Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / यवतमाळ जिल्ह्यातील...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

यवतमाळ जिल्ह्यातील दोनशे सुशिक्षित बेरोजगारांना मिळणार मैत्री प्रशिक्षण

यवतमाळ जिल्ह्यातील दोनशे सुशिक्षित बेरोजगारांना मिळणार मैत्री प्रशिक्षण
ads images

सुशिक्षित बेरोजगारांनी अर्ज करण्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तांचे आवाहन

यवतमाळ, दि. २४ : केंद्र सरकारच्या  राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २०० सुशिक्षित बेरोजगारांना मैत्री-मल्टीपर्पज आर्टिफिशियल इन्सीमेशन वर्कर इन रुरल इंडिया (एमएआयटीआरआय) म्हणून प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे. या प्रशिक्षित व्यक्तींची कृत्रिम रेतन व अनुषंगिक कार्य करण्यासाठी नियुक्ती केली जाणार असून इच्छुक उमेदवारांनी ५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या माध्यमातून जिल्ह्यातील गाई-म्हशींमध्ये कृत्रिम रेतनाची व्याप्ती वाढेल व ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच दुग्ध उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होईल.

हा प्रशिक्षण कार्यक्रम तीन महिने कालावधीचा असून यामध्ये एक महिना क्लासरूम ट्रेनिंग व दोन महिने प्रॅक्टिकल ट्रेनिंगचा समावेश राहील. क्लासरूम ट्रेनिंग ही पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात येईल व प्रॅक्टिकल ट्रेनिंग ही जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ किंवा तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय किंवा जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय या ठिकाणी घेण्यात येईल.

प्रशिक्षण घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्जदार हा किमान बारावी उत्तीर्ण झालेला असावा, त्यांचे वय १८ ते ३५ वर्ष असावे. अर्जाचा नमुना पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेमध्ये उपलब्ध होईल.

यवतमाळ जिल्ह्यातील एकूण २०० उमेदवारांची या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येईल. इच्छुक उमेदवारांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्याकडे दि. ५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. विजय राहाटे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. क्रांती काटोले यांनी केले आहे.

 

 

ताज्या बातम्या

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट. 26 July, 2024

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट.

वणी:- वणी शहरातील भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा समाजसेवक विजय चोरडिया यांनी गोकुळ नगर येथील अपंग व्यक्तींना...

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी. 26 July, 2024

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी.

वणी :- वरोरा मार्गाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नागपुर ते चंद्रपुर व वणी करीता बसेस धावत असतात. परंतू चंद्रपुर...

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी  देण्यात यावी 26 July, 2024

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी देण्यात यावी

वणी:स्थानिक आमदार निधीतून दिव्यांग व्यक्तिकरिता 30 लाख रुपये खर्च करायचा असतो.याच निधीतून दिव्यांग व्यक्ती करिता...

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब. 25 July, 2024

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब.

वणी:- एकतरी कला असावी अंगी , तेव्हाच वाजेल जीवन जगायाची पुंगी या वाक्यप्रचारा प्रमाणे शेकडो कला लिलया अवगत करणारा...

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित 25 July, 2024

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित

वणी - होटल कोणार्क येंल बी नागपूर येथे दिनांक २१ जुलै रोजी प्रयास बहुउद्देशीय सेवा संघाचा रौप्य महोत्सव पार पडला...

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू. 25 July, 2024

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू.

वणी:- कलरचे काम करीत असताना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना आज दुपारी...

मारेगावतील बातम्या

शेतकऱ्याला त्रास द्याल तर गाठ माझ्याशी आहे - राजु उंबरकर

मारेगाव:महावितरण विभागाने देखभाल दुरुस्तीची कामे येत्या २ दिवसात पूर्णत्वास न्यावी व वारंवार होत असलेला विद्युत...

*विजेच्या धक्याने तरुण कामगाराचा मृत्यू*

*विजेच्या धक्याने तरुण कामगाराचा मृत्यू* ✍️रमेश तांबेवणी तालुका प्रतिनिधी वणी:-मारेगाव तालुक्यातील हिवरा (मजरा)...

छत्रपती शिवाजी महाराजानंतर आदर्श राज्यकारभार चालवणारी कुशल प्रशासक म्हणजे अहिल्यादेवी होळकर-विकास चिडे (राष्ट्रीय प्रबोधनकार)

मारेगाव:छत्रपती शिवाजी महाराजानंतर आदर्श राज्यकारभार सांभाळणारी कुशल प्रशासक म्हणजे अहिल्यादेवी होळकर होय.अहिल्यादेवी...