Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या पथकाकडून झरीजामणीत सेतु केंद्रांचे स्टिंग ऑपरेशन

उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या पथकाकडून झरीजामणीत सेतु केंद्रांचे स्टिंग ऑपरेशन
ads images

जादा पैसे आकारणाऱ्या दोन सेतु केंद्रांवर कारवाई,नागरिकांनी या सेतू केंद्रावर अर्ज करू नये

यवतमाळ, दि. 23: केळापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या पथकाकडून झरीजामणीतील जादा पैसे आकारणाऱ्या सेतु केंद्रांचे स्टिंग ऑपरेशन करून त्यांच्या विरुद्ध कारवाई केली जात आहे.

दि.17 जानेवारी रोजी तहसिल कार्यालय झरीजामणी येथे या पथकाने भेटे दिली असता सेतु सुविधा केंद्र चालक यांच्या कडून जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलिअर, उत्पन्नाचा दाखला, एपत प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांसाठी शासनाने ठरवून दिलेल्या शुल्का पेक्षा जास्त पैसे घेत असल्याबाबत नागरीकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या.

या तक्रारीवरून उपविभागीय अधिकारी कार्यालय केळापूर येथील पथकाने सेतू केंद्रांची गुप्तपणे पाहणी केली. तसेच व्हीडीओ काढण्यात आलेला असून त्यामध्ये भोयर सेतु सेवा केंद्र, तहसिल कार्यालय चौक, झरीजामणी व ओम साई सेतु सेवा केंद्र, बिरसा मुंडा चौक, झरीजामणी यांनी शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा जास्त पैसे घेत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांचे सेतु केंद्रावर कडक कार्यवाही सुरू आहे.

त्यामुळे नागरिकांनी या सेतु केंद्रात कोणत्याही दाखल्यासाठी अर्ज करू नये, तसेच इतर कोणतेही सेतु केंद्र चालक शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा जास्त पैसे घेत असल्यास उपविभागीय अधिकारी कार्यालयात किंवा sdokelapur@rediffmail.com या ई-मेल वर पुराव्यानिशी तक्रार दाखल करण्यात यावी, असे आवाहन केळापूरच्या उपविभागीय अधिकारी याशनी नागराजन यांनी केले आहे.

 

ads images

ताज्या बातम्या

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

झरी-जामणीतील बातम्या

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

मुकुटबन बस थांबा पाडल्यामुळे प्रवाशाचे आतोनात हाल

झरी जामनी: मुकुटबन बस थांबा पाडल्यामुळे प्रवाशाचे आतोनात हाल होत आहे.मे महिन्यात भर उन्हात प्रवाशांना उभे रहावे लागत...

आधी लग्न लोकशाहिचं मग माझं-प्रवीण बोधे

झरी: आज शुक्रवार दिनांक 19 एप्रिल रोजी अडेगाव येथील नवरदेव प्रवीण बोधे यांचा आज कोरपना येथे विवाह होता.आजच लोकसभेचे...