात्काळ पूर्तता करण्याबाबत तहसीलदार झरी तहसील कार्यालय यांना दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजी निवेदन सादर केले व मागण्या वर तात्काळ उचित कार्यवाही करून न्याय दयावा हि विनंती सुद्धा यावेळी करण्यात आली.

या आहेत प्रमुख मागण्या

1) खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये हमीभावापेक्षा MSP पेक्षा कमी दरात कापूस खरीदी होत आहे. त्यावर फौजदारी गुन्हे नोंदवणूक कारवाई व्हावी.

2) शेतकऱ्याकडुन अडत कापण्याच्या दलालांवर कर्यवाही करावी.

3) खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये लिलाव पद्धतीने कापूस खरेदी करावी.

4) सर्व खाजगी जिनिंगचे वजन काट्यांची तपासणी सक्षम अधिकाच्या कडून करावी.

5 ) सी. सी. आय (C.C.1) कडून कापूस खरेदी तात्काळ सुरु करावी

6) हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याकडून भाव फक्त रक्कम वसूल करून शेतकऱ्यांना द्यावी.

7) कृषीउत्पन्न बाजारसमितीच्या यार्डमधील वजन काटे मध्ये कापूस गाड्याचे करावे.

8) अडतिच्या नावाखालील गंजीवर कापसाचा भाव करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कार्यवाही करावी.

9) पीकविमा जाहीर करून शेतकन्यांच्या खात्यात रक्कम त्वरित जमा करण्यात यावी.

10) जंगली जनावरमुडे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित मदत देण्यात यावी.

11) गावोगावी जाऊन कापूस खरेदी करून राहिले त्यामुळे कापूस चोरीचे प्रकरण वाढत असल्याने कापूस खरेदी करणाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी.

यावेळी निवेदन सादर करताना मा सुरेंद्र गेडाम सर, गोपाल मडावी,अभिमन्यू बेलखेडे, पंकज जुमनाके, कृष्णा कावडे, अविनाश शेंडे,अतुल शेंडे,मारोती बल्लपवार,लक्ष्मण शेंडे,रमेश यलपुलवार,प्रवीण सोयाम, रामेश्वर शेंडे,अंबादास मोहूर्ले, तुळशीराम शेंडे,रोशन गुरनुले, अंबादास गुरनुले, राजू शेंडे,संतोष गुरनुले, अनिल गेडाम इत्यादी शेतकरी उपस्थित होते.

ads images

ताज्या बातम्या

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

झरी-जामणीतील बातम्या

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

मुकुटबन बस थांबा पाडल्यामुळे प्रवाशाचे आतोनात हाल

झरी जामनी: मुकुटबन बस थांबा पाडल्यामुळे प्रवाशाचे आतोनात हाल होत आहे.मे महिन्यात भर उन्हात प्रवाशांना उभे रहावे लागत...

आधी लग्न लोकशाहिचं मग माझं-प्रवीण बोधे

झरी: आज शुक्रवार दिनांक 19 एप्रिल रोजी अडेगाव येथील नवरदेव प्रवीण बोधे यांचा आज कोरपना येथे विवाह होता.आजच लोकसभेचे...