Home / यवतमाळ-जिल्हा / दारव्हा / जिल्ह्यातील पहिल्या...

यवतमाळ-जिल्हा    |    दारव्हा

जिल्ह्यातील पहिल्या डिजिटल सरकारी शाळेचे लोकार्पण सम्पन्न

जिल्ह्यातील पहिल्या डिजिटल सरकारी शाळेचे लोकार्पण सम्पन्न
ads images

दारव्हा नगरपरिषदेच्या उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक एक च्या विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा

यवतमाळ  : मुंबई पुण्यासारख्या मेट्रो शहरातील खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीच्या डिजिटल सुविधा मिळतात. त्या पद्धतीची सुविधा आता दारव्हा शहरातील मराठी शाळेत उपलब्ध झाली आहे. पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकलपनेतून निर्माण करण्यात आलेल्या शहरातील नगरपरिषदेच्या उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक एकमधील डिजिटल क्लासरूम व इंटेरिअर वर्कचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते आज करण्यात आले.

दारव्ह्यातील ही शाळा जिल्ह्यातली पहिलीच डिजिटल सरकारी शाळा असून  या माध्यमातून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना महागड्या खाजगी शाळेसारख्या डिजिटल सुविधा मिळणार आहे.

या शाळेत एकूण चार वर्गखोल्या असून दीडशेहून अधिक विद्यार्थी पटसंख्या आहे. या शाळेच्या वर्गखोल्यात प्रत्येकी २० संगणक बसविण्यात आले आहेत.  त्यावर एकाच वेळेला चार विद्यार्थी लिहू शकतात. तसेच प्रत्येक वर्गखोलीत डिजिटल फळा बसवण्यात आला असून या सर्वांना इंटरनेटची जोडणी देण्यात आली आहे.

याशिवाय शाळेच्या इमारतीच्या भिंती नव्या तऱ्हेने निर्मित केलेल्या आहेत. या सर्व सोयीसुविधांसाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी दारव्हा नगरपरिषदेला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वस्ती सुधार योजनेमधून भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे.

*पालकमंत्री बनले शिक्षक आणि विद्यार्थी*

दारव्यातच नव्हे तर जिल्ह्यात पहिल्यांदा डिजिटल सरकारी शाळेची निर्मिती झाल्याने पालकमंत्री संजय राठोड यांनी सुरुवातीला शिक्षक होऊन अनेकांचा क्लास घेतला तर विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधा पाहून स्वतः विद्यार्थी म्हणून बाकांवर बसून डिजिटल सुविधेचा लाभ घेतला.

या डिजिटल शाळेच्या लोकार्पणप्रसंगी नगर परिषदेचे मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, श्रीधर मोहोड, कालींदा पवार मनोज सिंगी, राजू दुधे, दामोदर लढा आरिफ काझी, विकास जाधव, मुख्याध्यापक, शिक्षक ,पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

" सार्वजनिक विकास करताना मूलभूत सुविधांप्रमाणे शाळातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार सुविधा पुरविणे विकासातील एक घटक आहे. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकार विविध योजना राबवत आहे पालकमंत्री म्हणून शाळांचा विकास करण्याचा पुढाकार घेतला आहे. शालेय विद्यार्थ्यांना लवकरच टॅब देण्याची भूमिका आमची आहे. शिक्षणाचे सार्वत्रिकच झाले पाहिजे या भूमिकेतून काम करत आहे. येत्या काळात जिल्हा परिषद, नगर परिषद शाळांचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प केला आहे," असे पालकमंत्री संजय राठोड यांनी डिजिटल शाळेच्या लोकार्पण प्रसंगी सांगितले.

ads images

ताज्या बातम्या

वणी येथील धनोजे कुणबी समाज संस्थेचा प्रतिभा धानोरकर यांना जाहीर पाठिंबा 18 April, 2024

वणी येथील धनोजे कुणबी समाज संस्थेचा प्रतिभा धानोरकर यांना जाहीर पाठिंबा

वणी :- धनोजे कुणबी समाज संस्था, वणी रजिस्टर क्रमांक ८६५६ (य) ३०२ / २०२४ यांनी इंडिया आघाडीचे लोकसभेतील उमेदवार आमदार प्रतिभा...

शिंदोला येथील रहिवाशांनी निवडणुकीवर घातलेला बहिष्कार मागे, उपविभागीय अधिकारी यांना निवेदन. 18 April, 2024

शिंदोला येथील रहिवाशांनी निवडणुकीवर घातलेला बहिष्कार मागे, उपविभागीय अधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील शिंदोला येथील रहिवाशांनी येत्या लोकसभेच्या निवडणुकीत एकमताने बहिष्कार टाकला होता.मात्र याच गावातील...

लोकशाही पद्धतीने निवडून येऊन हुकूमशाही लादण्याचा मोदींचा प्रयत्न- कुमार केतकर 18 April, 2024

लोकशाही पद्धतीने निवडून येऊन हुकूमशाही लादण्याचा मोदींचा प्रयत्न- कुमार केतकर

वणी:पंतप्रधान नरेंद्र मोदी अब की बार ४०० पारचा नारा देत असले तरी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा व मोदी यांना २००...

*बाबासाहेबांच्या राज्य समाजवाद संविधानाचा मूलभूत पाया असता तर शेतकरी व कामगारांची उन्नती झाली असती*    *मेंढोली येथे भीमजयंती कार्यक्रमात मान्यवरांचा सुर* 17 April, 2024

*बाबासाहेबांच्या राज्य समाजवाद संविधानाचा मूलभूत पाया असता तर शेतकरी व कामगारांची उन्नती झाली असती* *मेंढोली येथे भीमजयंती कार्यक्रमात मान्यवरांचा सुर*

*बाबासाहेबांच्या राज्य समाजवाद संविधानाचा मूलभूत पाया असता तर शेतकरी व कामगारांची उन्नती झाली असती* *मेंढोली येथे...

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती उत्साहात साजरी. 17 April, 2024

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती उत्साहात साजरी.

वणी : भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात...

वेदड येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी 15 April, 2024

वेदड येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

झरी : दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा मोठ्या उत्साहाने बिना डीजे वाजविता वेडद पो.अडेगाव ता.झरी जि.यवतमाळ येथे भीमजयंती...

दारव्हा तील बातम्या

दारव्हा शहरात सुसज्ज आधुनिक अभ्यासिका केंद्राचे लोकार्पण

यवतमाळ, दि. ७ : शहरी व ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यातील प्रत्येक शहराच्या...

रागाचे भरात निघुन गेलेली अल्पवयीन तरुणी नातेवाईकाच्या ताब्यात, अहमदाबाद रेल्वे पोलीसांच्या मदतीने दारव्हा पोलीसांचे ऑपरेशन मुस्कान यशस्वी

दारव्हा: पो.स्टे. दारव्हा येथे दि. शनिवार 14 ऑक्टोबर 2023 रोजी तालुक्यातील एका गावातील 17 वर्षीय तरूणी रागाचे भरात निघुन...

तिवसा येथे मानवाधिकार फॉउंडेशनच्या वतीने शिधाअन्नधान्य पत्रिका वाटप शिबीर संपन्न!

भारतीय वार्ता :तिवसा प्रतिनिधी : यवतमाळ तालुक्यातील तिवसा येथे मानवाधिकार फाउंडेशनच्या व महसूल...