Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / यवतमाळ जिल्ह्यातील...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परदेशात अभ्यास दौऱ्याची संधी

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परदेशात अभ्यास दौऱ्याची संधी

> परदेशातील कृषी तंत्रज्ञान व उत्पन्नातील वाढीचा अभ्यास करता येणार,३१ जानेवारीपूर्वी तालुकास्तरावर प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन, ५० टक्के रक्कम ते एक लाख रुपयांपर्यंत अनुदान

यवतमाळ,दि.२४ : परदेशात विकसित केलेले शेती विषयक तंत्रज्ञान व शेतकऱ्यांनी केलेला अवलंब आणि उत्पन्नात झालेली वाढ याचा अभ्यास करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परदेश दौऱ्याची संधी मिळणार आहे. या दौऱ्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी परिपूर्ण प्रस्ताव ३१ जानेवारी पूर्वी तालुकास्तरावर सादर करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले आहे.

राज्यातील शेतकऱ्यांचे केवळ उत्पादन व उत्पादकता वाढवणे हे ध्येय यापुढे न राहता उत्पादित होणाऱ्या शेतीमालाची दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करणे अत्यंत गरजेचे आहे. शेतीशी निगडित घटकाबाबत जगात वेळोवेळी होत असलेले बदल, विकसित होत असलेले तंत्रज्ञान हे शेतकऱ्यापर्यंत त्यांच्या गरजेनुरूप योग्य वेळी पोहोचविणे आणि त्यासाठी आवश्यक साह्य व सोयी सुविधा पुरविणे निकडीचे आहे. कृषी विस्तार कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्याकरिता करावयाच्या विविध उपयोजनासाठी कृषी विभागाकडून देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करण्याबाबत मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत.

विविध देशांनी विकसित केलेले शेती विषयक तंत्रज्ञान व तेथील शेतकऱ्यांनी त्याचा केलेला अवलंब व त्याद्वारे त्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ याबाबत त्या त्या देशातील शास्त्रज्ञ, शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा क्षेत्रिय भेटी तसेच संस्थांना भेटी इत्यादी द्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरिता राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

या योजनेअंतर्गत शासनाकडून अभ्यास दौऱ्याकरीता सर्व घटकातील शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या ५० टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त एक लाख रुपये यापैकी जे कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देय आहे.या योजनेअंतर्गत शेतकरी निवडीचे निकष ठरविण्यात आले आहेत. त्यानुसार या अभ्यास दौऱ्याकरिता जाणारा लाभार्थी हा स्वतः शेतकरी असावा. स्वतःच्या नावे चालू कालावधीचा सातबारा व आठ अ उतारा असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याचे उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असावी व तसे त्याने स्वयंघोषणा पत्रात नमूद करावे. शेतकरी कुटुंबामधून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. निवडलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांने स्वखर्चाने जरी इतर कुटुंब सदस्यास सोबत घ्यायचे असले तरी सहल व्यवस्थापनास येणाऱ्या संभाव्य अडचणीमुळे त्यास परवानगी दिली जाणार नाही. सोबत शिधापत्रिकेची झेरॉक्स प्रत जोडावी. शेतकऱ्यांने त्याच्या आधार प्रमाणपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे. शेतकरी किमान बारावी पास असावा, बारावी पास झाल्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे.  शेतकऱ्याचे वय सहलीला निघण्याच्या दिवशी किमान पंचवीस वर्षे पूर्ण व सहल समाप्त होण्याच्या अंतिम दिवशी साठ वर्षापेक्षा जास्त नसावे. त्यासाठी पार पत्रानुसार वयाची पडताळणी करण्यात येईल. शेतकरी वैध पारपत्रधारक (पासपोर्ट ) असावा, पुराव्यासाठी पारपत्राची मुदत किंवा वैधता दर्शविणाऱ्या पानाची झेरॉक्स प्रत जोडावी. पार पत्राची वैध मुदत दौरा निघण्यापूर्वी किमान सहा महिने असावी.

शेतकरी शासकीय निम शासकीय सहकारी, खाजगी, संस्थेत नोकरीत नसावा, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, वकील सीए, अभियंता, कंत्राटदार इत्यादी नसावा तसे त्यांने स्वतः स्वयंघोषणापत्रात नमुद करावे.  शेतकऱ्याने यापूर्वी शासकीय अर्थसहाय्याने विदेश दौरा केलेला नसावा तसेच त्यांनी स्वतः स्वयंघोषणापत्रात नमूद करावे. शेतकऱ्याची अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाल्याचे पत्र कृषी विभागाकडून मिळाल्यानंतर शेतकऱ्याने परदेश दौऱ्यासाठी शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र किमान एमबीबीएस डॉक्टरचे सादर करावे.

कोरोनाविषयक तपासणी करून तसा अहवाल कृषी आयुक्तालय सादर करणे बंधनकारक आहे. या अहवालानुसार शेतकऱ्यास कोणत्याही प्रकारच्या संसर्गजन्य रोगाची लागण झाली नसल्याचे तसेच सात ते दहा दिवस कालावधीच्या परदेश दौरा करण्यासाठी शरीरिक दृष्ट्या पात्र असल्याचे डॉक्टरांनी प्रमाणित करणे आवश्यक राहील.

या योजनेच्या अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्याकरिता तीन चे लक्षांक प्राप्त आहे. अनुदानाच्या तपशीला विषयी सविस्तर माहिती, शेतकरी निवडीची कार्यपद्धती, शेतकऱ्यांनी पाळावयाच्या अटी व शर्ती इत्यादी बाबत अधिक माहिती संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त करून घ्यावी. तसेच दौऱ्याकरिता इच्छुक शेतकऱ्यांनी तालुकास्तरावर परिपूर्ण प्रस्ताव ३१ जानेवारी २०२४ पूर्वी सादर करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

*रोटरीचे उपक्रम वाखावण्याजोगे: रोटरीने ग्रामीण भागासाठीही पुढाकार घ्यावा : आमदार सुभाष धोटे* 24 February, 2024

*रोटरीचे उपक्रम वाखावण्याजोगे: रोटरीने ग्रामीण भागासाठीही पुढाकार घ्यावा : आमदार सुभाष धोटे*

*रोटरीचे उपक्रम वाखावण्याजोगे: रोटरीने ग्रामीण भागासाठीही पुढाकार घ्यावा : आमदार सुभाष धोटे* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या 24 February, 2024

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...

बीएमएस का 22और 23 फरवरी2024 को दो दिवसीय अभ्यास वर्ग सम्पन्न* 24 February, 2024

बीएमएस का 22और 23 फरवरी2024 को दो दिवसीय अभ्यास वर्ग सम्पन्न*

घुगुस:-भारतीय कोयला खदान मजदूर संघ (भा.म.सं.) वणी-ताडाली एवं मानव संसाधन विकास विभाग नागपुर के अंतर्गत क्षेत्रीय...

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव* 24 February, 2024

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव*

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव* ✍️ राजू गोरे शिरपूर शिरपूर:- दि. 23 फरवरी रोजी दरवर्षीप्रमाणे...

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव* 24 February, 2024

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव*

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव* ✍️ राजू गोरे शिरपूर शिरपूर:- दि. 23 फरवरी रोजी दरवर्षीप्रमाणे...

*मार्डी येथे मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव संपन्न* 24 February, 2024

*मार्डी येथे मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव संपन्न*

*मार्डी येथे मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव संपन्न* ✍️राजू गोरे शिरपूर शिरपूर:-दिनांक 19 फरवरी रोजी सायंकाळी...

मारेगावतील बातम्या

यवतमाळ जिल्ह्यातील दोनशे सुशिक्षित बेरोजगारांना मिळणार मैत्री प्रशिक्षण

यवतमाळ, दि. २४ : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २०० सुशिक्षित बेरोजगारांना...

वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार मा.श्री. वामनराव कासावर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार मा.श्री. वामनराव कासावर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुकश्री.विजय...

वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार मा.श्री. वामनराव कासावर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार मा.श्री. वामनराव कासावर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!शुभेच्छुकश्री.मारोती...